प्रवाशांनो इकडं लक्ष द्या, मुंबई पुण्यातून सुटणाऱ्या विशेष गाड्यांना मुदतवाढ, वाचा कोणत्या रेल्वेगाड्या सुरु राहणार?

भारतीय रेल्वेकडून सुरु करण्यात आलेल्या विशेष गाड्या सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना संसर्गाच्या काळात रेल्वे विभागाकडून विशेष गाड्या सुरु करण्यात आल्या होत्या.

प्रवाशांनो इकडं लक्ष द्या, मुंबई पुण्यातून सुटणाऱ्या विशेष गाड्यांना मुदतवाढ, वाचा कोणत्या रेल्वेगाड्या सुरु राहणार?
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Sep 30, 2021 | 6:26 PM

मुंबई: भारतीय रेल्वेकडून सुरु करण्यात आलेल्या विशेष गाड्या सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना संसर्गाच्या काळात रेल्वे विभागाकडून विशेष गाड्या सुरु करण्यात आल्या होत्या. मध्य रेल्वे अंतर्गत येणाऱ्या विशेष रेल्वे गाड्यांना मुदतवाढ दिल्याची माहिती देण्यात आली आहे.मध्य रेल्वेने पुढील आदेशापर्यंत खालील विशेष गाड्यांचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

गाड्यांचा तपशील पुढीलप्रमाणे:

• 02107 लोकमान्य टिळक टर्मिनस – लखनऊ विशेष (सोमवार, बुधवार, शनिवार) दि. 1.11.2021 ते 30.3.2022 पर्यंत चालवण्यासाठी मुदतवाढ.

• 02108 लखनऊ- लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष (मंगळवार, गुरुवार, रविवार) दि. 2.11.2021 ते 31.03.2022 पर्यंत चालवण्यासाठी मुदतवाढ.

• 02165 लोकमान्य टिळक टर्मिनस- गोरखपूर विशेष (सोमवार, गुरुवार, शुक्रवार) दि. 29.10.2021 ते 31.03.2022 पर्यंत चालवण्यासाठी मुदतवाढ

• 02166 गोरखपूर -लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष (मंगळवार, शुक्रवार, शनिवार) दि. 30.10.2021 ते 01.04.2022 पर्यंत चालवण्यासाठी मुदतवाढ.

• 01079 लोकमान्य टिळक टर्मिनस – गोरखपूर विशेष (गुरुवार) दि. 04.11.2021 ते 31.03.2022 पर्यंत चालवण्यासाठी मुदतवाढ.

• 01080 गोरखपूर -लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष (शनिवार) दि. 6.11.2021 ते 2.3.2022 पर्यंत चालवण्यासाठी मुदतवाढ.

• 02101 लोकमान्य टिळक टर्मिनस – शालीमार (सध्या हावडा) विशेष (सोमवार, मंगळवार, शुक्रवार, शनिवार) दि. 1.11.2021 ते 29.03.2022 पर्यंत चालवण्यासाठी मुदतवाढ.

• 02102 शालीमार (सध्या हावडा) – लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष (सोमवार, बुधवार, गुरुवार, रविवार) दि. 3.11.2021 ते 31.03.2022 पर्यंत चालवण्यासाठी मुदतवाढ.

• 01033 पुणे-दरभंगा विशेष (बुधवार) दि. 3.11.2021 ते 30.03.2022 पर्यंत चालवण्यासाठी मुदतवाढ.

• 01034 दरभंगा-पुणे विशेष (शुक्रवार) दि. 5.11.2021 ते 01.04.2022 पर्यंत चालवण्यासाठी मुदतवाढ.

• 01407 पुणे- लखनऊ विशेष (मंगळवार) दि. 02.11.2021 ते 29.03.2022 पर्यंत चालवण्यासाठी मुदतवाढ.

• 01408 लखनऊ- पुणे विशेष (गुरुवार) दि. 4.11.2021 ते 31.03.2022 पर्यंत चालवण्यासाठी मुदतवाढ.

• 01115 पुणे- गोरखपूर विशेष (गुरुवार) दि. 4.11.2021 ते 31.03.2022 पर्यंत चालवण्यासाठी मुदतवाढ.

• 01116 गोरखपूर- पुणे विशेष (शनिवार) दि. 06.11.2021 ते 02.04.2022 पर्यंत चालवण्यासाठी मुदतवाढ.

02135 पुणे- मांडुआडीह विशेष (सोमवार) दि. 1.11.2021 ते 28.03.2022 पर्यंत चालवण्यासाठी मुदतवाढ.

• 02136 मंडुआडीह- पुणे विशेष (बुधवार) दि. 03.11.2021 ते 30.03.2022 पर्यंत चालवण्यासाठी मुदतवाढ.

02099 पुणे- लखनऊ विशेष (मंगळवार) दि. २.११.२०२१ ते २९.३.२०२२ पर्यंत चालवण्यासाठी मुदतवाढ.

• 02100 लखनऊ- पुणे विशेष (बुधवार) दि. 03.11.2021 ते 30.03.2022 पर्यंत चालवण्यासाठी मुदतवाढ.

प्रवाशांनी कृपया याची नोंद घ्यावी:

दि. 2.11.2021 पासून लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटणारी ट्रेन क्र .02101 आता शालिमार येथे संपुष्टात येईल आणि दि. 04.11.2021 पासून शालीमार येथून सुटेल.

या विशेष गाड्यांच्या संरचना, थांबे आणि वेळेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

आरक्षण: लोकमान्य टिळक टर्मिनस आणि पुणे येथून सुटणाऱ्या पूर्ण आरक्षित विशेष गाड्यांच्या विस्तारित सहलीचे विशेष शुल्कासह बुकिंग दि. 02.10.2021 रोजी www.irctc.co.in या संकेतस्थळावर व सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर सुरू होईल.

तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES अ‍ॅप डाउनलोड करा. कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच बोर्डिंग, प्रवास आणि गंतव्यस्थानादरम्यान कोविड १९ शी संबंधित सर्व नियमांचे, एसओपीचे पालन करून या विशेष ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी असेल, असं मध्य रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे.

इतर बातम्या:

MPSC कडे रिक्त पदांची माहिती देण्याची डेडलाईन हुकली, सरकारी विभागांची धावपळ सुरु

VIDEO: जलयुक्त शिवारमुळे महापूर आला असं म्हणणं हस्यास्पद; चंद्रकांत पाटील यांचा दावा

Indian Railways Central Railway decided to continue special railways which departs from Mumbai and Pune

Non Stop LIVE Update
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय.
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?.
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?.
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात.