वाहतुकीचे नियम मोडल्यास तीन महिने लायसन्स रद्द

वाहतुकीचे नियम मोडल्यास तीन महिने लायसन्स रद्द

मुंबई: वाहतुकीचे नियम भंग करणाऱ्यांवर आता कडक कारवाई होणार आहे. वाहतुकीच्या नियमांचा भंग केल्यास 3 महिन्यांसाठी ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित होणार आहे. वाहतूक अप्पर पोलीस महासंचालक यांनी याबाबत संबंधित विभागाला कारवाईचे निर्देश दिले.

यानुसार सिग्नल न पाळल्यास, वेग मर्यादा ओलांडली तर, क्षमतेपेक्षा जास्त वजन वाहनात भरल्यास किंवा वाहन चालवताना मोबाईलवर बोलताना आढळल्यास 3 महिन्यांसाठी ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित होणार आहे. त्यामुळे यापुढे वाहनचालकांना काटेकोरपणे वाहतुकीचे नियम पाळावेच लागणार आहेत.

रस्ता सुरक्षा समितीच्या नवी दिल्ली येथील 12 नोव्हेंबर रोजीच्या आढावा बैठकीला राज्याचे मुख्य सचिव उपस्थित होते. यावेळी राज्यातील अपघात आणि अपघातांमधील जखमी-मृतांचे प्रमाण वाढल्याने चिंता व्यक्त करण्यात आली. तसेच पोलीस विभागातर्फे वाहतुकीचे नियम भंग करणाऱ्या वाहन चालकांचे ड्राईव्हिंग लायसन्स निलंबित करण्यासाठी परिवहन कार्यालयास पाठविण्यात आलेली प्रकरणे अत्यंत नगण्य असल्याने समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

ट्रॅफिकचे नियम पाळा, अन्यथा लायसन्स रद्द :

-मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहन चालविणे

-सिग्नल न पाळणे

-क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक करणे,

-मालवाहू वाहनातून प्रवासी वाहतूक करणे

-दारु पिऊन वाहन चालवणे,

-वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI