AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपशी पॅचअप करू शकलो असतो… उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतील इन्साईड स्टोरी काय?

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवडणुकांची जय्यत तयारी सुरू केली आहे. त्यासाठी उद्धव ठाकरे बैठकांवर बैठका घेत आहेत. मतदारसंघांचे आढावेही घेतले जात आहेत.

भाजपशी पॅचअप करू शकलो असतो... उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतील इन्साईड स्टोरी काय?
uddhav thackeray Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 24, 2023 | 10:14 AM
Share

मुंबई | 24 ऑगस्ट 2023 : मी भाजपसोबत पॅचअप करू शकलो असतो. पण माझ्या नितीमत्तेत बसत नव्हतं. त्यामुळे मी भाजपसोबत गेलो नाही. कारण स्वाभिमान महत्त्वाचा होता. शिवसेनेचा दरारा कायम राखणं महत्त्वाचं होतं. त्यामुळे मी कोणतीही तडजोड केली नाही, असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. शिवसेना पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांची बैठक पार पडली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी हे मोठं विधान केल्याचं सूत्रांनी सांगितलं. तसेच उद्धव ठाकरे यांनी ज्यांना सोडून जायचं, त्यांनी सोडून जावं, असं म्हटल्याचंही सांगितलं जात आहे.

मी भाजपशी पॅचअप करू शकलो असतो. पण माझ्या नितीमत्तेत बसत नव्हतं. 2014पासून ज्यांनी फसवलं त्यांच्यासोबत कसं जाणार? मी मुख्यमंत्री होतो. माझ्या आमदारांना डांबून ठेवू शकलो असतो. पण जे मनाने फुटले त्यांना डांबून काय करणार होतो? त्यांना मी काय कमी केलं होतं?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत केल्याचं सूत्रांनी सांगितलं.

पुन्हा सत्तेत येणार

जुने निष्ठावंत सोडून जातात त्याचे वाईट वाटते. तुमच्या पैकी कुणाला जायचे असेल तर खुशाल जाऊ शकता. संकटं येतात आणि संकटं जातात. मी खंबीर आहे. आपण पुन्हा सत्तेत येणार आहोत, असं सांगतानाच माझा काही स्वार्थ नाही. मला निवडणूक लढवायची नाही, असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

विदर्भावर नजर

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्रीवर आढावा बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत विदर्भातील लोकसभेच्या जागांचा आढावा घेतला जाणार आहे. शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच इतर मतदारसंघावरही चर्चा होणार आहे. या बैठकीत अकोला लोकसभा मतदारसंघ वंचितसाठी सोडण्यावरही चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे मातोश्रीवरील आजच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

नगर जिल्ह्यात बळ वाढले

दरम्यान, आता ठाकरे गटात इनकमिंग सुरू झाली आहे. माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी काल ठाकरे गटात प्रवेश केला. त्यामुळे नगर जिल्ह्यात ठाकरे गटाचं बळ वाढलं आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली. चुकीला माफी आहे, परंतु पाप करणाऱ्यांना मात्र गाडायचे आहे. शिवसेना संपवण्याची भाषा करणाऱ्यांनी हिंमत असेल तर निवडणुकीच्या मैदानात उतरावे. आमचे शिवसैनिक त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराच उद्धव ठाकरे यांनी दिला होता.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.