AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिरेन मृत्यू प्रकरणाचा उलगडा करणारे ATS प्रमुख IPS शिवदीप लांडे बिहार केडरमध्ये परतणार, जाणून घ्या नेमकं कारण

शिवदीप लांडे यांनी त्यांचे सासरे माजी राज्यमंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांच्या सल्ल्यावरुन महाराष्ट्र पोलीस दलात रुजू होण्याचा निर्णय घेतला होता. 5 वर्षांच्या प्रतिनियुक्तीच्या कालावधीसाठी शिवदीप लांडे महाराष्ट्र पोलिसांच्या सेवेत दाखल झाले होते.

हिरेन मृत्यू प्रकरणाचा उलगडा करणारे ATS प्रमुख IPS शिवदीप लांडे बिहार केडरमध्ये परतणार, जाणून घ्या नेमकं कारण
शिवदीप लांडे
| Edited By: | Updated on: Nov 27, 2021 | 9:40 AM
Share

मुंबई: मनसूख हिरेन प्रकरणाचा उलगडा करणारे एटीएस प्रमुख IPS शिवदीप लांडे (Shivdeep Lande) यांचा महाराष्ट्रातील प्रतिनियुक्तीचा कालावधी संपल्यानं ते त्यांचं मूळ केडर असलेल्या बिहार पोलिसांच्या (Bihar Police) सेवेत परतणार आहेत. शिवदीप लांडे यांनी त्यांचे सासरे माजी राज्यमंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांच्या सल्ल्यावरुन महाराष्ट्र पोलीस दलात रुजू होण्याचा निर्णय घेतला होता. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर 5 वर्षांच्या प्रतिनियुक्तीच्या कालावधीसाठी शिवदीप लांडे महाराष्ट्र पोलिसांच्या सेवेत दाखल झाले होते. आता त्यांच्या प्रतिनियुक्तीचा कालावधी संपत आल्यानं ते लवकरचं बिहार पोलीस दलात रुजू होतील.

शिवदीप लांडे डिसेंबर 2016 मध्ये महाराष्ट्र पोलीस दलात रुजू

बिहार केडरमधून शिवदीप लांडे डिसेंबर 2016 मध्ये महाराष्ट्र पोलीस दलात दाखल झाल्यानंतर त्यांच्याकडे मुंबई गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोथी पथकाची जबाबदारी देण्यात आली होती. साडे तीन वर्षाच्या कालावधीत त्यांनी अनेक ड्रग्ज माफियांचे कंबरडे मोडले. अमंली पदार्थ विरोधी पथकातील कामगिरीच्या जोरावर शिवदीप लांडे यांना एटीएसची जबाबदारी देण्यात आली होती. एटीएसमध्येही शिवदीप लांडे यांनी चांगली कामगिरी केली होती. युरेनियमचा साठा पकडणे, असो की मनसुख हिरेन ह्त्या प्रकरणाचा छडा लावण्याचं काम शिवदीप लांडे यांच्या टीमनं केलं होतं.

माजी मंत्री विजय शिवतारे यांचे जावई

IPS शिवदीप लांडे हे शिवसेना नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांचे जावई आहेत. शिवदीप हे विजय शिवतारे यांच्या कन्या ममता यांचे पती आहेत. विशेष म्हणजे दोघांचा प्रेमविवाह झाला होता. या दोघांची ओळख एका कॉमन फ्रेंडद्वारे एका पार्टीत झाली होती. तिथे त्यांची भेट झाली. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली आणि पुढे काही दिवसांनी या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यानंतर पुढे दोघांनी लग्न केलं. दोघांना एक मुलगी आहे

सासऱ्यांच्या सांगण्यावरुन महाराष्ट्र पोलीस दलात रुजू होण्याचा निर्णय

शिवदीप लांडे हे 2006 च्या IPS बॅचचे अधिकारी आहेत. त्याआधी त्यांनी इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं होतं. त्यानंतर ते यूपीएससीच्या अभ्यासासाठी मुंबईला आले. त्यांच्या प्रयत्नांना यश आले. ते 2006 साली बिहार केडरमध्ये रुजू झाले. तिथे त्यांनी दहा वर्षे काम केलं. या दरम्यान विजय शिवतारे यांची मुलगी ममता यांच्यासोबत त्यांचं 2014 मध्ये लग्न झालं.

फडणवीस आणि शिवतारेंची केंद्रीय गृहमंत्र्यांना विनंती

शिवदीप लांडे यांनी महाराष्ट्र पोलीस दलात रुजू होण्यासाठी केंद्रीय आणि राज्याच्या गृहमंत्र्यांकडे अर्ज केला. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवतारे यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे शब्द टाकला.

इतर बातम्या:

हिरेन मृत्यूप्रकरणाचा उलगडा करणारे ATS प्रमुख IPS शिवदीप लांडे शिवसेना नेत्याचे जावई, वाचा सविस्तर

मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा अखेर उलगडा, ATS चे DIG शिवदीप लांडे यांची फेसबुक पोस्ट

IPS Officer Shivdeep Lande will be return to Bihar Police cadre after complete time of Deputation

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.