‘पाच किलो प्लास्टिक द्या आणि बदल्यात मिळले पोळीभाजी’

| Updated on: Dec 23, 2020 | 12:42 PM

प्लास्टिकचे संकलन चांगले व्हावे, प्लास्टिकचे हँडओव्हर चांगले व्हावे आणि प्लॅस्टिकमुळे होणारं प्रदूषण टाळता यावं यासाठी पालिकेकडून भन्नाट मोहीम सुरू करण्यात आली आहे.

पाच किलो प्लास्टिक द्या आणि बदल्यात मिळले पोळीभाजी
Follow us on

कल्याण-डोंबिवली : कल्याण-डोंबिवली शहर प्लास्टिक मुक्त करण्यासाठी महापालिकेने अनेक उपाय योजना सुरू केल्या आहेत. अशात कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेकडून एक नवीन मोहीम हाती घेण्यात आली आहे. प्लास्टिकचे संकलन चांगले व्हावे, प्लास्टिकचे हँडओव्हर चांगले व्हावे आणि प्लॅस्टिकमुळे होणारं प्रदूषण टाळता यावं यासाठी पालिकेकडून भन्नाट मोहीम सुरू करण्यात आली आहे. (Kalyan Dombivali Municipal Corporation Campaign Give five kilo of plastic and get vegetables in return)

मिळालेल्या माहितीनुसार, 5 किलो प्लास्टिक जमा करा आणि त्याच्या मोबदल्यात पोळीभाजी मिळावा अशी संकल्पना पालिकेने राबवली आहे. महापालिकेअंतर्गत सिद्धी वेस्ट टू ग्रीन लिमिटेड आणि तृप्ती गृह उद्योगाच्या संयुक्तविद्यमाने ही मोहीम पालिकेने हाती घेतली आहे. या मोहीमेसाठी नागरिकांनी उदंड प्रतिसाद द्यावा आणि शहरं प्लास्टिकमुक्त करावं असं आवाहन पालिकेकडून करण्यात आलं आहे.

दरम्यान, याच वर्षी 1 मार्चपासून मुंबई महापालिकेने प्‍लास्टिक वापरावर (Action On Plastic Use) कडक कारवाई करण्‍याचा निर्णय घेतला होता. मुंबईतील नागरिक, व्यापारी, फेरीवाले यासह‍ सर्वांनी प्रतिबंधित प्‍लास्टिकचा वापर करु नये, असं आवाहन प्रशासनानं केलं होतं.

जून 2018 पासून मार्चपर्यंत महानगरपालिका क्षेत्रात (Action On Plastic Use) सुमारे 16 लाख आस्‍थापनांना भेटी देऊन जवळपास 86 हजार किलो प्‍लास्टिक जप्‍त करण्यात आलं होतं. आता त्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. यासाठी तब्बल 4 कोटी 65 लाख रुपयांचा दंड देखील वसूल करण्‍यात आला होता.

राज्‍याचे पर्यावरण मंत्री आदित्‍य ठाकरे यांनी महाराष्‍ट्रात प्रतिबंधित प्‍लास्टिकचा वापर रोखण्‍यासाठी कारवाई तीव्र करण्‍याचे निर्देश दिले होते. मे 2020 पर्यंत संपूर्ण महाराष्‍ट्र प्रतिबंधित प्लास्टिक मुक्‍त करण्‍याचं लक्ष्‍य निश्चित केलं होतं. त्यानुसार अद्यापही अनेक महापालिका प्लास्टिकचा वापर बंद करण्यासाठी अशा विविध मोहिमा राबवून काम करत आहेत. (Kalyan Dombivali Municipal Corporation Campaign Give five kilo of plastic and get vegetables in return)

इतर बातम्या – 

Weather Alert | मुंबईत माथेरानचा फिल, पारा घसरला, महाबळेश्वरमध्ये हिमकण

Night curfew : कशी राहिली मुंबईतील रात्रीच्या संचारबंदीची पहिली रात्र?

(Kalyan Dombivali Municipal Corporation Campaign Give five kilo of plastic and get vegetables in return)