AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cm Eknath Shinde : 5 ऑगस्टला शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, राजभवनात नव्या मंत्र्यांचा शपथविधी

येत्या 5 ऑगस्टला मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. तसेच नव्या मंत्र्यांचा शपथविधी हा राजभवनात पार पडणार आहे, असे हे सांगण्यात आले आहे.

Cm Eknath Shinde : 5 ऑगस्टला शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, राजभवनात नव्या मंत्र्यांचा शपथविधी
एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस,
| Updated on: Aug 03, 2022 | 7:37 PM
Share

मुंबई : राज्यात एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांनी नवे मुख्यमंत्री म्हणून तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शपथ घेऊन एक महिना उलटून गेला. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? असा सवाल रोज विरोधकांकडून विचारण्यात येत आहे. त्यावरून सणसणीत टीकाही होत आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला घाबरून हे सरकार मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) करत नाही, त्यामुळे राज्याातील जनतेची कामं वेळेवर होत नाहीत. हे सरकार बेकायदेशी आहे. तसेच एक दुजे के लिए असाच यांचा कार्यक्रम दोघांचा चाललेला आहे ,अशी ही टीका होत असतानाच आता मंत्रिमंडळ विस्ताराबाबत एक मोठी बातमी समोर आलेली आहे. येत्या 5 ऑगस्टला मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. तसेच नव्या मंत्र्यांचा शपथविधी हा राजभवनात पार पडणार आहे, असे हे सांगण्यात आले आहे.

रविवारपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार

आजच शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मोठं विधान केलं होतं. मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या रविवारपर्यंत नक्की होईल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबतची अधिकृत घोषणा करतील, अशी माहिती दीपक केसरकर यांनी दिली होती.

मुख्यमंत्री तारीख जाहीर करतील

लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार देखील होईल, परंतु त्याची तारीख जाहीर करण्याचा अधिकार मला नाही आहे, तो आमच्या मुख्यमंत्र्यांना आहे, लवकरच महाराष्ट्रात भाजप आणि सेना युतीच मंत्रिमंडळ स्थापन होईल, अशी माहिती शंभुराज देसाई यांनीही दिली होती.

याचिकांवर उद्याच सुनावणी

आजच सुप्रीम कोर्टात एकनाथ शिंदे यांच्या विरोधात शिवसेनेकडून करण्यात आलेल्या याचिकांवर सुनावणी पार पडली आहे. यावेळी दोन्ही बाजूने खमासान युक्तीवाद झाला. त्यानंतर कोर्टाने दोघांच्या बाजू ऐकून घेऊन या प्रकरणाची पुढील सुनावणी ही उद्याच ठेवली आहे. त्यामुळे उद्या या प्रकरणात काही महत्त्वाचा निर्णय आल्यास त्यावर ही मंत्रिमंडळ विस्ताराची दिशा अवलंबून आहे.

विस्तारावरून विरोधी पक्षनेते आक्रमक

तर मंत्रिमंडळ विस्तारावरून गेल्या अनेक दिवसापासून राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराला विलंब होत असल्याने शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मदतीलाही विलंब होत आहे. असेही अजित पवार यांच्याकडून वारंवार सांगण्यात येत आहे, तसेच महाविकास आघाडीतील पक्षही यावरूनच या सरकारवर सडकून टीका करत आहेत. त्यामुळे आता तरी मंत्रिमंडळ विस्तारला मुहूर्त मिळणार का? असा सवाल उपस्थित झालाय.

BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.