सुना है, मेरे घर आज-कल मे सरकारी मेहमान आने वाले है; नवाब मलिकांच्या ट्विटने तर्कवितर्कांना उधाण

सुना है, मेरे घर आज-कल मे सरकारी मेहमान आने वाले है; नवाब मलिकांच्या ट्विटने तर्कवितर्कांना उधाण
नवाब मलिक, प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एक ट्विट केल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत. सुना है, मेरे घर आज-कल मे सरकारी मेहमान आने वाले है, असं नवाब मलिक यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: भीमराव गवळी

Dec 10, 2021 | 11:25 PM

मुंबई: राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एक ट्विट केल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत. सुना है, मेरे घर आज-कल मे सरकारी मेहमान आने वाले है, असं नवाब मलिक यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे मलिक यांच्या घरावर तपास यंत्रणांची धाड पडणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र, मलिक यांनी अधिक भाष्य न करता फक्त सूचक विधान केलं आहे.

साथियों, सुना है, मेरे घर आज-कल मे सरकारी मेहमान आने वाले है, हम उनका स्वागत करते है. डरना मतलब रोज रोज मरना, हमे डरना नहीं, लड़ना है, गांधी लड़े थे गोरों से, हम लड़ेंगे चोरों से, असं मलिक यांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे. माझ्या घरी आज किंवा उद्या सरकारी पाहुणे येणार आहेत. मी त्यांचं स्वागत करतो. घाबरणं रोज मेल्यासारखं आहे. आपल्याला घाबरायचं नाही तर लढायचं आहे. गांधीजी गोऱ्यांसोबत लढले होते. आपल्याला चोरांसोबत लढायचं आहे, असं मलिक यांना म्हणायचं आहे. पण त्यांनी सरकारी पाहुणे कोणत्या यंत्रणेचे येणार हे काही स्पष्ट केलं नाही. त्यामुळे मलिक यांच्या या ट्विटवर तर्कवितर्क लढवले जात आहेत.

मलिक यांचा हल्लाबोल

मलिक यांनी गेल्या काही दिवसांपासून भाजपला चांगलंच धारेवर धरलं होतं. ड्रग्ज प्रकरणात तर त्यांनी काही भाजप नेत्यांची नावे घेऊन त्यांना धारेवर धरलं होतं. तसेच मुंबई क्रुझ ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश करून यंत्रणा कशी भाजपसाठी काम करतेय याची माहिती जनतेसमोर आणली होती. शिवाय मलिक यांनी ड्रग्ज प्रकरणाची पोलखोल करताना देशातील आणि राज्यातील राजकीय घडामोडींवरून भाजपवर सातत्याने निशाणा साधला होता.

राज्यात शिवसेनेकडून संजय राऊत आणि राष्ट्रवादीकडून नवाब मलिक या दोन नेत्यांनीच भाजपवर जोरदार हल्ले चढवण्यास सुरुवात केली आहे. भाजपच्या प्रत्येक हल्ल्याला हे दोनच नेते तत्परतेने उत्तर देत असल्याने भाजप नेत्यांचीही गोची होत आहे. या संपूर्ण पार्श्वभूमीवर मलिक यांच्या या ट्विटने तर्क वितर्क लढवले जात आहेत. यापूर्वीही मलिक यांनी आज ना उद्या आपल्यामागेही तपास यंत्रणा लावल्या जाऊ शकतात असा संशय व्यक्त केला होता. तसेच आपला अनिल देशमुख करण्याचा भाजप आणि तपास यंत्रणांचा डाव असल्याचा आरोपही मलिक यांनी जाहीर पत्रकार परिषदेत केला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती.

संबंधित बातम्या:

मुंबईत आज रात्रीपासून मोर्चे, आंदोलन, रॅलीला परवानगी नाही, पोलिसांचे आदेश जारी; कारण काय?

केदारनाथ ते काश्मीर, ज्या MI 17 मुळे रावतांना जीव गमवावा लागला ते शत्रूचा कर्दनकाळ आहे हे माहितीय?

जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरात दहशतवाद्यांचा पोलिसांवर हल्ला; दोन पोलीस शहीद

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें