मराठवाड्यातील पाणी टंचाई असलेल्या जिल्ह्यांना पाणी देण्यासाठी पर्याय शोधा; जयंत पाटलांच्या सूचना

मराठवाड्यातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कंबर कसली आहे. मराठवाड्यातील पाण्याची तीव्र अडचण भासत असणाऱ्या जिल्ह्यांचा, तालुक्यांचा व भागांचा अभ्यास करा. (jayant patil)

मराठवाड्यातील पाणी टंचाई असलेल्या जिल्ह्यांना पाणी देण्यासाठी पर्याय शोधा; जयंत पाटलांच्या सूचना
jayant patil
Follow us
| Updated on: Jul 20, 2021 | 3:44 PM

मुंबई: मराठवाड्यातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कंबर कसली आहे. मराठवाड्यातील पाण्याची तीव्र अडचण भासत असणाऱ्या जिल्ह्यांचा, तालुक्यांचा व भागांचा अभ्यास करा. तसेच या भागांना पाणी देण्यासाठीचे पर्याय शोधा, असे निर्देश जयंत पाटील यांनी आज संबधित अधिकाऱ्यांना दिले. (jayant patil take review meeting on water shortage in marathwada)

सिल्लोड तालुक्यातील जलसंपदा विभागाच्या विविध प्रश्नांबाबत आज महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या समवेत मंत्रालय येथे बैठक पार पडली. या बैठकीत भराडी बृहत लघु पाटबंधारेसंदर्भात सर्वेक्षण करण्याबाबत चर्चा झाली. त्याचे सर्वेक्षणाचे काम लवकर पूर्ण करावे, असे निर्देशही मंत्री जयंत पाटील यांनी दिले. या भागातील अजिंठा, अंधारी मध्यम प्रकल्प, सोयगाव लघु प्रकल्पातील अतिरिक्त वाहून जाणारे पाणी, सिल्लोड व सोयगाव तालुक्यातील प्रकल्पांच्या देखभाल दुरुस्तीबाबत, खेळणा मध्यम प्रकल्पाची उंची वाढविणे, व या तालुक्यातील नविन सिंचन प्रकल्पाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. पाणी उपलब्धतेनुसार नवीन सिंचन प्रकल्पासाठी सर्वेक्षण करण्यात यावे. तसेच सिल्लोड विश्रामगृह, खेळणा विश्रामगृह व सिल्लोड कार्यालय दुरुस्ती करणेबाबत कार्यवाही करण्यात यावी, अशी चर्चाही बैठकीत करण्यात आली.

सिल्लोड तालुक्याला पाणी मिळणार

दरम्यान सिल्लोड तालुक्यात पाण्याची मोठी टंचाई असल्याचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे या भागात पाणी पोहोचवण्यासाठी शासन प्रयत्नशील राहील, असे आश्वासन पाटील यांनी दिले.

काळू नदीच्या प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर चर्चा

दरम्यान, ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड तालुक्यातील काळू नदीच्या प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांबाबत आज मंत्रालय येथे बैठक झाली. यावेळी पाटील यांनी प्रकल्पग्रस्तांचे म्हणणे ऐकून घेतले. तसेच तालुक्यातील इतर प्रश्नांवरही चर्चा झाली. यावेळी स्थानिक आमदार किसनराव कथोरे, जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. (jayant patil take review meeting on water shortage in marathwada)

संबंधित बातम्या:

राज्य मंत्रिमंडळातही बदलाचे वारे, काँग्रेसकडून अस्लम शेख, पाडवींना डच्चू मिळणार?; शिवसेना, राष्ट्रवादीतही रस्सीखेच, वाचा सविस्तर

चिखल आणि खड्ड्यांचं साम्राज्य, ठाणे-नाशिक मार्गावर सहा किलोमीटरच्या रांगा; प्रवाशांचे प्रचंड हाल

देवगडचा प्रामाणिक मच्छिमार, व्हेल माशाची 5 कोटींची उलटी वन विभागाला सुपूर्द

(jayant patil take review meeting on water shortage in marathwada)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.