AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी दंडाला चावली अन् नंतर जे…; मुंबई लोकलच्या फर्स्ट क्लासमध्ये राडा, महिलेने गाठली क्रूरतेची सीमा

कल्याण स्थानकावर लोकलच्या प्रथम श्रेणी डब्यात चढताना झालेल्या वादातून एका अज्ञात महिलेने महिला प्रवाशाच्या हाताचा चावा घेत बोट पिरगळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कल्याण रेल्वे पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे आरोपी महिलेचा शोध घेत आहेत.

आधी दंडाला चावली अन् नंतर जे...; मुंबई लोकलच्या फर्स्ट क्लासमध्ये राडा, महिलेने गाठली क्रूरतेची सीमा
mumbai local fight
| Updated on: Feb 18, 2026 | 9:32 AM
Share

मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या मुंबई लोकलमध्ये सध्या प्रवाशांचा जीव मेटाकुटीला आला आहे. लोकलमध्ये गर्दीच्या वादातून अनेकदा शाब्दिक चकमकी उडतात. मात्र कल्याण रेल्वे स्थानकात एका महिलेने क्रूरतेच्या सर्व सीमा ओलांडल्याचे समोर आले आहे. मुंबई लोकलच्या फर्स्ट क्लासच्या डब्ब्यात चढताना झालेला वाद विकोपाला गेल्याचे पाहायला मिळत आहे. या वादातून एका अज्ञात महिलेने दुसऱ्या महिला प्रवाशाच्या हाताच्या दंडाचा जोरात चावा घेतला. त्यानंतर तिचे बोट पिरगळून तिला जखमी केले.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्वमधील मलगंगड रोडमध्ये राहणाऱ्या तक्रारदार प्रियंका थोरात (३२) या अंधेरी येथील एका खाजगी कंपनीत नोकरीला आहेत. मंगळवारी सकाळी ८ च्या सुमारास त्या नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी निघाल्या. त्यांनी कल्याण स्थानकात येऊन फलाट क्रमांक ६ वरुन ट्रेन पकडली. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या जलद लोकलच्या प्रथम श्रेणी (First Class) डब्यातून त्या प्रवास करत होत्या.

त्यावेळी डब्यातून उतरणाऱ्या प्रवाशांची आणि चढणाऱ्यांची मोठी गर्दी होती. प्रियंका डब्ब्यात शिरत असताना एका अज्ञात महिलेने त्यांना मज्जाव केला. जागा नाही, आत येऊ नका असे म्हणत त्या महिलेने प्रियंका यांना बाहेर ढकलण्यास सुरुवात केली. प्रियंका यांनी या गोष्टीला विरोध केला. त्यावेळी त्या अज्ञात महिलेने रागाच्या भरात प्रियंका यांच्या हाताच्या दंडाला जोरात चावा घेतला. इतक्यावरच न थांबता, तिने प्रियंका यांचे बोट धरून ते जोरात पिरगळले.

या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे प्रियंका यांना असह्य वेदना झाल्या. मात्र, कामावर वेळेत पोहोचण्याच्या दबावामुळे आणि गोंधळ टाळण्यासाठी त्यांनी त्याच अवस्थेत प्रवास सुरू ठेवला. संध्याकाळी घरी परतल्यानंतर वेदना वाढल्याने त्यांनी डॉक्टरांकडे धाव घेतली. तपासणीत त्यांच्या बोटाला गंभीर दुखापत झाल्याचे समोर आले. तसेच दंडावर चाव्याच्या जखमा असल्याचे समोर आले.

या धक्कादायक प्रकारानंतर प्रियंका यांनी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात (GRP) धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलिसांकडून कल्याणमधील फलाट क्रमांक ६ वरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली आहे. यावेळी आरोपी महिलेचे वर्णन आणि ती कोणत्या स्थानकावर उतरली, याचा शोध पोलीस घेत आहेत.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...