MUMBAI : मुंबईतही आता हेल्मेट सक्ती, बाईक चालकासह मागे बसणाऱ्याला हेल्मेट बंधनकारक

मुंबईच्या वाहतूक पोलिसांनी एक आदेश काढला आहे. मुंबईत जे दुचाकीवरून प्रवास करणारे जे प्रवासी आहेत. म्हणजेच चालक आणि मागे बसणाऱ्या व्यक्तीला देखील पुढच्या पंधरा दिवसात हेल्मेट वापरणं बंधनकारण असणार आहे.

MUMBAI : मुंबईतही आता हेल्मेट सक्ती, बाईक चालकासह मागे बसणाऱ्याला हेल्मेट बंधनकारक
सांकेतिक छायाचित्र.Image Credit source: Tv9
Follow us
| Updated on: May 25, 2022 | 12:50 PM

मुंबई – बाईकवरून (BIKE) प्रवास करीत असताना हेल्मेट (HELMET) वापरणं आता मुंबईतही (MUMBAI) बंधनकारक करण्यात येणार आहे. येत्या पंधरा दिवसात हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी होणार अशी माहिती मिळाली आहे. मोटार सायकल चालवताना हेल्मेट न वापरल्यास पाचशे रूपये दंड आणि तीन महिन्यासाठी गाडी चालवण्याचा परवाना रद्द करण्यात येईल. तसेच बाईक चालकासह मागे बसणाऱ्याला हेल्मेट बंधनकारक असेल. त्यामुळे मुंबईकरांना पंधरा दिवसांनी घराबाहेर पडताना हेल्मेट घालावे लागणार आहे.

पंधरा दिवसात हेल्मेट वापरणं बंधनकारण असणार

मुंबईच्या वाहतूक पोलिसांनी एक आदेश काढला आहे. मुंबईत जे दुचाकीवरून प्रवास करणारे जे प्रवासी आहेत. म्हणजेच चालक आणि मागे बसणाऱ्या व्यक्तीला देखील पुढच्या पंधरा दिवसात हेल्मेट वापरणं बंधनकारण असणार आहे. पुढच्या पंधरा दिवसात या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल. जे नियम चालणार पाळणार नाहीत. त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे तीन महिन्यांसाठी चालकाचा वाहन परवाना रद्द करण्यात येणार आहे. त्यामुळे पंधरा दिवसांनी मुंबईकरांना हेल्मेट घालून घराबाहेर पडावे लागणार आहे.

मुंबईत बाईक चालकांविरोधात झालेली पोलिसांची कारवाई

मुंबई वाहतूक पोलिसांनी 6 एप्रिलपासून सुरू झालेल्या हेल्मेटविना वाहन चालविण्याच्या विशेष मोहिमेचा एक भाग म्हणून हेल्मेटशिवाय दुचाकी चालवणाऱ्या 2,446 लोकांचे परवाने निलंबित करण्याचा प्रस्ताव प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे पाठवला आहे. पोलिसांनी 1,947 दुचाकीस्वारांना हेल्मेट घालण्याचे महत्त्व सांगितले आहे. याशिवाय, वाहतूक पोलिसांनी रस्ता सुरक्षेसाठी काही उपक्रम हाती घेतले आहेत.

हे सुद्धा वाचा

ज्यात चुकीच्या दिशेने वाहन चालवणाऱ्यांविरुद्ध 2,000 हून अधिक तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत, तर 200 वाहनचालकांना अनावश्यक हॉर्न वाजवल्याबद्दल प्रत्येकी 1,000 रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.