मोठी बातमी: महापालिका निवडणुकांसाठी मनसेच्या मोर्चेबांधणीला सुरुवात; राज ठाकरे पुण्याच्या दौऱ्यावर

मोठी बातमी: महापालिका निवडणुकांसाठी मनसेच्या मोर्चेबांधणीला सुरुवात; राज ठाकरे पुण्याच्या दौऱ्यावर
राज ठाकरे

Raj Thackeray | ते मनसेच्या शहर कार्यालयाचे उद्घाटन करतील. तसेच मनसेचे प्रमुख नेते पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठीही घेतील. यानंतर पुढील आठवड्यात 16 ते 18 जुलैदरम्यान राज ठाकरे नाशिकचा दौरा करतील. राज ठाकरे यांच्या या दौऱ्यांमुळे मनसैनिक नव्या उत्साहाने कामाला लागण्याची शक्यता आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Rohit Dhamnaskar

Jul 11, 2021 | 10:11 AM

पुणे: आगामी महानगरपालिका निवडणुकांच्यादृष्टीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) पुण्याचा दौरा करणार आहेत. राज ठाकरे रविवारी आणि सोमवार हे दोन दिवस पुण्यात मुक्कामाला असतील. (MNS Chief Raj Thackeray Pune visit)

यादरम्यान ते मनसेच्या शहर कार्यालयाचे उद्घाटन करतील. तसेच मनसेचे प्रमुख नेते पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठीही घेतील. यानंतर पुढील आठवड्यात 16 ते 18 जुलैदरम्यान राज ठाकरे नाशिकचा दौरा करतील. राज ठाकरे यांच्या या दौऱ्यांमुळे मनसैनिक नव्या उत्साहाने कामाला लागण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांनी पुण्यातील मनसेची कार्यकारिणी बदलली होती. तर डॅशिंग नेते वसंत मोरे यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती.

डॅशिंग वसंत मोरेंना शहराध्यक्षपद

आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (MNS) खांदेपालट करण्यात आला आहे. यामध्ये मनसेचे डॅशिंग आणि आक्रमक नेते वसंत मोरे (Vasant More) यांच्याकडे शहराध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. तर विद्यमान शहर अध्यक्ष अजय शिंदे यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

शहराध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आलेले वसंत मोरे हे आक्रमक नेतृत्त्वासाठी ओळखले जातात. त्यांनी कोरोनाच्या काळात अनेक कामे केली होती. याच कामगिरीमुळे वसंत मोरे यांच्याकडे शहराध्यक्षपद सोपवण्यात आल्याचे समजते.

मी तुम्हाला कधीच विसरणार नाही: राज ठाकरे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 15 व्या वर्धापन दिनी राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना एक ऑडिओ संदेश पाठवला होता. यामध्ये त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांचे आभार मानले होते. अनेक पराभव पचवूनही गेली १५ वर्षे साथ देणाऱ्या मनसैनिकांचे राज ठाकरे यांनी आभार मानले. ‘मी तुम्हाला कधीही विसरणार नाही,’ असा शब्दही राज यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला.

काही जण सोडून गेले, जाऊ द्यात. पण माझ्यासोबत सह्याद्रीच्या कड्यासारखे टिकून आहेत, त्यांना मी कधीही विसरणार नाही. पक्षाला जे जे यश मिळेल, त्याचे वाटेकरी तुम्हीच असाल. जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र तुमच्याच हातून घडेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

संबंधित बातम्या :

VIDEO | ‘परवानगीविना फोटो कसे घेता?’ महिला अधिकाऱ्याचा प्रश्न, पुण्यात मनसे नगरसेवकाने झापलं

रुग्णवाहिका वेळेत न मिळाल्याने संताप, पुण्यात मनसे नगरसेवकाने पालिका अधिकाऱ्याची गाडी फोडली

VIDEO | पुण्यात मनसे नगरसेवकाने करुन दाखवलं, हॉटेलच्या हॉलमध्ये 40 ऑक्सिजन बेडचे हॉस्पिटल

(MNS Chief Raj Thackeray Pune visit)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें