AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बॅग भरुन कपडे आणा, राज ठाकरेंचे मुंबईतील पदाधिकाऱ्यांना आदेश, ठाण्यावरुन आजच पुण्याला निघणार

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray Thane) यांची ठाण्यात पदाधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे मुंबईवरुन सकाळी 11.15 च्या सुमारास ठाण्याकडे रवाना झाले.

बॅग भरुन कपडे आणा, राज ठाकरेंचे मुंबईतील पदाधिकाऱ्यांना आदेश, ठाण्यावरुन आजच पुण्याला निघणार
Raj Thackeray
| Edited By: | Updated on: Jul 27, 2021 | 11:30 AM
Share

मुंबई/ ठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray Thane) यांची ठाण्यात पदाधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे मुंबईवरुन सकाळी 11.15 च्या सुमारास ठाण्याकडे रवाना झाले. महत्वाचं म्हणजे राज ठाकरे यांनी मुंबईच्या सर्व पदाधिकाऱ्यांना बॅग भरुन कपडे आणण्यास सांगितलं. राज ठाकरे यांच्या या आदेशानंतर अमित ठाकरे, अविनाश अभ्यंकर, अमेय खोपकर हे बॅगा घेऊन कृष्णकुंज या राज ठाकरेंच्या निवासस्थानी दाखल झाले.

दरम्यान, राज ठाकरे, अमित ठाकरे ठाण्याचा दिशेनं रवाना झाले. त्यांच्यासोबत चार ते पाच गाड्यांचा ताफा आहे. अर्धे कार्यकर्ते त्यांना मुलुंड टोल नाका इथे भेटतील. ठाण्यातील सीकेपी हॉल इथं राज ठाकरे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.  दुपारनंतर राज ठाकरे ऐरोली मार्गे पुण्याच्या दिशेनं रवाना होणार आहेत.

ठाण्यात पदाधिकाऱ्यांची बैठक 

नाशिक आणि पुणे पाठोपात मनसे आता ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीला लागल्याचं पाहायला मिळत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत आज ठाणे पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक होणार आहे. ठाण्यातील सीकेपी हॉलमध्ये थोड्याच वेळात ही बैठक होणार आहे. या बैठकीत ठाणे महापालिका निवडणुकीसाठी मनसेचा मुख्य अजेंडा ठरण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पदाधिकाऱ्यांच्या जबाबदारीत मोठे फेरबदल होण्याचे संकेतही दिले जात आहेत. दरम्यान, ठाण्यात मनसेचा सध्या एकही नगरसेवक नाही. अशावेळी ठाणे महापालिकेसाठी होणारी मनसेची ही बैठक महत्वाची ठरणार आहे.

पुणे दौरा

ठाण्याचा दौरा झाल्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे रात्री पुण्यात दाखल होणार आहेत. राज ठाकरे 2 ऑगस्टपर्यंत पुणे आणि पिंपरी चिंचवड दौऱ्यावर असतील.

राज ठाकरे यांनी गेल्याच आठवड्यात पुणे दौरा केला होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे  (Raj Thackeray Pune) हे 19,20 आणि 21 जुलै अशा तीन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर होते.  या दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी  राज ठाकरेंचा पुढचा पुणे दौराही ठरला होता. आठ दिवसांनी म्हणजे 30 जुलैला राज ठाकरे पुन्हा पुणे दौऱ्यावर येणार असल्याची माहिती मनसेचे पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे (Vasant More) यांनी दिली होती.

संबंधित बातम्या  

पुण्यातून निघण्यापूर्वीच राज ठाकरेंचा पुढचा दौरा ठरला, 8 दिवसांनी ‘मी पुन्हा येईन’!

नाशिक, पुणेनंतर आता ठाणे महापालिकेसाठी मनसेची तयारी सुरु, सीकेपी हॉलमध्ये राज ठाकरेंच्या उपस्थितीत बैठक

Raj Thackeray MNS chief Thane meeting with MNS party workers after that will leave for Pune live update

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.