AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उभा चेहरा, काळ्या रंगाचा बुरखा… एकाच शाळेतील 4 विद्यार्थिनी एकाच वेळी गायब, कल्याण हादरले

कल्याणमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एकाच शाळेतीन चार विद्यार्थिनी बेपत्ता झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसात तपास सुरु आहे.

उभा चेहरा, काळ्या रंगाचा बुरखा... एकाच शाळेतील 4 विद्यार्थिनी एकाच वेळी गायब, कल्याण हादरले
सांकेतिक फोटोImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Jul 02, 2026 | 11:35 AM
Share

कल्याण बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका नामांकित उर्दू हायस्कूलमध्ये शिक्षण घेणाऱ्या चार अल्पवयीन विद्यार्थिनी एकाच वेळी बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून, मुलींच्या सुरक्षित परतीसाठी सर्व स्तरातून चिंता व्यक्त केली जात आहे. त्या चौघी कुठे गेल्या होत्या? काय करत होत्या? कोणाच्या संपर्कात होत्या का? याचा शोध पोलिस घेत आहेत.

नेमकं काय घडलं होतं?

२९ जून रोजी सकाळी चारही मुली शाळेत जाण्यासाठी घरातून निघाल्या होत्या. मात्र संध्याकाळी घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. रात्री उशिरापर्यंत मुलींचा काहीही संपर्क न झाल्याने कुटुंबीयांनी बाजारपेठ पोलिस ठाण्यात चौघींच्या बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रार दाखल झाल्याबरोबर तातडीने कारवाई सुरू केली.

पोलिसांचा तपास सुरु

शाळेच्या परिसरात, रेल्वे स्टेशन, बस स्टँड आणि आसपासच्या भागातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू करण्यात आली. बातमीदारांची माहिती, मोबाईल लोकेशन, कॉल डिटेल्स आणि इतर तांत्रिक माहितीच्या आधारे राज्यभर विविध पथके तयार करून मोठ्या शोधमोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे.

पोलिस अपहरणाच्या संशयावरही तपास करत आहेत. मुली स्वतःहून कुठे गेल्या असतील का? कोणीतरी त्यांना फूस लावून नेले असावे? यासह सर्व शक्यता तपासल्या जात आहेत. एकाच शाळेतील चार अल्पवयीन मुली एकदम बेपत्ता झाल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कल्याण पोलिस आयुक्तालय आणि ठाणे जिल्हा पोलिस यंत्रणा या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहे. मुलींच्या शोधासाठी राज्यातील विविध भागांत पथके कार्यरत आहेत.

Follow Us
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात
ज्ञानेश कुमारला हटवण्यासाठीचा हा मोर्चा आता... संजय राऊत काय म्हणाले?
Sanjay Raut At Mumbai : ज्ञानेश कुमारला हटवण्यासाठीचा हा मोर्चा आता... संजय राऊत काय म्हणाले?
लोकांच्या मॉर्निंग वॉकचं अंतर तुमच्या मोर्च्याच्या मार्गापेक्षा लांब..
लोकांच्या मॉर्निंग वॉकचं अंतर तुमच्या मोर्च्याच्या मार्गापेक्षा लांब आहे, भाजप नेत्याची जिव्हारी लागणारी टीका
ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत मोर्चा, अनिल परब यांचा...
ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत मोर्चा, अनिल परब यांचा भाजपवर निशाणा
ठाकरे बंधूंच्या नेतृत्वात आज गर्जना मोर्चा, बडा नेता होणार सहभागी
ठाकरे बंधूंच्या नेतृत्वात आज गर्जना मोर्चा, बडा नेता होणार सहभागी
शिवसैनिकांच्या अनोख्या बॅनरची तुफान चर्चा; उद्धव ठाकरे भावी पंतप्रधान
शिवसैनिकांच्या अनोख्या बॅनरची तुफान चर्चा; उद्धव ठाकरे भावी पंतप्रधान अन् राज ठाकरे तर थेट...