AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20i World Cup 2026 : भारत-पाक सामन्याआधी पहिला संघ वर्ल्ड कपमधून आऊट

भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याच्या 24 तासांआधी आयर्लंडने टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील आपल्या तिसऱ्या सामन्यात विजय मिळवला. आयर्लंडने ओमानचा धुव्वा उडववा. ओमानचं यासह स्पर्धेतून पॅकअप झालं आहे.

T20i World Cup 2026 : भारत-पाक सामन्याआधी पहिला संघ वर्ल्ड कपमधून आऊट
Icc T20i World Cup 2026 Captains PhotoshootImage Credit source: Icc X account
| Updated on: Feb 14, 2026 | 5:51 PM
Share

आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील नवव्या दिवशी अर्थात रविवारी 15 फेब्रुवारी रोजी टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान महामुकाबला होणार आहे. या सामन्याचे वेध चाहत्यांना लागले आहेत. या सामन्याआधी दोन्ही संघांनी जोरदार सराव केला आहे. एका बाजूला या हायव्होव्टेज सामन्यासाठीची क्रिकेट वर्तुळात चर्चा पाहायला मिळतेय. तर दुसऱ्या बाजूला स्पर्धेच्या आठव्या दिवशी 14 फेब्रुवारीला वर्ल्ड कपमधून पहिला संघ  अधिकृतरित्या बाहेर झाला आहे. टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या दहाव्या पर्वातून बाहेर होणारा पहिला संघ कोणता आहे? हे आपण जाणून घेऊयात.

ओमान वर्ल्ड कपमधून आऊट

ओमान क्रिकेट टीमचं टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतून आव्हान संपुष्टात आलं आहे. ओमानने आयर्लंडवर मोठ्या फरकाने मात केली. ओमानचं या पराभवासह स्पर्धेतून पॅकअप झालं. शनिवारी 14 फेब्रुवारीला स्पर्धेतील 22 व्या सामन्यात आयर्लंड विरुद्ध ओमान आमनेसामने होते. आयर्लंडने ओमानवर या सामन्यात 96 धावांच्या फरकाने विजय मिळवला.

आयर्लंडचा एकतर्फी विजय आणि ओमानचं पॅकअप

आयर्लंडने ओमान विरुद्ध फटकेबाजी करत या वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वात मोठी धावसंख्या उभारली. आयर्लंडने 5 विकेट्स गमावून 20 ओव्हरमध्ये 235 धावा केल्या. त्यानंतर आयर्लंडच्या गोलंदाजांनी कमाल केली. आयर्लंडने ओमानला 12 बॉलआधी ऑलआऊट केलं. ओमानला 18 ओव्हरमध्ये 139 रन्सवर गुंडाळलं. आयर्लंडने अशाप्रकारे 96 धावांच्या फरकाने हा सामना जिंकला.

आयर्लंड आणि ओमान दोन्ही संघांनी या वर्ल्ड कपमधील आपले दोन्ही सामने गमावले होते. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा क्रिकेट सामना करो या मरो असा होता. त्यामुळे दोघांपैकी कोणता तरी एक संघ बाहेर होणार आणि कुणीतरी विजयाचं खातं उघडणार हे समीकरण निश्चित होतं. त्यामुळे या सामन्यात चढाओढ पाहायला मिळण्याची अपेक्षा होती. मात्र आयर्लंडने एकतर्फी विजय मिळवला आणि आपलं आव्हान कायम राखलं.

ओमानचा बाजार उठला

आयर्लंडसमोर झिंबाब्वेचं आव्हान

ओमानने अशाप्रकारे आतापर्यंत एकूण आणि सलग 3 सामने गमावले आहेत. ओमान या स्पर्धेत आपल्या मोहिमेतील चौथा आणि अंतिम सामना हा ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळणार आहे. हा सामना 20 फेब्रुवारीला होणार आहे. तर आयर्लंड 17 फेब्रुवारीला आपला साखळी फेरीतील शेवटचा सामना हा झिंबाब्वे विरुद्ध खेळणार आहे. झिंबाब्वेला हा सामना जिंकून सुपर 8 मध्ये धडक देण्याची संधी आहे. अशात आता आयर्लंड सलग दुसरा सामना जिंकून झिंबाब्वेची सुपर 8 ची वाट बिकट करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार