AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

त्याने दिवाळीत पवारांना शंभर कॉल केले

राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर आणखीनच धक्कादायक माहिती समोर येत आहे. पवारांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी अज्ञात व्यक्तीनं फोन करून शरद पवारांना अनेक महिन्यांपासून छळले असून पवारांना धमकी देणारा इसमाविरोधात याआधीही गावदेवी पोलीसांकडे तक्रार करण्यात आली असल्याचे उघडकीस आले आहे.

त्याने दिवाळीत पवारांना शंभर कॉल केले
Image Credit source: sharad-pawar1
| Updated on: Dec 13, 2022 | 4:58 PM
Share

मुंबई :  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना धमकी देणाऱ्या कथित मनोविकृताने त्यांना त्यांच्या सिल्वर ओक निवासस्थानाच्या दूरध्वनी क्रमांकावर दिवाळीत शंभर कॉल केल्याचे उघडकीस आले आहे. तसेच हा इसम दर दिवसाला 15 ते 16 वेळा कॉल करून शिवीगाळ करीत असल्याचे उघडकीस आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांना फोन करणारी व्यक्ती विकृत आहे की त्याच्यावर मानसिक परिणाम झाला आहे याचा तपास पोलीसांनी करायचा असल्याचे म्हटले आहे. ही व्यक्ती परराज्यातील असून ग्रामीण शैलीत हिंदी बोलते. आणि विशेष म्हणजे ही व्यक्ती स्वत:च्या मोबाईल फोनवरून कॉल करीत असते.

या वेडसर व्यक्तीचे दिवसाकाठी 15 ते 20 फोन येत असून अत्यंत शिवराळ भाषेत ही व्यक्ती बोलते. या प्रकरणी गावदेवी पोलीस तसेच सह पोलीस आयुक्त गुन्हे यांच्याकडेही तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर पोलीसांनी या व्यक्तीचा पत्ता आणि नावही शोधून काढले होते. चौकशीअंती हा इसम वेडसर असल्याचे उघडकीस आले होते. तो उत्तरेकडील राज्यातील असल्याचेही स्पष्ठ झाले होते.

पवारांना दररोज कॉल करून त्रास देणाऱ्या या कथित वेडसर इसमाच्या कृतीला पायबंद घातला जात नसून दिवसेंदिवस तो अधिकच त्रास देत आहे. दिवाळीच्या दरम्यान त्याने 100 वेळा कॉल करून परिसीमा गाठली होती. हा इसम वेडसर असल्याने पुरेसी कारवाई होत नसल्याचे समजते. परंतू त्यामुळे खासदार शरद पवार यांना होणारा त्रास काही थांबत नाही. त्यामुळे पवारांच्या सचिवांनी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांना पत्र लिहून या इसमावर परिणामकारक कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल