कोल्हापूर : कोल्हापूर, सांगलीचा महापूर कर्नाटकातील अलमट्टी धरणामुळे येतो असं म्हटलं जात होतं. मात्र याचा अभ्यास करण्याबाबत नेमलेल्या समितीने या महापुराला अलमट्टी जबाबदार नसल्याचं म्हटलं आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. अजित पवार यांनी पूरग्रस्त कोल्हापूर जिल्ह्याची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पश्चिम महाराष्ट्रातील पूरस्थितीची माहिती दिली.