Mumbai : नव्या सरकारच्या निर्णयाचा फटका; मुंबई महापालिकेसाठी नव्याने आरक्षण सोडत, लाखो रुपयांचा चुरडा

महाविकास आघाडी सरकारने मुंबई महापालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) नगरसेवकांची संख्या 236 करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता नव्या सरकारने हा निर्णय रद्द करत नगरसेवकांची संख्या 227 ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Mumbai : नव्या सरकारच्या निर्णयाचा फटका; मुंबई महापालिकेसाठी नव्याने आरक्षण सोडत, लाखो रुपयांचा चुरडा
Follow us
| Updated on: Aug 05, 2022 | 7:14 AM

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेतून (Shiv Sena) बंडखोरी केल्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले. राज्यात शिंदे आणि भाजपाचे नवे सरकार स्थापन झाले. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तेव्हापासून महाविकास आघाडी सरकाराच्या काळात जे निर्णय घेण्यात आले आहेत, ते रद्द करण्याचा धडाकाच नव्या सरकारने लावला आहे. महाविकास आघाडी सरकारने घेतलेले अनेक निर्णय आतापर्यंत रद्द करण्यात आले आहेत. महाविकास आघाडी सरकारने मुंबई महापालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) नगरसेवकांची संख्या 236 करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता नव्या सरकारने हा निर्णय रद्द करत महापालिकेतील नगरसेवकांची संख्या ही पूर्वी इतकीच म्हणजे 227 ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लाखो रुपयांचा चुरडा होणार आहे. आतापर्यंत निवडणूक प्रक्रियेवर झालेला 50 लाखांचा खर्च वाया जाणार आहे. नगरसेवकांची संख्या कमी केल्याने पुन्हा एकदा प्रभाग रचना मतदार याद्या तसेच आरक्षण सोडत देखील नव्याने काढावी लागणार आहे.

पुन्हा नव्याने प्रक्रिया

महाविकास आघाडी सरकारने मुंबई महापालिकेतील नगरसेवकांची संख्या 236 करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सर्व तयारी करण्यात आली होती. आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली होती. मतदान याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. प्रभाग संरचना ठरवण्यात आली होती. या सर्व प्रक्रियेवर जवळपास 50 लाखांचा खर्च झाला होता. मात्र आता नवे सरकार येताच त्यांनी महाविकास आघाडीचा हा निर्णय रद्द करत महापालिकेतील नगरसेवकांची संख्या 236 वरून 227 इतकी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता पुन्हा नव्याने प्रभाग संरचना ठरवावी लागणार आहे. मतदान याद्या प्रसिद्ध कराव्या लागणार आहेत. एवढेच नव्हे तर नव्याने आरक्षण सोडत देखील जाहीर करावी लागणार आहे. यासाठी पुन्हा लाखो रुपयांचा खर्च होणार आहे.

हे सुद्धा वाचा

अनेक निर्णयांना स्थगिती

राज्यात शिंदे, भाजपचे सरकार येताच महाविकास आघाडी सरकारच्या काळात घेण्यात आलेल्या अनेक निर्णयांना स्थगिती देण्यात आली आहे. त्यामध्ये मेट्रोचे कार शेड कांजूर मार्गवरून आरेमध्ये करणे, स्थानिक स्वराज्य संस्थाना मंजूर झालेल्या निधीला स्थगिती देणे. अशा अनेक निर्णयांचा समावेश आहे.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.