“मनुस्मृतीविरोधात आता स्त्रियांनीच उठाव करावा”; राष्ट्रवादीच्या नेत्यानं त्या ग्रंथातील महिलांचं स्थान दाखवलं

मनुस्मृती हे चातुर्वण्य व्यवस्थेची समर्थन करणारी आहे. आणि मनुस्मृतीची विचारसरणी ही आपल्या माता भगिनींसाठी घातक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

मनुस्मृतीविरोधात आता स्त्रियांनीच उठाव करावा; राष्ट्रवादीच्या नेत्यानं त्या ग्रंथातील महिलांचं स्थान दाखवलं
Follow us
| Updated on: Feb 22, 2023 | 12:13 AM

मुंबईः गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड वेगवेगळ्या कारणामुळे सतत चर्चेत आले आहेत. ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याची आव्हाडांच्या मुलीला आणि त्यांच्या जावयाला मारण्याच्या धमकीमुळे राजकीय वातावरण तापले होते. तर आज बनारस हिंदू युनिव्हर्सिटीची एक जाहिरात आली आहे, प्रोजेक्ट फेलोशिपसाठी ‘Applocability of Manusmruti in Indian Society’ या जाहिरातीमुळे आता जितेंद्र आव्हाड यांनी विरोधसकांसह मनुस्मृतीचे समर्थन करणाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

या जाहिरातीबद्दल बोलताना त्यांना म्हटले आहे की, मनुस्मृतीची ही संकल्पांना संविधानाने बाहेर फेकली आहे. त्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान निर्माण करताना महाडमध्ये मनुस्मृती जाळून त्याबद्दल आपला राग व्यक्त केला असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

मनुस्मृतीवर टीका करताना जितेंद्र आव्हाड यांनी त्या मनुस्मृतीचा इतिहास सांगितला आहे. मनुस्मृती हे चातुर्वण्य व्यवस्थेची समर्थन करणारी आहे. आणि मनुस्मृतीची विचारसरणी ही आपल्या माता भगिनींसाठी घातक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

मनुस्मृतीनुसार स्त्री ही वासनेने वखवखलेली असते. त्यामुळे तुम्ही मनुस्मृतीचं स्वागत करणार असाल, तर आपल्या आईबद्दल असा विचार कराल का असा सवाल उपस्थित करून त्यांनी स्त्री ही फक्त उपभोगाची वस्तू असते असं मननस्मृतीत सांगितले असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

त्याचबरोबर मनुस्मृतीमध्ये दलित, क्षुद्र यांच्याबद्दल काय त्यामध्ये काय म्हटले आहे त्याबद्दल सोडून दिलेलेच बरे आहे. मात्र आईच्या मनात वासना असते हे म्हटलेलं कुणाला आवडेल? असा सवाल जितेद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.

ज्या मनुस्मृतीने चातुर्वण्य व्यवस्थेचे समर्थन केले आहे, स्त्रीयांना हीन लेखले आहे. त्या – मनुस्मृतीची चिरफाड करून बाबासाहेबांनी संविधान आणलं आहे.

भारतात स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळाला आहे आणि जो पाश्चिमात्य देशात उशिरा मिळाला. त्यामुळे आता याविरोधात स्त्रियांनी उठाव केला पाहिजे असे आवाहन करत त्यांनी मनुस्मृती स्त्रियांना स्थानच देत नसल्याने त्याचा विचार आता महिलांनी करणे गरजेचे आहे असंही त्यांनी म्हटले आहे.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.