AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिंदे गटाचा स्वाभिमान कुठे शेण खातोय, ठाकरे गटाच्या नेत्याने तोफ डागली…

स्वाभिमान म्हणत 40 आमदार शिवसेनेतून बाहेर पडले पण आता महाराष्ट्रातील 40 गावं शेजारच्या राज्यातील मुख्यमंत्री हिसकावून घेण्याचा प्रयत्न करतोय तेव्हा कुठे गेला यांचा स्वाभिमान.

शिंदे गटाचा स्वाभिमान कुठे शेण खातोय, ठाकरे गटाच्या नेत्याने तोफ डागली...
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Nov 24, 2022 | 5:38 PM
Share

मुंबईः कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोमई यांनी काल सांगली जिल्ह्यामधील जत तालुक्यातील 40 गावांची मागणी केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यामुळे राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल सुरू करण्यात आला आहे. आज शरद पवारांनी कर्नाटक वादाबाबत राज्यातील आणि केंद्रातील सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधण्यात आल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही शिंदे गटावर जोरदर निशाणा साधला आहे. खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर स्वाभिमानाच्या विषयावरुन त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, शिवसेनेतून ज्या स्वाभिमानासाठी जो 40 आमदारांचा गट बाहेर पडला आहे. आता कुठे गेला आहे, त्यांचा स्वाभिमान.

शेजारच्या राज्यातील एक मुख्यमंत्री आपल्या राज्यातील काही गावं हिसकावून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि तुम्ही षंडासारखे शांत बसला आहात. आता कुठे शेण खातो आहे तुमचा स्वाभिमान असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सकाळीच केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा साधला होता. त्यानंतर खासदार संजय राऊत यांनी जोरदार निशाणा साधत त्यांनी षंडासारखे का शांत बसलात असा सवाल आता शिंदे गटाला केला आहे. त्यामुळे कर्नाटक-महाराष्ट्राच्या सीमावादावरुन हा वाद आणखी पेटणार असल्याचे दिसून येत आहे.

तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही शिंदे गटावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, शिंदे-फडणवीस यांनी बसवराज बोमई यांना समज द्यायला हवी. नाहीतर ते आता मुंबईही मागायला मागेपुढे बघणार नाहीत असा टोला त्यांनी राज्य सरकारला लगावला आहे.

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...