AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा रखडला, सर्वोच्च न्यायालयाच्या सत्तासंघर्षावरील निर्णयानंतरच विस्तार होणार- सूत्र

5 ऑगस्टला मंत्रिमंडळ विस्तार होईल आणि नवे मंत्र्याचा राजभवनात शपथविधी होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयाने पुढील सुनावणी 8 ऑगस्टला ठेवली आहे. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

Maharashtra Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा रखडला, सर्वोच्च न्यायालयाच्या सत्तासंघर्षावरील निर्णयानंतरच विस्तार होणार- सूत्र
| Edited By: sagar joshi | Updated on: Aug 04, 2022 | 8:40 PM
Share

मुंबई : राज्यातील एकनाथ शिंदे सरकारला एक महिना उलटून गेला तरी अद्याप मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) होऊ शकला नाही. त्यावरुन विरोधकांकडून शिंदे आणि फडणवीस सरकारवर (Shinde-Fadnavis Government) जोरदार टीका केली जातेय. अशावेळी 5 ऑगस्टला मंत्रिमंडळ विस्तार होईल आणि नवे मंत्र्याचा राजभवनात शपथविधी होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) पुढील सुनावणी 8 ऑगस्टला ठेवली आहे. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. त्यामुळे आता सोमवारनंतरच मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय.

मंत्रिमंडळाच्या याद्या जवळपास निश्चित, केसरकरांचा दावा

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत विचारलं असता दीपक केसरकर यांनी सावध प्रतिक्रिया दिलीय. केसरकर म्हणाले की, मला ज्या प्रमाणे वरिष्ठ सांगतात तसं मी सांगत असतो. चार दिवसात होईल अस सांगितलं तेव्हा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. काही कारणामुळे मंत्रिमंडळ विस्ताराचा वेळ वाढला. मुख्यमंत्री राज्यपालांना कळवतील तेव्हाच विस्तार होईल. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या दिल्लीच्या वाऱ्या वाढल्या म्हणजे मंत्रिमंडळाच्या याद्या जवळपास निश्चित होत असतात. मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राज्यपालांना कळवतील, असंही केसरकर यांनी सांगितलं. महत्वाची बाब म्हणजे केसरकर यांनी कालच रविवारपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होईल असा दावा केला होता. मात्र, आता विस्ताराबाबत ते सावध वक्तव्ये करत असल्याचं पाहायला मिळतंय.

मुनगंटीवारांनी दिली नवी तारीख

आमदारांच्या अपात्रतेवरील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्यामुळं मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख पुन्हा वाढल्याची माहिती आहे. यासंदर्भातील माहिती माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी ध्वजारोहण असल्याने 15 ऑगस्टपूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी अपेक्षा मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

शिंदे आजारी, फडणवीसांची दिल्ली वारी

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सत्तापालटानंतर सातत्यानं दौऱ्यावर आहेत. त्यामुळे त्यांना थकवा जाणवू लागलाय. अशावेळी डॉक्टरांकडून त्यांना आराम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडून आपले सर्व प्रशासकीय आणि राजकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अचानक दिल्लीला रवाना झाले. तिथे ते केंद्रीय मंत्री अमित शाह आणि भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतील. तिथे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी आणि मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होईल, अशी माहिती मिळतेय.

Follow Us
द्रुतगती महामार्गावर पावसामुळे रस्ता निसरडा; प्रवासी बस घसरली
Pune-Mumbai : द्रुतगती महामार्गावर पावसामुळे रस्ता निसरडा; प्रवासी बस घसरली
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
Sunetra Pawar | बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
मुंबईत नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना..
मुंबईत PM नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना आवाहन
ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे, पुढील 3 तास
Weather Update : पुढील 3 तास महत्त्वाचे, ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, थेट..
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, गाडी थेट...
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या...
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या गंभीर आरोपांमागे...
मुंबईत संततधार; विमानतळ परिसरात साचलं पाणी
Mumbai Rain Updates | मुंबईत संततधार; विमानतळ परिसरासह इतर भागांत साचलं पाणी
ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
India And China Agreement | ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार