नवी मुंबईत भर रस्त्यात विक्रीकर अधिकाऱ्यावर चाकू हल्ला, आरोपी फरार

या प्रकरणात सीबीडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

नवी मुंबईत भर रस्त्यात विक्रीकर अधिकाऱ्यावर चाकू हल्ला, आरोपी फरार
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By:

Oct 26, 2020 | 7:48 PM

नवी मुंबई : नवी मुंबईत विक्रीकर अधिकाऱ्यांवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कामावरून घरी परतणाऱ्या विक्रिकर अधिकाऱ्यांवर दोन अज्ञातांनी चाकूने हल्ला करून त्यांचा मोबाईल फोन आणि रोख रक्कम लुटून नेल्याची घटना सीबीडी परिसरात घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. (Knife attack on sales tax officer in Navi Mumbai)

मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात विक्रिकर अधिकाऱ्याच्या गळ्यावर आणि हातावर गंभीर दुखापती झाल्याने त्यांना सीबीडीतील एमजीएम रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणात सीबीडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

मुंबईत सॉफ्टवेअर इंजिनिअरला अटक, अमेरिकत नोकरी लावण्याचे अमिषाने अनेक मुलींवर अत्याचार

महेश बिनावडे असं विक्रीकर अधिकाऱ्याचं नाव आहे. ते सीबीडी सेक्टर-5 मध्ये वास्तव्यास असून सध्या मुंबईतील बांद्रा इथल्या कार्यालयात कार्यरत आहेत. बिनावडे हे सकाळी नेहमीप्रमाणे आपल्या कामावर गेले होते. सायंकाळी 7.30 वाजता ते कोकण भवन इथल्या बस स्टॉपवर बसने उतरून पायी चालत आपल्या घराच्या दिशेने जात होते. यावेळी दोन अज्ञात लुटारुंनी त्यांना अडवून त्यांच्याजवळचा मोबाईल फोन आणि पॉकेट हिसकावण्याचा प्रयत्न केला.

यावेळी महेश बिनावडेंनी त्यांना विरोध केल्याने दोघांनी त्यांच्यासोबत झटापटी करून आपल्याजवळच्या चाकूने त्यांच्या गळ्यावर आणि डाव्या कोपरावर वार केले. यात एकाने त्यांचा मोबाईल फोन आणि पाकिट लुटून पळून गेले. या घटनेनंतर बिनवाडे यांनी जखमी अवस्थेत आपलं घर गाठलं. बिनवाडे यांना जखमी पाहताच त्यांच्या पत्नीने त्यांना एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल केलं.

सर्वसामान्यांना झटका बसण्याची चिन्हं, पेट्रोल-डिझेलवर टॅक्स वाढवण्याच्या केंद्राच्या हालचाली

या प्रकरणात सीबीडी पोलिसांनी दोन अज्ञातांविरोधात जबरी लुटीचा गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

(Knife attack on sales tax officer in Navi Mumbai)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें