AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ज्यांची ठाकरे सरकारनं शिफारस केली नाही; पण मोदींनी दिलं ती मराठी पद्म मंडळी कोण?

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने महाराष्ट्रातील सहा जणांना पद्म पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे. (know about padma awardee in maharashtra)

ज्यांची ठाकरे सरकारनं शिफारस केली नाही; पण मोदींनी दिलं ती मराठी पद्म मंडळी कोण?
पद्म पुरस्कार विजेते
| Updated on: Jan 26, 2021 | 12:31 PM
Share

मुंबई: प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने महाराष्ट्रातील सहा जणांना पद्म पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे. केंद्र सरकारने रजनीकांत देवीदास श्रॉफ यांना पद्मभूषण तर गिरीश प्रभुणे, नामदेव कांबळे, परशुराम आत्माराम गंगावणे, जसवंतीबेन पोपट आणि सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करून गौरवण्यात आलं आहे. यापैकी फक्त सिंधुताईंचीच राज्य सरकारने पद्म पुरस्कारासाठी केंद्राकडे शिफारस केली होती. इतरांची शिफारस केलेली नसतानाही त्यांना पुरस्कार मिळाला आहे. कोण आहेत हे पद्म पुरस्कार विजेते त्यांच्याबद्दलचा घेतलेला हा आढावा. (know about padma awardee in maharashtra)

रजनीकांत श्रॉफ

रजनीकांत देवीदास श्रॉफ हे नावाजलेले उद्योगपती आहेत. उद्योगक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांना पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. राजू श्रॉफ म्हणून ओळखले जाणारे रजनीकांत श्रॉफ हे यूनायटेड फॉस्फरस लिमिटेड (यूपीएल)चे संस्थापक आहेत. ही एक केमिकल कंपनी आहे. फोर्ब्सने जारी केलेल्या जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत त्यांना 87वे स्थान मिळालेले आहे. ते वापी इंडस्ट्रीयल असोसिएशन आणि असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मेडियम केमिकल मॅन्युफॅक्चर्सचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. गुजरातच्या कच्छमध्ये जन्मलेल्या श्रॉफ यांनी मुंबईच्या खालसा कॉलेजातून बीएससी पर्यंतचं शिक्षण घेतलं आहे.

गिरीश प्रभुणे

गिरीश प्रभुणे यांना सामाजिक कार्यासाठी पद्मश्री पुरस्कार देण्यात आला आहे. प्रभुणे गेल्या अनेक वर्षांपासून पारधी समाजाच्या हक्कासाठी आणि त्यांच्या उत्थानासाठी कार्य करत आहेत. पारधी समाजातील मुलांना शिक्षण मिळावं, त्यातही पारधी समाजातील मुलींना शिक्षण मिळावं, पारधी समाजाचं पुनर्वसन व्हावं यासाठी प्रभुणे कार्य करत आहेत. त्यासाठी त्यांनी पुनरुत्थान समरसता गुरुकुलम या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये ही संस्था कार्यरत आहे. पारधी समाजाच्या मुलांसाठी त्यांनी वसतिगृहही सुरू केले आहे. या गुरुकुलमध्ये पारधी समाजातील 200 मुले आणि 150 मुली शिकत आहेत. प्रभुणे यांनी 1970 पासून पारधी समाजासाठी काम करण्यास सुरुवात केली आहे.

नामदेव कांबळे

नामदेव कांबळे हे साहित्यिक आहेत. ते वाशिम येथे राहतात. त्यांनी राघववेळ, ऊन सावली आणि सांजरंग या तीन कांदबऱ्या लिहिल्या आहेत. या तिन्ही कादंबऱ्यांमधून त्यांनी गावकुसाबाहेरच्या स्त्रियांच्या वेदनांना वाचा फोडली आहे. गावकुसाबाहेरच्या स्त्रियांना साहित्यात स्थान देण्याचा कांबळे यांचा हा प्रयोग नवीन होता. त्यांच्या या अतुलनीय योगदानामुळेच त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे. कांबळे यांचं शिक्षण शिरपूर येथे झाले. त्यांनी उदरनिर्वाहासाठी चौकीदार म्हणून खासगी शाळेत नोकरीही पत्करली होती. बीए बीएड झाल्यावर त्यांनी वाशिमच्या राणी लक्ष्मीबाई कन्या शाळेत शिक्षक म्हणून नोकरी पत्करली. त्यांच्या राघववेळ या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कारही जाहीर झालेला आहे. या कादंबरीचा बंगाली भाषेतही अनुवाद झालेला आहे. त्यांच्या नावावर एकूण आठ कादंबऱ्या, तीन कथासंग्रह, चार कविता संग्रह, ललित लेख आदी साहित्य संपदा आहे.

परशुराम गंगावणे

परशुराम गंगावणे यांना कलेसाठी पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. गंगावणे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गावातील आहेत. त्यांनी पिढ्यानपिढ्या चालत आलेली कळसूत्री बाहुल्यांची कला जपली आहे. त्यांनी वडील आणि आजोबांच्या पावलावर पाऊल ठेवू आदिवासी कलेचा हा वारसा जपला आहे. त्यांनी गुरांसाठी बांधकाम केलेला गोठा आणि गुरे विकून त्याचे छोटेखानी आर्ट गॅलरी म्युझियम बनवले. गेल्या अनेक वर्षांपासून विश्राम ठाकर आदिवासी कला आंगण चॅरिटेबल ट्रस्ट नावाने नोंदणी करून त्यात पपेट, चित्रकथी, कळसूत्रीची अगदी शिस्तबद्ध मांडणी केलेली आहे. ते गेल्या 45 वर्षांपासून आदिवासी ठाकर समाजाच्या पारंपारिक लोककला जतन व प्रसार करण्याचे काम करीत आहे. त्यांनी विश्राम ठाकर आदिवासी कला आंगण या चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून बेटी बचाओ बेटी पढाओ, व्यसनमुक्ती, स्वच्छ भारत अभियान, एड्स अवेरनेस आदी विषयांवर कळसुत्री बाहुल्यांच्या माध्यमातून जनजागृतीही केली आहे.

जसवंतीबेन पोपट

90 वर्षीय जसवंतीबेन पोपट यांनाही पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे. त्यांना उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार देण्यात आला आहे. ‘श्री महिला गृहउद्योग लिज्जत पापड’च्या त्या सहसंस्थापक आहेत. या उद्योगाच्या माध्यमातून जसवंतीबेन पोपट यांनी ४५ हजार महिलांचं जीवन बदललं. त्यांना रोजगार दिला. त्यांनी मार्च १९५९मध्ये मुंबईत गिरगावातील 7 महिलांनी ‘श्री महिला गृहउद्योग लिज्जत पापड’ या पापड तयार करण्याच्या व्यवसायाला सुरुवात केली. केवळ महिलाच सहमालक असणारा हा जगातील एकमेव गृहउद्योग होता. सात गृहिणींनी ८० रुपये उधार घेऊन सुरू केलेला पापड उद्योग आज 1600 कोटींहून अधिक रुपयांच्या घरात पोहोचला आहे. गेली 60 वर्षांपासून त्यांनी हा व्यवसाय दमदारपणे सुरू ठेवला आहे. त्यांच्या व्यवसायात आज 45 हजार महिला असून त्यांच्या देशभरात 62 शाखा आहेत. (know about padma awardee in maharashtra)

अनाथांची माय सिंधुताई सकपाळ

अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांनाही उल्लेखनीय सामाजिक कार्य केल्याबद्दल पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. वर्धा जिल्ह्यातील नवरगाव ही त्यांची जन्मभूमी. विवाह वयाच्या ९ व्या वर्षी वयाने २६ वर्षांनी मोठे असलेल्या श्रीहरी सपकाळ यांच्याशी झाला. घरी प्रचंड सासुरवास होता. कुटुंबात शैक्षणिक वातावरण नव्हतं. नवऱ्याने चारित्र्याचा संशय घेऊन त्यांना घराबाहेर काढलं. घरच्यांनीही त्यांच्याकडे पाठ फिरवली. त्यामुळे त्या परभणी-नांदेड-मनमाड रेल्वे स्टेशनांवर सिंधुताई भीक मागत हिंडायच्या. एकदा तर त्यांनी आत्महत्येचा प्रयत्नही केला होता. अनेक दिवस भीक मागितल्यानंतर त्या स्मशानातही राहिल्या. त्यानंतर त्यांनी अनाथ मुलांना सांभाळण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी ममता बाल सदनची स्थापनाही केली. पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ही संस्था सुरु झाली. अनाथ, बेवारस मुलांना सांभाळतानाच त्यांना शिक्षण, अन्न, कपडे देण्यास त्यांनी सुरुवात केली. या संस्थेत १०५० मुले या राहिलेली आहेत. त्यांनी पुण्यता बाल निकेतन, चिखलदरा येथे सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह, वर्ध्यात अभिमान बाल भवन, गोपिका गाईरक्षण केंद्र, सासवडमध्ये ममता बाल सदन आणि पुण्यात सप्तसिंधु महिला आधार बालसंगोपन व शिक्षण संस्थेची स्थापना केली आहे. (know about padma awardee in maharashtra)

संबंधित बातम्या:

72 Republic Day LIVE UPDATES | राजपथावर पथसंचलनाला सुरुवात, ब्लॅक कमांडोजला पाहून उत्साह वाढला

ठाकरे सरकारकडून 100 नावांची शिफारस, मिळाला फक्त एक पद्म, राऊतांनाही नाही !

प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी उभे असलेल्या दोन पोलिसांना भोवळ; तात्काळ रुग्णालयात दाखल

(know about padma awardee in maharashtra)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.