Petrol Diesel: मुंबईत पेट्रोलची किंमत उच्चांकी पातळीवर, जाणून घ्या आजचा दर

| Updated on: May 06, 2021 | 8:33 AM

मुंबईतील हा पेट्रोलचा आतापर्यंतचा उच्चांकी दर आहे. | Petrol diesel rates

Petrol Diesel: मुंबईत पेट्रोलची किंमत उच्चांकी पातळीवर, जाणून घ्या आजचा दर
Follow us on

मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून स्थिर असलेल्या पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या दरांनी (Diesel rates) आता वरच्या दिशेने प्रवास सुरु केला आहे. त्यामुळे मुंबईत गुरुवारी पेट्रोलच्या किंमतीने विक्रमी पातळी गाठली. आज मुंबईत प्रतिलीटर पेट्रोलचा दर 97.34 तर डिझेलचा दर प्रतिलीटर 88.54 इतका आहे. मुंबईतील हा पेट्रोलचा आतापर्यंतचा उच्चांकी दर आहे. काल मुंबईत पेट्रोलची किंमत 97.16 रुपये प्रतिलीटर आणि डिझेलची किंमत 88.22 रुपये प्रति लीटरपर्यंत पोहोचली होती. (Petrol and Diesel rates in Mumbai)

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमुळे 27 फेब्रुवारीपासून पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर होते. मात्र, या निवडणुकानंतर पेट्रोलचा प्रतिलीटर 3 रुपयांनी तर डिझेल प्रतिलीटर 2 रुपयांनी महाग होऊ शकते, असा अंदाज जाणकारांनी वर्तविला होता. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचा हा वरच्या दिशेचा प्रवास आणखी काही काळ सुरु राहू शकतो. परिणामी अगोदरच लॉकडाऊनमुळे कंबरडे मोडलेले व्यापारी, वाहतूकदार आणि सामान्य नागरिकांना महागाईची झळ सोसावी लागणार आहे.

महाराष्ट्रात पेट्रोल- डिझेलचा आजचा दर काय?

मुंबई: पेट्रोल- 97.34 , डिझेल 88.54
पुणे: पेट्रोल- 96.98, डिझेल 86.79
नाशिक: पेट्रोल- 97.74, डिझेल 87.53
औरंगाबाद: पेट्रोल- 98.58, डिझेल 89.73

तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर कसे पाहाल?

मोबाईलवर एसएमएस पाठवून आपल्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांची माहिती मिळू शकते. यासाठी मोबाईलवर RSP आणि आपल्या शहराचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस करावा. त्यानंतर तुम्हाला लगेचच पेट्रोल-डिझेलच्या दरांची माहिती देणारा एसएमएस येतो. प्रत्येक शहराचा कोड वेगळा असतो. इंडियन ऑईलच्या (IOC) संकेतस्थळावरून हा कोड तुम्हाला उपलब्ध होईल.

सकाळी सहा वाजता जाहीर होतात पेट्रोल-डिझेलचे दर

दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलचे सुधारित दर जाहीर केले जातात. सकाळी सहा वाजल्यापासून ते मध्यरात्रीपर्यंत संबंधित शहरात नमदू केलेल्या दराप्रमाणे पेट्रोल-डिझेलची विक्री होते. पेट्रोल-डिझेलच्या मूळ किंमतीमध्ये अबकारी कर, डिलर्स कमिशन आणि अन्य गोष्टींचा समावेश झाल्यानंतर ही किंमत जवळपास दुप्पट होते. पेट्रोल आणि डिझेलचे दर हे आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींवर अवलंबून असतात.

संबंधित बातम्या:

‘या’ पाच कारणांमुळे पेट्रोल-डिझेलचे दर आणखी भडकणार, जाणून घ्या किंमत किती रुपयांनी वाढणार?

Petrol and Diesel rates: पाच राज्यांतील निवडणुकीचा निकाल लागला अन् मोदी सरकारने पेट्रोल-डिझेलचे दर वाढवले

(Petrol and Diesel rates in Mumbai)