पूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडून सरकार ‘खुर्ची बचाव’ कार्यात व्यस्त; गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल

राज्यात पूरपरिस्थिती आहे. लोक हवालदिल झाले आहेत. त्यांना मदतीची अपेक्षा आहे. असं असताना पूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडून सरकार मात्र 'खुर्ची बचाव' कार्यात व्यस्त आहे. (gopichand padalkar)

पूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडून सरकार 'खुर्ची बचाव' कार्यात व्यस्त; गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल
गोपीचंद पडळकर, आमदार, भाजप

मुंबई: राज्यात पूरपरिस्थिती आहे. लोक हवालदिल झाले आहेत. त्यांना मदतीची अपेक्षा आहे. असं असताना पूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडून सरकार मात्र ‘खुर्ची बचाव’ कार्यात व्यस्त आहे, अशी खोचक टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडीवर केली आहे. (gopichand padalkar attacks maha vikas aghadi over flood in maharashtra)

गोपीचंद पडळकर यांनी मीडियाशी संवाद साधताना ही टीका केली आहे. महाराष्ट्रातील जनता आस्मानी संकटामुळे उद्धवस्त झाली आहे. आघाडीचे कर्ते शरद पवार निष्क्रीय मुख्यमंत्र्यांची मर्जी सांभाळत आहेत. त्यासाठी दौरे केले म्हणून पुतण्याची कान उघडणी करत आहेत. पूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडून हे सरकार ‘खुर्ची बचाव’ कार्यात व्यस्त आहे, अशी टीका पडळकर यांनी केली.

फडणवीस सरकारप्रमाणे मदत द्या

कर्जबुडव्या साखर कारखान्यांना 3800 कोटी देण्यासाठी सरकारी तिजोरी उघडली जाते. त्याचप्रमाणे फडणवीस सरकारने केलेल्या मदतीप्रमाणे हे सरकार पूरग्रस्तांना तातडीची मदत का करत नाही?, असा सवाल त्यांनी केला. फडणवीस सरकारने तातडीने व कोणतेही निकष न लावता घरपडीला 95000, भाड्याने राहण्यासाठी 25000, व्यापाऱ्यांना 50, 000 तर शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपयांची मदत केली होती. आता तर परिस्थिती महाबिकट आहे. एकीकडे यांच्या ‘लॉकडाऊन -लॉकडाऊन’ च्या खेळामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडलंय आणि व्यापारी रडकुंडीला आलाय. असा दुहेरी संकटाचा सामना सामान्य जनता आणि व्यापारी करत आहे, असं त्यांनी सांगितलं.

प्रत्येकी एक लाखाची तातडीने मदत करा

आस्मानी आणि कोरोनाच्या संकटाने मेटाकुटीला आलेल्या व्यापाऱ्यांना व सामान्य जनतेला कुठल्याही निकषाच्या चक्रव्यूव्हात न अडकवता आधी तातडीने प्रत्येकी 1 लाख रूपयाची मदत केली पाहिजे. शिवाय व्यापाऱ्यांना वर्षभरासाठी भाडेपट्टी व वीजबील माफीची मदत जाहीर करून लवकरात लवकर अंमलात आणावी, अशी मागणीही त्यांनी केली.

मुख्यमंत्र्यांचा दौरा

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगली, सातारा आणि कोल्हापूरचा दौरा केला. अजित पवार यांनी या दौऱ्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यातील पूरस्थिती आणि नुकसानीची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली. तसेच राज्याचं पुरामुळे झालेलं नुकसान आणि पूरग्रस्तांना द्यावयाची मदत यावरही चर्चा झाल्याची माहिती आहे. मुख्यमंत्र्यांनी कोकणातील तळीये, चिपळूण या भागाचा दौरा केला होता. त्यानंतर आता ते कोल्हापूरचा दौरा करणार आहेत. यावेळी उद्धव ठाकरे कोल्हापूर शहर, शिरोळ तालुक्याला भेट देणार आहेत.

फडणवीसही पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर जाऊन पाहणी करणार आहेत. खराब हवामानामुळे मुख्यमंत्री ज्या सातारा जिल्ह्यातील कोयनानगर परिसरात जाऊ शकले नव्हते, त्या गावात देवेंद्र फडणवीस जाण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस आज साताऱ्यातील मोरगिरी/आंबेघर येथे पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. त्यानंतर दुपारी 4.30 वाजता कोयनानगर येथे स्थलांतरित कुटुंबाची भेट घेणार. त्यानंतर सायं. 5.15 : हुंबरळी ता. पाटण येथे अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. (gopichand padalkar attacks maha vikas aghadi over flood in maharashtra)

 

संबंधित बातम्या:

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा कोल्हापूर दौरा ठरला, देवेंद्र फडणवीसही पश्चिम महाराष्ट्रात!

दरड आणि पुरामुळे राज्यात 6 हजार कोटींच्या नुकसानीचा अंदाज; पॅकेजसाठी हालचाली सुरू

उद्धव ठाकरे म्हणाले, ‘वाढदिवसाची भेट काय देणार?’, भास्कर जाधवांकडून ‘स्वच्छ-सुंदर’ उत्तर!

(gopichand padalkar attacks maha vikas aghadi over flood in maharashtra)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI