Dhananjay Munde COVID | आरोग्य मंत्र्यांचा धनंजय मुंडेंना फोन, प्रकृतीबाबत राजेश टोपे म्हणतात…

| Updated on: Jun 12, 2020 | 1:23 PM

10 जून रोजी झालेल्या राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन कार्यक्रमाला धनंजय मुंडे यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी ते राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांच्या संपर्कात आले होते. (Rajesh Tope on Dhananjay Munde Health who tested COVID Positive)

Dhananjay Munde COVID | आरोग्य मंत्र्यांचा धनंजय मुंडेंना फोन, प्रकृतीबाबत राजेश टोपे म्हणतात...
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. धनंजय मुंडे यांना श्वास घेताना थोडा त्रास जाणवत असला, तरी त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. (Rajesh Tope on Dhananjay Munde Health who tested COVID Positive)

“धनंजय मुंडे यांच्याशी मी नुकतेच बोललो. त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात अ‍ॅडमिट करणार आहोत. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना कोणतीही लक्षणे नाहीत. श्वास घेताना थोडा त्रास जाणवत आहे. पण सर्व नियंत्रणात आहे. ” असं राजेश टोपे यांनी ‘टीव्ही9 मराठी’ला सांगितलं.

“राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन कार्यक्रमात आणि राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पूर्ण काळजी घेतली होती. त्यामुळे संसर्गाची भीती नाही. पण लक्षण दिसली तर मंत्री क्वारंटाईन होतील” असंही टोपे म्हणाले.

“आता सर्व सिस्टीम बदलल्या आहेत. पूर्वी चिकटून खुर्च्या असायच्या, आता किमान दोन मीटरचे अंतर ठेवले जाते, एक आड एक खुर्च्या असतात. कोरोनासोबत जगताना जी काळजी घ्यावी लागणार आहे, ती सर्व खबरदारी घेतली जाते. बैठकीत सर्वांनी मास्क लावले होते. त्यामुळे काळजीचे काही कारण नाही, हे हाय रिस्क काँटॅक्ट नाहीत. नाहीतर अख्खं मंत्रीमंडळच क्वारंटाईन व्हावं लागेल.” असं राजेश टोपे म्हणाले.

“पीए, ड्रायव्हर असे जे 24 तास सतत सोबत असतात, त्यांना आपण हाय रिस्क काँटॅक्ट संबोधतो. पण कोणा मंत्री किंवा अधिकाऱ्यांना शंका वाटली, तर त्यांनी आपली चाचणी करुन घ्यावी” असे आवाहन राजेश टोपे यांनी केले.

हेही वाचा : Dhananjay Munde | सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण

10 जून रोजी झालेल्या राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन कार्यक्रमाला धनंजय मुंडे यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी ते राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांच्या संपर्कात आले होते. तर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत धनंजय मुंडे यांच्याशी संपर्क आल्याने ठाकरे सरकारमधील काही मंत्र्यांनी स्वत:ला क्वारंटाईन केल्याचं बोललं जातं.

मुंबईत धनंजय मुंडे यांच्या बंगला परिसरातील कर्मचारी वस्ती असलेल्या भागातही कोरोनाचे काही रुग्ण सापडले आहेत. या कर्मचाऱ्यांमध्ये मुंडेंच्या स्वयंपाकी, मदतनीस यांचा समावेश आहे. धनंजय मुंडे यांच्यासह सर्वांवर सध्या उपचार सुरु आहेत.

हेही वाचा : धनंजय मुंडे यांना कोरोना, ठाकरे सरकारमधील काही मंत्रीही सेल्फ क्वारंटाईन

धनंजय मुंडे हे बीडमधील परळीचे आमदार आहेत. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते आमदारपदी निवडून आले. ठाकरे सरकारमध्ये त्यांच्या खांद्यावर सामाजिक न्याय मंत्रिपदाची धुरा देण्यात आली. (Rajesh Tope on Dhananjay Munde Health who tested COVID Positive)

ठाकरे सरकारमधील तिसऱ्या मंत्र्याला संसर्ग

ठाकरे सरकारमधील तिसऱ्या मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे. याआधी राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनाही कोरोनाची लागण झाली होती. सुदैवाने या दोन्ही मंत्र्यांनी कोरोनावर मात केली.

संबंधित बातम्या :

मिरा भाईंदरमध्ये शिवसेना नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू

ठाण्यात राष्ट्रवादीच्या नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू, आव्हाडांकडून हळहळ व्यक्त

किमान 12 तास रस्तेमार्गे प्रवास, अशोक चव्हाणांवर मुंबईत कोरोनावर उपचार!

(Rajesh Tope on Dhananjay Munde Health who tested COVID Positive)