आदित्य ठाकरे यांच्यावर मध्यरात्री गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण

Shivsena aditya thackeray | शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर शुक्रवारी मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेकायदेशीर जमाव जमवून पुलाचे उद्घघाटन केल्या प्रकरणात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे आदित्य ठाकरे अडचणीत आले आहे.

आदित्य ठाकरे यांच्यावर मध्यरात्री गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण
Follow us
| Updated on: Nov 18, 2023 | 9:37 AM

निवृत्ती बाबर, मुंबई | 18 नोव्हेंबर 2023 : शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे अडचणीत येणार आहे. आदित्य ठाकरे यांच्यावर मुंबईतील एन एम जोशी पोलीस स्थानकात शुक्रवारी मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला. मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी हा गुन्हा दाखल केला. बेकायदेशीर जमाव जमवून पुलाचे उद्घाटन केल्या प्रकरणात आदित्य ठाकरे आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुलाची चाचणी झाली नसतानाही आदित्य ठाकरे यांनी पुलाचे उद्धघाटन केले आहे. यामुळे आदित्य ठाकरे यांच्यासोबत शिवसेना पदाधिकारी सुनिल शिंदे, सचिन अहिर यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण

मुंबईतील लोअर परळ उड्डाणपुलाची एक मार्गिका सुरु करण्यात आली होती. परंतु दुसऱ्या मार्गिकेचे काम सुरु होते. हा पूल सुरु करण्यासंदर्भातील यापूर्वी अनेकवेळा डेडलाइन दिल्या होत्या. परंतु पुलाच्या दुसऱ्या मार्गिकेचे काम अजूनही पूर्ण झाले नव्हते. हे काम रखडल्यामुळे गुरुवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उद्घाटन करण्यात आले.

हे सुद्धा वाचा

आदित्य ठाकरे यांच्यावर गुन्हा

पुलाच्या उद्घाटन कार्यक्रमास आदित्य ठाकरे उपस्थित होते. त्यानंतर लोअर परेल पुलाच उद्घाटन केल्याप्रकरणी आदित्य ठाकरे आणि ठाकरे गटाचे नेते आणि पदाधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी मुंबई पालिकेचे दोन अधिकारी एन एम जोशी पोलीस स्थानकात रात्री 11 वाजून 45 मिनिटांनी दाखल झाले होते. रात्री तीन वाजेपर्यंत हे अधिकारी पोलीस ठाण्यात आले होते. पोलिसांनी या दोन अधिकाऱ्यांचा जबाब नोंदवला. त्यानंतर आदित्य ठाकरे आणि इतर पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुलाचे काम अपूर्ण असताना बेकायदेशीपणे उद्घाटन कसे केले? आम्ही तीन, चार दिवसांत काम पूर्ण करुन ही मार्गिका सुरु करणार होतो, अशी भूमिका मुंबई मनपाने घेतली आहे.

पुलांवरील कामांना वेग

लोअर परळ उड्डाणपुलाचे उद्घाटन गुरूवारी आदित्य ठाकरे यांनी उद्घाटन केले होते. त्यानंतर पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी चार दिवसांत पूल सुरु करण्याचे आदेश दिले आहे. तसेच मुंबई महानगरपालिकेकडून राहिलेल्या कामांना वेग देण्यात आला. पुलावर रंगकाम सुरु आहे. तसेच फायनल टचेस देण्याची कामे सुरू आहेत.

कोणती कलमे लावली

एन. एम. जोशी मार्ग पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात आदित्य ठाकरे, सुनील शिंदे, सचिन अहिर, किशोरी पेडणेकर आणि स्नेहल आंबेकर हे मुख्य आरोपी आहेत. तसेच इतर १५ ते २० अनोळखी लोकांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय.

  • कलम १४३ – बेकायदेशीर जमाव जमवणे
  • कलम १४९ – समान उद्दिष्ट साधण्यासाठी जमाव जमवणे
  • कलम ३३६ – लोकांच्या जीवितास धोका निर्माण होईल असे कृत्य करणे
  • कलम ४४७ – गुन्हेगारी उद्देशाने केलेले अतिक्रमण
Non Stop LIVE Update
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.
कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी, कशेडी बोगद्यातून तुम्ही प्रवास करताय?
कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी, कशेडी बोगद्यातून तुम्ही प्रवास करताय?.
शिंदेंच्या उमेदवारांची ठाकरे गटाशी थेट लढत, शिंदेंनी कुणाला दिली संधी?
शिंदेंच्या उमेदवारांची ठाकरे गटाशी थेट लढत, शिंदेंनी कुणाला दिली संधी?.
चिन्ह वेगळं, नावात साम्य, तुतारीवरून संभ्रम? कोल्हेंचा हल्लाबोल काय?
चिन्ह वेगळं, नावात साम्य, तुतारीवरून संभ्रम? कोल्हेंचा हल्लाबोल काय?.
2 दिवसात 6 सभा... मुस्लीम आरक्षण ते मंगळसूत्र, मोदींची काँग्रेसवर टीका
2 दिवसात 6 सभा... मुस्लीम आरक्षण ते मंगळसूत्र, मोदींची काँग्रेसवर टीका.
भटकती आत्मा... लोकसभेचा प्रचार तापला, मोदींची शरद पवारांवर सडकून टीका
भटकती आत्मा... लोकसभेचा प्रचार तापला, मोदींची शरद पवारांवर सडकून टीका.