मुंबई: जलयुक्त शिवारामुळे राज्यात महापूर येत असल्याचं मत पर्यावरतज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांनी व्यक्त केलं होतं. त्यावरून सत्ताधाऱ्यांनी भाजपला घेरलेलं असतानाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यावर प्रत्युत्तर दिलं आहे. जलयुक्त शिवारच्या तांत्रिक अडचणीमुळे पूर आलेला नाही. महापुरामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं असलं तरी या पावसाच्या निमित्ताने जलयुक्त शिवारची झालेली कामे उपयुक्त आहेत. या पाण्यामुळे शेतकऱ्यांना फायदाच झाला आहे. जलयुक्त शिवारामुळे महापूर आला असं म्हणणं हे हस्यास्पद आहे, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.