AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बोगस बियाणे-खत विक्रेत्यांवर मकोका? पावसाळी अधिवेशनात विधानसभेत घडलं काय? बळीराजाची फसवणूक थांबणार?

MCOCA against sellers of spurious seeds and fertilizers: मान्सून सक्रिय झाल्यापासून राज्यात सर्वदूर समाधानकारक पाऊस पडला आहे. शेतकऱ्यांना आता खरीप पिकाच्या पेरणी करायची आहे. त्यासाठी बि-बियाणे खरेदीसाठी गर्दी होत आहे. त्याचवेळी बोगस बि-बियाणे विक्रेत्यांवर मोठी कारवाईची मागणी रेटण्यात आली आहे.

बोगस बियाणे-खत विक्रेत्यांवर मकोका? पावसाळी अधिवेशनात विधानसभेत घडलं काय? बळीराजाची फसवणूक थांबणार?
बोगस बियाणे-खत विक्रेत्यांवर मकोका
| Updated on: Jun 26, 2026 | 9:50 AM
Share

MCOCA against sellers of spurious seeds and fertilizers: राज्यात सर्वदूर मान्सून सक्रिय झाला आहे. मान्सूनने राज्य व्यापले आहे. दमदार पावसाने शेती मशागतीला आणि पेरणीला वेग आला आहे. दोन दिवसांच्या पावसामुळे शेतकऱ्यांनी बि-बियाणे, खते आणि इतर साहित्य खरेदीसाठी दुकानांकडे मोर्चा वळवला आहे. पण त्याचवेळी बोगस बि-बियाणे, खतांच्या विक्रीचाही धोका आहे. सरकारने अनेकदा कारवाई करून, सक्त नियम करूनही बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांची मोठी फसवणूक होते. तर काही ठिकाणी बि-बियाणे विक्रेत्यांवर कृषी विभागाकडून डोळे झाक होत असल्याची ओरड शेतकऱ्यांमधून होते. त्यातच बोगस बियाणे-खत विक्रेत्यांवर ‘मकोका’ लावा अशी मागणी उद्धव ठाकरे गटाचे आमदार प्रवीण स्वामी यांनी विधानसभेत केली आहे.

या टोळ्यांवर मकोकाच लावा

या पावसाळी अधिवेशनात उमरगा-लोहारा मतदारसंघाचे आमदार प्रवीण स्वामी यांनी शेतकरी प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधले.बोगस बियाणे आणि खतांची निर्मिती व विक्री करणाऱ्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचे सांगत, अशा टोळ्यांवर ‘मकोका’सारखा कठोर कायदा लागू करून कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी विधानसभेत केली. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांना कोणतीही दया न दाखवता कठोर शिक्षा व्हावी, तसेच बोगस बियाणे व खतांचा काळाबाजार कायमचा बंद करण्यासाठी प्रभावी कायदेशीर उपाययोजना कराव्यात, अशीही त्यांनी सरकारकडे मागणी केली आहे. आता सरकार त्यांच्या या मागणीवर यासंबंधी कठोर निर्णय घेते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

HTBT बियाण्यांवर कृषी विभागाचे लक्ष

या खरीप हंगामात बळीराजाची फसवणूक टाळण्यासाठी कृषी विभाग सक्रिय झाला आहे. बोगस बियाणे, खतांचा काळाबाजार आणि अनधिकृत एचटीबीटी- तणनाशक सहनशील बियाणांविरुद्ध कृषी विभागाने कंबर कसली आहे. नियम मोडणाऱ्या विक्रेत्यांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल होणार आहे. एचटीबीटी कापूस बियाणांच्या छुप्या विक्रीवर प्रशासनाची करडी नजर आहे. केंद्र सरकारच्या जीईएससी समितीची मान्यता नसलेली बियाणे ही जमिनीची सुपिकता नष्ट करतात आणि पर्यावरणाला घातक असल्याचे मानले जाते. आशा बियाणांचा साठा आढळल्यास संबंधितांविरोधात आता पर्यावरण संरक्षण कायदा 1986 अंतर्गत कठोर कारवाई केली जाणार आहे.

फुटीर खासदारांना जोरदार टोला

उद्धव ठाकरे हे २८ जून रोजी धाराशिव दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे शिवसेनेचे उमरगा मतदारसंघाचे आमदार प्रवीण स्वामी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. त्यांनी पोस्ट केलेले बॅनर सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. बॅनरवरील “फुटीने बदलतात ते आकडे… शिवसैनिकांची निष्ठा नाही!” असे त्यांचे बॅनर एकदम चर्चेत आले आहे.

या बॅनरमधून त्यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केले आहे “फुटल्याने शिवसैनिकांची निष्ठा बदलणार नाही,” असा स्पष्ट संदेश देत ठाकरे गटाने आपल्या कार्यकर्त्यांना एकजूट राहण्याचे आवाहन केले आहे. या पोस्टमधून दिसून येत आहे. दरम्यान, २८ जून रोजी उद्धव ठाकरे यांच्या धाराशिव दौऱ्यापूर्वी हे बॅनर व्हायरल झाल्याने जिल्ह्यात ठाकरे शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसत आहे

Follow Us
तुम्ही वेळ घ्या, पंतप्रधान तुम्हालादेखील भेटतील; शिंदे गटातील बड्या...
तुम्ही वेळ घ्या, पंतप्रधान तुम्हालादेखील भेटतील; शिंदे गटातील बड्या नेत्याचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला
बापरे! चप्पल, बूट अन् चिखलाचा मारा; ममता बॅनर्जींच्या दौऱ्यादरम्यान
बापरे! चप्पल, बूट अन् चिखलाचा मारा; ममता बॅनर्जींच्या दौऱ्यादरम्यान धक्कादायक घटना, व्हिडीओच आला समोर
जरांगेंना मिरची लागली, ते हवेवर...गुणरत्न सदावर्तेंचा जरांगेंवर संताप
जरांगेंना मिरची लागली, ते हवेवर...गुणरत्न सदावर्ते  मनोज जरांगेंवर भडकले; सडकून टीका!
मोठी बातमी! पुण्यातील नामांकित पबवर कारवाई; तब्बल 62 जणांची...
मोठी खळबळ! पुण्यातील नामांकित पबवर कारवाई; तब्बल 62 जणांची... नेमकी भानगड काय?
रक्तदान महादान! 1200 शिवसैनिकांचा समावेश; दिल्लीत शिवसेनेकडून 'सिंदुर'
रक्तदान महादान! 1200 शिवसैनिकांचा समावेश; दिल्लीत शिवसेनेकडून 'सिंदुर' महारक्तदान शिबीराचे आयोजन
पंढरपूरात मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत! पहा Video
Manoj Jarange Patil | पंढरपूरात मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत! फुलांचा वर्षाव अन्... पहा व्हिडीओ
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार गटातील नेत्याचा एकाच विमानाने प्रवास
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार गटातील बड्या नेत्याचा एकाच विमानाने प्रवास, फोटो आले समोर
मी समाजासाठी जीवघेणं उपोषणही करु शकतो तर कोणाचा जीवही घेऊ शकतो- जरांगे
मी समाजासाठी जीवघेणं उपोषणही करु शकतो तर कोणाचा जीवही... भर मंचावरून मनोज जरांगे कडाडले; आता...
Big Breaking| बारामती विमान दुर्घटनेबाबत मोठी अपडेट समोर
Big Breaking | बारामती विमान दुर्घटनेबाबत मोठी अपडेट समोर; नेमकं काय घडलं? पहा व्हिडीओ