कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं महाराष्ट्रात येऊन दुही माजवण्याचं धाडस, त्याची ही आहेत कारणं

आजवरच्या सरकारकडून सीमाभागातील गावांकडे दुर्लक्ष झाले आहे. तसेच सीमाभागातील गावामधून कर्नाटक सरकारकडून आता वीज स्वस्तात दिली जात आहे.

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं महाराष्ट्रात येऊन दुही माजवण्याचं धाडस, त्याची ही आहेत कारणं
Follow us
| Updated on: Dec 02, 2022 | 10:33 PM

बेळगावः कर्नाटक सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी सांगली जिल्ह्यामधील 40 गावांवर दावा केल्यानंतर राजकाण प्रचंड ढवळून निघाले. सांगली जिल्ह्यातील 40 गावांमुळे आता सीमावादाच्या समस्या पुन्हा एकदा अधोरेखित झाल्या आहेत. सीमाभागातील गावांवर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दावा केल्यानंतर त्यांचे हे प्रचंड धाडस असल्याचे त्यांनी सांगितले. आणि हे असे धाडस मुख्यमंत्री बसवराज बोमई कसं काय करू शकतात असा सवालही उपस्थित होऊ लागला आहे. त्यामुळे आता सीमाभागातील गावांवर आता पुन्हा एकदा लक्ष गेले आहे.

एकीकडे बेळगावमध्ये कर्नाटक सरकारकडून अत्याचार करायचे आणि दुसरीकडे मात्र जत तालुक्यावर ढोंगी प्रेम दाखवायचं असा दुतोंडीपणा आता कर्नाटकचा उघड झाला आहे.

बेळगाव, निपाणी, कारवार, बिदर, भालकी आणि आता जतमध्ये कर्नाटक सरकार आपला दावा सांगत आहे. गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्र सरकारकडून सीमाभागातील गावांकडे दुर्लक्ष झालं आहे.

त्यामुळे महाराष्ट्रातील गावांना भुलवण्यासाठी कर्नाटक सरकार आता वेगवेगळ्या खेळी खेळत आहे हेही स्पष्टपणे दिसत आहे. यामुळेच कर्नाटक सरकार कुरघोडीची राजकारण करत असल्याचा ठपकाही ठेवला जातो आहे.

जतचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी म्हैसाळ योजना आखण्याती आली मात्र जतमधील काही भागात ती योजना पोहचली तर काही भागात ती योजना पोहचलीच नाही. त्यामुळेच जतमधील पश्चिम भागात असंतोष पसरला आहे.

कर्नाटक सरकारने सांगलीतील गावांवर दावा दाखल केल्यानंतर सांगलीच्या जिल्ह्याधिकाऱ्यांकडून आता जत परिसराची पाहणी करण्यात आली आहे.

महाराष्ट्र सरकारकडून या भागाकडे दुर्लक्ष होत असल्यानेच कर्नाटक सरकारकडून पाणी देण्याची नाटक केले जात आहे. त्यामुळे सीमाभागातील पाणी प्रश्नावरून त्यांना मुद्दामहून भडकावण्याची कामं कर्नाटक सरकार करत आहे.

आजवरच्या सरकारकडून सीमाभागातील गावांकडे दुर्लक्ष झाले आहे. तसेच सीमाभागातील गावामधून कर्नाटक सरकारकडून आता वीज स्वस्तात दिली जात आहे.

सीमाभागातील 21 गावांमध्ये मराठी शाळाच नाहीत, त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना मराठी शाळेसाठी पायपीठ करावी लागत आहे. या एक ना अनेक कारणांमुळे कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्रातील गावांवर दावा करण्याचं धाडस करत आहेत.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.