Ketaki chitale: केतकी चितळे या आजाराने आहे ग्रस्त; या रोगाविषयीही ती सोशल मीडियावरुनच करते जनजागृती

केतकी चितळे ही अभिनेत्री असली तरी आणि एकाच मालिकेतून गायब झाल्यानंतर मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून ती नेहमी वादात राहिली. ती मालिकेतून का बाहेर गेली याची कारणं अनेक असली तरी सध्या एका आजराशी लढत आहे.

Ketaki chitale: केतकी चितळे या आजाराने आहे ग्रस्त; या रोगाविषयीही ती सोशल मीडियावरुनच करते जनजागृती
केतकी चितळे ही आपस्मार आजाराने आहे त्रस्तImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 14, 2022 | 7:12 PM

मुंबईः केतकी चितळे (ketaki Chitale) आणि वाद हे समीकरण ठरलेलं आहेच. कधी मालिकांवरुन वाद तर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त पोस्ट तर कधी शेजाऱ्यांबरोबरच भांडण. या अशा एक ना अनेक वादामुळे तुझं माझं ब्रेकअप या एकाच मालिकांमुळे घराघरात पोहचलेली अभिनेत्री म्हणून केतकी चितळे जेवढी माहिती आहे त्यापेक्षा ती जास्त तिच्या वादग्रस्त पोस्टमुळेसुद्धा माहिती आहे. आता पुन्हा एकदा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर केलेल्या पोस्टमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेली केतकी चितळे अनेक दिवसांपासून टीव्ही जगतापासून लांब आहे. ती लांब आहे कारण ती सध्या एका आजाराशी झुंज देते आहे.

अभिनेत्री केतकी चितळे ही ‘तुझं माझं ब्रेकअप’ मालिकेतून लोकप्रिय झाल्यानंतर फारशी कुठे दिसली नाही. तिचे सोशल मीडियावरील फोटो पाहिल्यानंतर लक्षात येईल केतकी अनेकवर्षांपासून एका आजाराशी लढा देत आहे. हा आजार आहे अपस्मार म्हणजे पिलेप्सी (Epilepsy).

केतकी घेत आहे उपचार

केतकी चितळे ही अभिनेत्री असली तरी आणि एकाच मालिकेतून गायब झाल्यानंतर मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून ती नेहमी वादात राहिली. ती मालिकेतून का बाहेर गेली याची कारणं अनेक असली तरी सध्या एका आजराशी लढत आहे. गेल्या काही वर्षांपासून केतकी चितळे एपिलेप्सी म्हणजे अपस्मार या आजाराने त्रस्त आहे. या आजारावर केतकी वेगवेगळ्या मेडिकल ट्रीटमेंट घेत आहे. त्याबद्दल ती सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृतीही करत असते.

रुग्णांना सकारात्मक राहण्याचा सल्ला

एपिलेप्सी म्हणजे अपस्मार या आजाराने त्रस्त या आजाराने त्रस्त असलेली केतकी या आजाराबद्दल ती स्वतः मोकळेपणाने बोलत असते. या आजाराबद्दल ती इतर रुग्णांना सकारात्मक राहण्याचा सल्लाही देत असते. या संदर्भातील फोटो आणि व्हिडिओही ती अनेकदा शेअरही करत असते. या आजाराबद्दल माहिती, औषधोपचार आणि इतर माहितीही ती देत असते.

एपिलेप्सी वॉरिअर क्विन

तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटचे नावदेखील एपिलेप्सी वॉरिअर क्विन असे केले आहे. केतकीने या हँडलवरून नुकतेच काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. या आजाराबद्दल ती अनेकांना माहिती देते, त्या आजाराचे असणारे रुग्ण त्यांना मानसिक पाठबळ देण्याचे कामही केतकी आपल्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरुन करत असते.

हा आजार काय आहे

वारंवार आकडी येणं हे प्रमुख लक्षण असलेल्या दीर्घकालीन आजाराला ‘अपस्मार’ म्हणतात. हा चेतासंस्थेतील बिघाड आहे. त्यामध्ये येणारी आकडी कोणत्याही बाह्य कारणामुळे येत नाही. एकूण जागतिक लोकसंख्येपैकी 0.3 टक्के ते 0.5 टक्के लोक अपस्माराने ग्रासलेले आढळतात. त्याबद्दल ती सतत बोलत असते. या आजाराचे प्रमाण किती आहे, त्याचा लोकांना कसा त्रास होतो, याबद्दलही ती नेहमी माहिती शेअर करते.

या आजारावरील उपचार

अपस्माराचा आजार पूर्णतः कधीच बरा होत नाही. तरीही साधारण ६० ते ७० टक्के रोग्यांमध्ये आकडी येण्यावर योग्य रितीने नियंत्रण ठेवता येते. अपस्मारावरील उपचार मेंदुरोगतज्ञ किंवा या आजाराविषयी ज्यांचा अभ्यास आहे अशा डॉक्टरकडून घेण्यात यावे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.