उद्धव ठाकरे म्हणाले, ‘वाढदिवसाची भेट काय देणार?’, भास्कर जाधवांकडून ‘स्वच्छ-सुंदर’ उत्तर!

भास्कर जाधवांच्या शुभेच्छा स्वीकारल्यावर मुख्यमंत्र्यांनी जाधवांना कोकणातल्या भीषण परिस्थितीची आणि विदारक वास्तवाची जाणीव करुन देत या सगळ्या प्रसंगानंतर 'वाढदिवसाची भेट काय देणार?' म्हणून त्यांना प्रश्न विचारला.

उद्धव ठाकरे म्हणाले, 'वाढदिवसाची भेट काय देणार?', भास्कर जाधवांकडून 'स्वच्छ-सुंदर' उत्तर!
भास्कर जाधव आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई :  राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा आज वाढदिवस… त्यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. विविध पक्षाचे नेते, मंत्री, आमदार, उद्धव ठाकरेंना फोन करुन त्यांना शुभेच्छा देत आहेत. सध्या चर्चेत असलेल्या शिवसेना आमदार भास्कर जाधव (Bhaskar jadhav) यांनीही उद्धव यांना फोन केला. वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा स्वीकारल्यावर ‘वाढदिवसाची भेट काय देणार?’, असं भास्कर जाधव यांना विचारलं. त्यावर भास्कररावांनी ‘स्वच्छ-सुंदर’ उत्तर दिलं.  (Shivsena MLA Bhaskar jadhav Greet Cm Uddhav Thackeray On Birthday)

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त भास्कर जाधवांचा फोन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त भास्कररावांनी आज त्यांना सकाळीच फोन केला. ‘तुमची प्रकृती चांगली रहावी, शतायुषी व्हावं, तुमच्या हातून असंच महाराष्ट्र हिताचं काम होवो’, अशा शुभेच्छा भास्कररावांनी मुख्यमंत्र्यांना दिल्या. मुख्यमंत्र्यांनी भास्कररावांच्या शुभेच्छा स्वीकारत त्यांचे आभार मानले.

‘वाढदिवसाची भेट काय देणार?’

भास्कर जाधवांच्या शुभेच्छा स्वीकारल्यावर मुख्यमंत्र्यांनी जाधवांना कोकणातल्या भीषण परिस्थितीची आणि विदारक वास्तवाची जाणीव करुन देत या सगळ्या प्रसंगानंतर ‘वाढदिवसाची भेट काय देणार?’ म्हणून त्यांना प्रश्न विचारला. यावर भास्कर जाधवांनी ‘स्वच्छ सुंदर’ उत्तर दिलं.

भास्कर जाधवांचं स्वच्छ-सुंदर उत्तर

“साहेब आपण चिपळूणला आला होतात, त्यावेळी मी आपल्यावतीने जनतेला शब्द दिला होता की मी माझ्या साथीदारांसह उध्वस्त झालेलं चिपळूण स्वच्छ सुंदर करेन… त्यानुसार माझ्या गुहागर मतदारसंघातील चारशे ते पाचशे लोकांसहित मी काल चिपळूण शहर स्वच्छ करण्यासाठी रस्त्यावर उतरलो. आजही लोकं स्वच्छता करत आहेत. आपल्या वाढदिवसानिमित्त ही आपल्याला भेट”, असं उत्तर भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं.

चर्चेतले भास्कर जाधव

महापुराने उध्वस्त झालेल्या कोकणाची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली. मुख्यमंत्र्यांच्या चिपळूण पाहणी दौऱ्यात भास्कर जाधव यांची अरेरावी पाहायला मिळाली, मग लोकांशी बोलत असताना त्यांचे हातवारे असोत किंवा महिलेशी असभ्य वर्तन… अशा प्रकारची चर्चा सोशल मिडीयावर रंगली… बऱ्याचश्या लोकांना भास्कररावांचं हे वर्तन आवडलं नव्हतं. दुसरीकडे त्यांचा मूळ स्वभाव माहिती असलेल्या व्यक्ती भास्कर जाधव यांचं समर्थन करत होते.

आज वाढदिवसानिमित्त खुद्द मुख्यमंत्र्यांनीच वाढदिवसाची भेट काय देणार? असा प्रश्न विचारला आणि भास्कर जाधवांनी त्या प्रश्नावर ‘चिपळूण शहर स्वच्छ सुंदर करेन’, असं म्हणत षटकारच ठोकला. मुख्यमंत्र्यांनाही भास्कर जाधवांचं उत्तर ऐकून बरं वाटलं असेल, त्यांनाही भास्कर जाधवांनी दिलेलं वाढदिवसाचं गिफ्ट आवडलं असेल…!

(Shivsena MLA Bhaskar jadhav Greet Cm Uddhav Thackeray On Birthday)

हे ही वाचा :

कोल्हापूर, सांगलीला अलमट्टी धरणामुळे महापूर नाही, अजित पवारांनी नेमकं कारण सांगितलं

बॅग भरुन कपडे आणा, राज ठाकरेंचे मुंबईतील पदाधिकाऱ्यांना आदेश, ठाण्यावरुन आजच पुण्याला निघणार

राऊत म्हणतात, उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय स्तरावर नेतृत्व करावं; शरद पवार म्हणाले…

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI