राऊत म्हणतात, उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय स्तरावर नेतृत्व करावं; शरद पवार म्हणाले…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे. ते देशाला निश्चितच नेतृत्व देतील, असं विधान शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं होतं. (Sharad Pawar)

राऊत म्हणतात, उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय स्तरावर नेतृत्व करावं; शरद पवार म्हणाले...
Sharad Pawar
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: भीमराव गवळी

Jul 27, 2021 | 12:44 PM

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे. ते देशाला निश्चितच नेतृत्व देतील, असं विधान शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं होतं. यावर, महाराष्ट्रातील नेता देशाचं नेतृत्व करत असेल तर आम्हाला आनंदच आहे, असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटलं आहे. (ncp chief Sharad Pawar reaction on sanjay raut statement)

शरद पवार यांनी पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांना शिवसेना नेते संजय राऊत यांच्या विधानावर विचारण्यात आलं. तेव्हा त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. आम्हाला आनंद आहे. महाराष्ट्रातील कोणतीही व्यक्ती राष्ट्रीय लेव्हलवर नेतृत्व करण्यासाठी पुढे येत असेल आणि लोकांचं समर्थन मिळत असेल तर आम्हाला आनंदच आहे, असं पवारांनी म्हटलं आहे.

राऊत काय म्हणाले?

शिवसेना नेते संजय राऊत यांनीही उद्धव ठाकरे देशाचं नेतृत्व करतील असं म्हटलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रत्येकाला आपला कुटुंब प्रमुख वाटतात. हे त्यांच्या नेतृत्वाचं यश आहे. घरातला माणूस नेतृत्व करतो, असं प्रत्येकाला वाटतं. हे नेतृत्व प्रदीर्घ काळ टिकेल. राष्ट्रालाही त्यांच्या संयमी, प्रखर राष्ट्रवादी आणि हिंदुत्वावादी नेतृत्वाची गरज आहे. ते देशाला नेतृत्व देतील, अशा शुभेच्छा मी त्यांना देतो, असं राऊत म्हणाले होते.

भविष्यात पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घ्या

शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी एका दैनिकामध्ये लिहिलेल्या एका लेखातून उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आजवरचा प्रवास, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरेंनी सांभाळलेली शिवसेना, पेललेली आव्हानं याचा धांडोळा या लेखात घेण्यात आला आहे. दक्षिण आणि उत्तरेतील राज्यांतील जनतेला आपलेसे वाटू शकेल असे नेतृत्त्व उद्धव ठाकरे यांचे असल्याने, ‘दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा’ हे तमाम मराठी जनतेचं स्वप्न साकार करावं. त्यांनी भविष्यात पंतप्रधान पदाची सूत्रे हाती घ्यावीत, असं शेवाळे यांनी म्हटलं आहे.

ममता बॅनर्जींना उद्या भेटणार

पश्चिम बंगालच्या नेत्या काल पाच दिवसाच्या दिल्ली दौऱ्यावर आल्या आहेत. मुख्यमंत्री झाल्यावर त्या पहिल्यांदाच दिल्लीत येत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा महाआघाडीच्या चर्चांनी जोर धरला आहे. या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जींशी तुमची भेट होणार आहे का?, असा सवाल पवारांना करण्यात आला. त्यावर, गेल्या आठवड्यात मला ममता बॅनर्जी यांचा फोन होता. मी दिल्लीत येत असून तुम्हाला भेटायचं आहे, असं त्या म्हणाल्या. त्यामुळे कदाचित आम्ही उद्या भेटू, असं पवार म्हणाले. (ncp chief Sharad Pawar reaction on sanjay raut statement)

संबंधित बातम्या:

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भविष्यात पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घ्यावीत; शिवसेनेच्या ‘या’ खासदाराकडून शुभेच्छा

उद्धव ठाकरेंमध्ये देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता, तो दिवस लवकरच उगवेल; संजय राऊतांचं ट्विट

पूरग्रस्तांना अडीच कोटींच्या साहित्याचं वाटप करणार, दोन दिवसात मदत पोहोचेल: शरद पवार

(ncp chief Sharad Pawar reaction on sanjay raut statement)

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें