AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महात्मा गांधींवर वादग्रस्त ट्वीट केलेल्या निधी चौधरींची बदली

मुंबई : महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त ट्वीट केल्यामुळे अडचणीत सापडलेल्या आयएएस अधिकारी निधी चौधरी यांची बदली करण्यात आली आहे. महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीनिमित्त गांधींना नोटेवरुन काढायला हवे. त्यांचे जगभरातील पुतळे हटवायला पाहिजे, असं वादग्रस्त वक्तव्य मुंबई महापालिकेच्या उपायुक्त निधी चौधरी यांनी केलं होतं. विशेष म्हणजे निधी यांच्या ट्वीटच्या शेवटी  नथूराम गोडसेंनी 30 जानेवारी 1948 रोजी गांधी हत्या केल्याबद्दल […]

महात्मा गांधींवर वादग्रस्त ट्वीट केलेल्या निधी चौधरींची बदली
| Edited By: | Updated on: Jun 03, 2019 | 9:07 PM
Share

मुंबई : महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त ट्वीट केल्यामुळे अडचणीत सापडलेल्या आयएएस अधिकारी निधी चौधरी यांची बदली करण्यात आली आहे. महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीनिमित्त गांधींना नोटेवरुन काढायला हवे. त्यांचे जगभरातील पुतळे हटवायला पाहिजे, असं वादग्रस्त वक्तव्य मुंबई महापालिकेच्या उपायुक्त निधी चौधरी यांनी केलं होतं. विशेष म्हणजे निधी यांच्या ट्वीटच्या शेवटी  नथूराम गोडसेंनी 30 जानेवारी 1948 रोजी गांधी हत्या केल्याबद्दल आभारही मानले होते. त्यामुळे यावर अनेकांनी तीव्र आक्षेप घेतला होता. या ट्वीटनंतर अनेकांनी निधी यांना सोशल मीडियावर ट्रोल केलं होतं. मात्र आज निधी चौधरी यांच्यावर कारवाई करत त्यांची बदली करण्यात आली आहे.

“गांधींची 150 वी जयंती साजरी केली जात आहे. हीच योग्य वेळ आहे गांधींचा फोटो नोटेवरुन काढून टाकण्यासाठी आणि जगभरातील त्यांचे पुतळे हटवण्यासाठी. आता आपल्याला एक खरी श्रद्धांजली देण्याची गरज आहे. धन्यवाद गोडसे 30. 01.1948 साठी”, असं ट्वीट निधी चौधरी यांनी केलं होतं.

निधी चौधरी मुंबई महापालिकेच्या उपायुक्त म्हणून कार्यरत होत्या. मात्र या ट्वीटनंतर महाराष्ट्र सरकारने निधी चौधरी यांना नोटीस पाठवली आहे. या नोटीसनुसार निधी यांची मंत्रालयात बदली करण्यात आली आहे.

राष्ट्रवादीचा विरोध 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या ट्वीटचा कडाडून विरोध केला होता. तसेच निधी यांचे निलंबन करावे, अशी मागणी केली होती. “गांधींजींविरोधात अपमानास्पद वक्तव्य केल्याने आम्ही निधी चौधरी यांच्या निलंबनाची मागणी करतो. त्यांनी गांधींचा हत्यारा नथूराम गोडसेचे आभार मानले आहे. हे कधीही सहन केले जाणार नाही”, असं राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले.

दरम्यान यानंतर “शासकीय सेवेतील एका जबाबदार अधिकार्‍याने अशी जाहीरपणे भूमिका घेणे हे लांछनास्पद आहे. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांवर मुख्यमंत्र्यांनी सक्त कारवाई करावी,” असे ट्वीट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. शरद पवारांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना याबाबत पत्र लिहीले होतं.

सर्वच स्तरातुन टीका झाल्यानंतर निधी यांनी हे ट्वीट व्यंगात्मक होते, मात्र काही लोकांनी चुकीच्या पद्धतीने सर्वांसमोर हे ट्वीट मांडलं असं स्पष्टीकरण दिलं होतं. त्यानंतर तातडीने निधी चौधरी यांनी हे ट्विट डिलीट केलं होतं.

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.