Gunratna Sadavarte: गुणरत्न सदावर्तेंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, जामिनाचा मार्ग मोकळा; सातारा पोलीस ताब्यात घेणार?

गुणरत्न सदावर्तेंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यांचा कोठडी मुक्का काही केल्या संपत नाहीये. गेल्या चार दिवसांपासून कोठडीत असलेले गुणरत्न सदावर्ते यांना आज त्यांची कोठडी संपल्याने कोर्टात हजर करण्यात आलं होतं.

Gunratna Sadavarte: गुणरत्न सदावर्तेंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, जामिनाचा मार्ग मोकळा; सातारा पोलीस ताब्यात घेणार?
गुणरत्न सदावर्ते यांच्याबाबत मोठी बातमीImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 13, 2022 | 4:55 PM

मुंबई : गुणरत्न सदावर्तेंना (Gunratna Sadavarte) 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) देण्यात आली आहे. गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यांचा कोठडी मुक्का काही केल्या संपत नाहीये. गेल्या चार दिवसांपासून कोठडीत असलेले गुणरत्न सदावर्ते यांना आज त्यांची कोठडी संपल्याने कोर्टात हजर करण्यात आलं होतं. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घराबाहेर एसटी कर्मचाऱ्यांनी (St Worker Protest) केलेल्या आंदोलना प्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली होती. या आंदोलनानंर जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू झाले होते. 8 एप्रिलला शरद पवारांची निवास्थान सिल्व्हर ओक येथे एसटी कर्मचाऱ्यांची चांगलेच आक्रमक आंदोलन केले होते. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू होतं. या आंदोलकांची बाजु कार्टात वकील गुणरत्न सदावर्ते मांड होते. आज सदावर्तेंना कोर्टात हजर केल्यानंतर दोन्ही बाजुने जोरदार युक्तीवाद करण्यात आला.

कोर्टात काय झालं?

सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सदावर्तेंची सात दिवसांची कोठडी मागितली होती. तर या कोठडीची आता काहीही गरज नसल्याचा युक्तीवाद सदावर्तेंच्या वकिलांनी केला. गुणरत्न सादवर्ते यांच्या पत्नी वकील जयश्री पाटील यांच्यावरही आता आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणात जयश्री पाटील यांचाही सहभाग आहे, असे म्हणत सरकरी वकील प्रदीप घरत यांनी कोर्टाचे लक्ष वेधले. खासकरून एसटी कर्मचाऱ्यांकडून दीड कोटीपेक्षा जास्त रक्कम गोळा केली गेली, असा आरोप करण्यात आलाय. तसेच ही रक्कम गोळा करण्यात जयश्री पाटील यांचा मोठा रोल असल्याचे सरकारी वकील प्रदीप घरत यांनी कोर्टाला संगितले आहे. दोन्ही बाजुच्या वकीलांनी यावेळी जोरदार युक्तीवाद करत एकमेकांची आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न केला आहे.

जयश्री पाटील यांच्यावरही आरोप

आज पुण्यातून या आंदोलनाप्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. तर नागपुरातील व्यक्तीचा शोध सुरू आहे. त्या व्यक्तेची नाव बाहेर उघड करण्यात आले नसले तरी, कोर्टासमोर पोलिसांच्या माध्यमातून हे नाव सांगण्यात आले आहे. लवकरच या व्यक्तीला अटक करू असा दावाही पोलिसांनी यावेळी कोर्टात केला आहे. अशी माहिती समोर आली आहे. सदावर्तेंच्या पत्नी जयश्री पाटील यांना या माध्यमातून 80 लाख रुपये मिळाल्याचेही सांगण्यात आले आहे. तर हा तपास भरकटलेला आहे. यात पोलिसांच्या हाती काहीही लागले नाही, असा युक्तीवाद सदावर्तेंच्या वकिलांनी केला आहे. तसेच जयश्री पाटील नाव यांचं नाव एफआयआरमध्ये कुठेच नाही तर त्यांना आरोपी म्हणता येणार नाही. तर त्यांना सहआरोपी करण्यात येणार नाही, असेही सांगण्यात आले.

Jayant Patil : राज ठाकरेंची सभा ही उत्तर सभा नाही तर उतारा सभा! जयंत पाटलांचा जोरदार टोला

खासदार नवनीत राणा यांना केंद्रीय गृहमंत्रालयाद्वारे वाय प्लस सुरक्षा प्रदान, राणा यांचा VVIP श्रेणीत समावेश

Sharad Pawar Live: मुख्यमंत्री 2 वर्षानंतर आज मंत्रालयात आले, पत्रकारांच्या प्रश्नावर पवार म्हणाले, अरे व्वा !

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.