AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई, ठाणे, पालघरसह रायगडला मुसळधार पाऊस झोडपणार; IMD कडून अलर्ट जारी

IMD Rain Alert : राजधानी मुंबई आणि उपनगरात पावसाच्या सरी कोसळत आहेत. अशातच आता पुढील काही दिवस मुंबई आणि आसपासच्या भागात मुसळधार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मुंबई, ठाणे, पालघरसह रायगडला मुसळधार पाऊस झोडपणार; IMD कडून अलर्ट जारी
Mumbai MMR Region Rain AlertImage Credit source: Google
| Updated on: Jul 30, 2026 | 9:12 PM
Share

राज्याच्या विविध भागात पावसाला सुरुवात झाली आहे, राजधानी मुंबई आणि उपनगरात पावसाच्या सरी कोसळत आहेत. अशातच आता पुढील काही दिवस मुंबई आणि आसपासच्या भागात मुसळधार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. उद्या मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यातील ठाणे, पालघर आणि रायगडला आँरेज अलर्ट तर मुंबईला उद्या यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच समुद्र किनारी 50 ते 60 किलोमीटर प्रति वेगाने वारे वाहण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे.

पुढील 4 दिवस कशी असेल पावसाची स्थिती

मुंबई शहरात 30 जुलै रोजी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची आणि ताशी 50-60 किमी वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. 31 जुलै रोजी तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची आणि ताशी 50-60 किमी वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. तर 1 ऑगस्ट रोजी मध्यम पाऊस आणि 2 आणि 3 ऑगस्ट रोजी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

ठाणे

ठाणे जिल्ह्यात 30 जुलै रोजी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस आणि ताशी 50-60 किमी वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. 31 जुलै रोजी तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता असून वाऱ्याचा वेग ताशी 70 किमी पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. ठाण्यात 1 ऑगस्ट रोजी मध्यम पाऊस तर 2 आणि 3 ऑगस्ट रोजी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पालघर

पालघर जिल्ह्यात 30 जुलै रोजी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी 40-50 किमी वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. 31 जुलै रोजी काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस आणि ताशी 50-60 किमी वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. 1 ऑगस्ट रोजी मध्यम पाऊस तर 2 आणि 3 ऑगस्ट रोजी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

रायगड

रायगड जिल्ह्यात 30 जुलै रोजी अनेक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची आणि ताशी 50-60 किमी वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. 31 जुलै रोजी काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस आणि ताशी 70 किमीपर्यंत सोसाट्याचा वारा वाहण्याचा इशारा देण्यात आला आहे. तर 1 ऑगस्ट रोजी मध्यम पाऊस तर 2 ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच 3 ऑगस्ट रोजी मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

नागरिकांना इशारा

भारतीय हवामान विभागाच्या (IMD) मते, पुढील पाच दिवस चारही जिल्ह्यांमध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने लोकांना खराब हवामानात सतर्क राहण्याचा आणि समुद्रकिनारे, पाणी साचलेली ठिकाणे व मोकळ्या जागांवर अनावश्यक हालचाल टाळण्याचा सल्ला दिला आहे.

Follow Us
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर... गुलाबराव पाटलांचं वक्तव्य पुन्हा..
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावरच... गुलाबराव पाटलांचं वक्तव्य पुन्हा चर्चेत
बुलेटमधील लोखंडी रॉड, हातातील कडा अन्... बड्या मंत्र्याच्या भावाला...
बुलेटमधील लोखंडी रॉड, हातातील कडा अन्... बड्या मंत्र्याच्या भावाला मारहाणीचं वेगळंच कारण समोर
1 हजार 800 कोटींचा निधी मंजूर; महारष्ट्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय;
1 हजार 800 कोटींचा निधी मंजूर; महारष्ट्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय; नगरविकास विभागाकडून...
जरांगेंच्या उपोषणाचा 14 वा दिवस; तोडगा निघणार?
Manoj Jarange | जरांगेंच्या उपोषणाचा 14 वा दिवस; तोडगा निघणार?
राजीनामा झाल्याशिवाय शांत बसायचं नाही; बड्या नेत्याची...
राजीनामा झाल्याशिवाय शांत बसायचं नाही; बड्या नेत्याची... राज्यात पुन्हा नव्या राजीनाम्याची मागणी
राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी...
SMA | राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!
अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी!
BJP VS Shiv Sena | अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी! शिवसेना-भाजप आमनेसामने
पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर..
MPSC Studant | पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर पडताच गाडीत कोंबलं; नेमकं काय घडलं?
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये; पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट समोर
जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल..
Vikhe Patil on Manoj Jarange | जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल आल्यानंतर...