मनसे पुणे मनपा स्वबळावर लढवणार का? राज ठाकरेंचं थेट उत्तर

Raj Thackeray | राज ठाकरे आज मनसेचे पुण्यातील प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतील. यानंतर पुढील आठवड्यात 16 ते 18 जुलैदरम्यान राज ठाकरे नाशिकचा दौरा करतील. राज ठाकरे यांच्या या दौऱ्यांमुळे मनसैनिक नव्या उत्साहाने कामाला लागण्याची शक्यता आहे.

मनसे पुणे मनपा स्वबळावर लढवणार का? राज ठाकरेंचं थेट उत्तर
राज ठाकरे, मनसेप्रमुख
Follow us
| Updated on: Jul 11, 2021 | 12:50 PM

पुणे: पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत इतर कोणत्याही राजकीय पक्षाशी युती करायची की नाही, हा निर्णय परिस्थिती पाहून घेऊ, असे सूचक वक्तव्य मनसेप्रमुख राज ठाकर यांनी केले. राज ठाकरे (Raj Thackeray) हे दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते रविवारी मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन पार पडले. यावेळी राज ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. (MNS Chief Raj Thackeray press conference in Pune)

या पत्रकारपरिषदेत राज ठाकरे यांना, महापालिका निवडणुकीत मनसे ‘एकला चलो रे’ असणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राज ठाकरे यांनी फार बोलण्याचे टाळले. त्यावेळची परिस्थिती पाहून निर्णय घेऊ, असे मोघम वक्तव्य त्यांनी केले. म्हटलं तर महापालिका निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. कार्यालयाची गरज होती म्हणून नवं कार्यालय सुरू करण्यात आलं आहे. अजून निवडणुकांना वेळ आहे. सर्वच निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत. शेड्युलप्रमाणे फेब्रुवारीत निवडणुका व्हायला पाहिजे, पण पुढे काय होईल माहीत नाही, असं सांगतानाच निवडणुकीची रणनीती काय असेल हे तुम्हाला का सांगू?, असा सवाल त्यांनी एका प्रश्नावर उत्तर देताना केला.

दरम्यान, राज ठाकरे आज मनसेचे पुण्यातील प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतील. यानंतर पुढील आठवड्यात 16 ते 18 जुलैदरम्यान राज ठाकरे नाशिकचा दौरा करतील. राज ठाकरे यांच्या या दौऱ्यांमुळे मनसैनिक नव्या उत्साहाने कामाला लागण्याची शक्यता आहे.

‘एकनाथ खडसे सीडी कधी बाहेर काढतायत, याची वाट पाहतोय’

माझ्यामागे ‘ईडी’ लावली तर मी सीडी बाहेर काढेन, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी म्हटले होते. त्यामुळे मी आता एकनाथ खडसे सीडी कधी बाहेर काढतात, याची वाट पाहत असल्याचे वक्तव्य मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केले. राज्यात केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होत आहे. यापूर्वी काँग्रेसची सत्ता असतानाही तेच झाले होते आणि आता भाजपही तेच करत आहे. ईडीसारखी सरकारी यंत्रणा ही सरकारच्या हातातलं बाहुलं झालंय. त्यामुळे खरे गुन्हेगार मोकाट राहतात, अशी टीका राज ठाकरे यांनी केली.

राज ठाकरे हे दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते रविवारी मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन पार पडले. यावेळी राज ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी राज ठाकरे यांनी ‘ईडी’च्या कारवाईवर तोफ डागत अप्रत्यक्षपणे भाजपच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. त्यामुळे आता यावर भाजपचे नेते काही प्रतिक्रिया देणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

पुणे महापालिका पक्षीय बलाबल

भाजप 99 काँग्रेस 09 राष्ट्रवादी 44 मनसे 2 सेना 9 एमआयएम 1

एकूण 164

संबंधित बातम्या:

मोठी बातमी: महापालिका निवडणुकांसाठी मनसेच्या मोर्चेबांधणीला सुरुवात; राज ठाकरे पुण्याच्या दौऱ्यावर

एकनाथ खडसे सीडी कधी बाहेर काढतायत, याची वाट पाहतोय: राज ठाकरे

मराठा, ओबीसी आरक्षण सर्वांनाच मान्य आहे तर अडलं कुठं?; राज ठाकरेंचा सवाल

(MNS Chief Raj Thackeray press conference in Pune)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.