चिखल आणि खड्ड्यांचं साम्राज्य, ठाणे-नाशिक मार्गावर सहा किलोमीटरच्या रांगा; प्रवाशांचे प्रचंड हाल

गेल्या दोन दिवसांपासून सुरू झालेल्या पावासाने आज काहीशी उसंत घेतली आहे. मात्र, पावसामुळे चिखल आणि खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झाल्याने ठाण्यात प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. (Major traffic congestion in thane-nashik highway)

चिखल आणि खड्ड्यांचं साम्राज्य, ठाणे-नाशिक मार्गावर सहा किलोमीटरच्या रांगा; प्रवाशांचे प्रचंड हाल
thane-nashik highway
Follow us
| Updated on: Jul 20, 2021 | 2:54 PM

ठाणे: गेल्या दोन दिवसांपासून सुरू झालेल्या पावासाने आज काहीशी उसंत घेतली आहे. मात्र, पावसामुळे चिखल आणि खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झाल्याने ठाण्यात प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. ठाणे-नाशिक महामार्गावर तर पाच ते सहा किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होताना दिसत आहे. (Major traffic congestion in thane-nashik highway)

दोन दिवसाच्या पावसामुळे ठाणेकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. आज पाऊस थांबल्यानंतरही खाड्यांमुळे आणि रस्त्याच्या बाजूला चिखल झाल्यामुळे ठाणेकर पुन्हा वाहतूक कोंडीत अडकले आहेत. ठाणे-नाशिक हायवेवर नाशिककडे जाणाऱ्या मार्गिकेवर जवळपास पाच ते सहा किलोमीटरच्या वाहनाच्या रांगा लागल्या आहेत. दुपारनंतर ही वाहतूक कोंडी वाढली आहे. त्यामुळे नाशिकला जाणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे. या वाहतूक कोंडीत अनेक अवजड वाहने असल्याने वाहतूक कोंडी अधिकच निर्माण झाली आहे. त्यातच अधूनमधून पावसाच्या सरी येत असल्याने प्रवाशांचे चांगलेच हाल झाले आहेत.

रुग्णवाहिका अडकली

या वाहतूक कोंडीत एक रुग्णवाहिकाही अडकली होती. बराच वेळ ही रुग्णवाहिका अडकली होती. नंतर वाहतूक पोलिसांनी या रुग्णवाहिकेची वाहतूक कोंडीतून सुटका केली. खड्यामुळे निर्माण झालेली वाहतूक कोंडी काढण्यासाठी वाहतूक विभागाच्या नाकीनऊ येत आहेत. एमएमआरडीएच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन खड्डे भरण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी लवकरच सुटेल असं सांगितलं जात आहे.

मुसळधार पावसात पाहणी

दरम्यान, काल ठाण्यात प्रचंड पाऊस झाला. अनेक रस्ते पाण्याखाली गेले. तर अनेक ठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य झालं होतं. महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी काल वंदना बस डेपो येथून मुसळधार पावसात चालतच साफसफाई आणि पाणी साचणाऱ्या ठिकाणांची पाहणी केली. यामध्ये प्रादेशिक परिवहन कार्यालय, मध्यवर्ती कारागृह येथील साफसफाई तसेच पाणी साचणाऱ्या ठिकाणांची पाहणी केली.

सतर्कतेचा इशारा

दरम्यान, अतिपर्जन्यवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेच्यावतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये झाडे पडणे, पत्रे उडून जाणे, पाणी साचणे, विजेचे खांब कोसळणे अशा घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये. तसेच या कालावधीत योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन आयुक्त विपिन शर्मा यांनी केले आहे. तसेच कोरोनाचा संसर्ग कमी असला तरीही नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर आणि सॅनिटाझर या त्रिसूत्रीचा वापर करण्याचे आवाहनही विपिन शर्मा यांनी केले आहे. (Major traffic congestion in thane-nashik highway)

संबंधित बातम्या:

ठाण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला, राष्ट्रवादीचा आंदोलनाचा इशारा, पोलिसांकडून तीन पथके स्थापन

डोक्यावर मुसळधार पाऊस, शहरात ठिकठिकाणी पाणी साचलं, ठाण्याचे पालिका आयुक्त भर पावसात रस्त्यावर

दरड कोसळून पुन्हा एक मोठी दुर्घटना, ठाण्यात पाच जणांचा मृत्यू, ढिगाऱ्याखालून दोघांचे प्राण वाचवण्यात यश

(Major traffic congestion in thane-nashik highway)

Non Stop LIVE Update
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.