72 Republic Day LIVE UPDATES | राष्ट्रगीतासह प्रजासत्ताक दिनाच्या दिमाखदार सोहळ्याची सांगता

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स

72 Republic Day LIVE UPDATES | राष्ट्रगीतासह प्रजासत्ताक दिनाच्या दिमाखदार सोहळ्याची सांगता

| Edited By: Namrata Patil

Apr 15, 2021 | 3:35 PM

72 Republic Day LIVE UPDATES : देश आज 72 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. या प्रसंगी दरवर्षीप्रमाणे राजपथावर भारताची विविधता आणि ताकदीची ओळख देणारे चित्ररथ निघतील, प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं राजपथावर आगमन झालं आहे

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 26 Jan 2021 11:57 AM (IST)

  नितीन गडकरींचं दिल्लीतील निवीसस्थानी ध्वजारोहण

  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून दिल्लीतील निवासस्थानी ध्वाजारोहण

 • 26 Jan 2021 11:48 AM (IST)

  राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं राजपथावरुन प्रस्थान

  राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं राजपथावरुन प्रस्थान, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आता प्रस्थान करतील, त्यानंतर  पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रस्थान करतील

 • 26 Jan 2021 11:46 AM (IST)

  900 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने राफेलची गगनात झेप

  प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाची सांगता करताना राफेल लढाऊ विमानाने एकटा आकाशात उड्डाण घेतली, याचा वेग 900 किलोमीटर प्रतितास इतका होता, आकाशात उंच त्याने वर्टिकल चार्ली स्टंट केला, हे बघून उपस्थित सर्वच आवाक झाले

 • 26 Jan 2021 11:43 AM (IST)

  भारतीय वायुसेनेकडून आकाशात भारताच्या शक्तीचं प्रदर्शन, लढाऊ विमानांची प्रात्याक्षिकं

  सर्वांच्या नजरा आकाशाकडे, भारतीय वायुसेनेकडून फ्लाय पासला सुरुवात, भारतीय वायुसेनेकडून आकाशात भारताच्या शक्तीचं प्रदर्शन, रुद्र फॉर्मेशन, सुदर्शन फॉर्मेशन, रक्षक फॉर्मेशन, भीम फॉर्मेशन, नेत्र फॉर्मेशन, गरुड फॉर्मेशन, एकलव्य फॉर्मेशन, त्रिनेत्र फॉर्मेशन, विजय फॉर्मेशनचं सादरीकरण, चिनूक हेलिकॉप्टर , मी-35, अपाचे हेलिकॉप्टर , सी-170, सुखोई 30 , सी-17, एमकेआई-एसयू विमान, राफेल लढाऊ विमानांचा सहभाग

 • 26 Jan 2021 11:29 AM (IST)

  102 विद्यार्थिनींकडून 'फीट इंडिया'च्या नेतृत्त्वात सादरीकरण

  102 विद्यार्थिनींकडून 'फीट इंडिया'च्या नेतृत्त्वात सादरीकरण, कोलकात्याच्या लोकनृत्याचं सादरीकरण, आत्म निर्भर भारताचं नृत्याच्या माध्यमातून सादरीकरण,

 • 26 Jan 2021 11:18 AM (IST)

  राजपथावर विद्यार्थ्यांकडून लोकनृत्य सादर

  राजपथावर विद्यार्थ्यांकडून लोकनृत्य सादर, वेगवेगळ्या रंगेबिरंगी पोशाखात लोकनृत्य सादर,

 • 26 Jan 2021 11:16 AM (IST)

  व्होकल फॉर लोकल आणि सीमा रस्ता संघटनेचा चित्ररथ

  व्होकल फॉर लोकलचा चित्ररथ, सीमा रस्ता संघटना, भारतीय तटरक्षक दल, माहिती व प्रसारण मंत्रालयाचा चित्ररथ, सीपीडब्लूडीचा चित्ररथ, भारतीय अमर जवानांना समर्पित, संस्कृती मंत्रालयाचा चित्ररथ, स्वातंत्र्याचा 75 वं वर्षाची झलक

 • 26 Jan 2021 11:10 AM (IST)

  आत्मनिर्भर भारत, डिजीटल इंडियावर आधारित न्यू इंडियाचं चित्र राजपथावर 

  आत्मनिर्भर भारत, डिजीटल इंडियावर आधारित न्यू इंडियाचं चित्र राजपथावर, कामगार आणि रोजगार मंत्रालयाचा चित्ररथ

 • 26 Jan 2021 11:09 AM (IST)

  बायोटेक्नोलॉजीचा चित्ररथ पराजपथावर

  बायोटेक्नोलॉजीचा चित्ररथ पराजपथावर, कोरोनावरील विजयाची झलक, कोरोना लस

 • 26 Jan 2021 11:06 AM (IST)

  दिल्लीच्या चित्ररथात जहानाबाद, तर अरुणाचल प्रदेशच्या चित्ररथात संस्कृतीची झलक

  दिल्लीच्या चित्ररथात जहानाबाद, तर अरुणाचल प्रदेशच्या चित्ररथात संस्कृतीची झलक, केरळच्या चित्ररथात नारळांची आरास, महिलां सशक्तीकरणाची झलक, आंध्र प्रदेशच्या चित्ररथात विजय नगर साम्राज्याची झलक,

 • 26 Jan 2021 11:01 AM (IST)

  राजपथावर उत्तर प्रदेशचा चित्ररथ, राम मंदिराची झलक

  यावेळी उत्तर प्रदेशचा चित्ररथ खास छरला, यामध्ये राम मंदिराची झलक पाहायला मिळाली, उत्तर प्रदेशच्या सांस्कृतिक शहराला अयोध्येचे राजा ब्रम्हाचे पुत्र मनु यांनी वसवलं होतं, यालाच अयोध्या म्हटलं जातं आमि यामध्ये अष्टाचक्र नवाद्वार आहेत, याचा उल्लेख अथर्ववेदात पाहायला मिळतो, हा चित्ररथ पाहून लोकांनी उभं होऊन टाळ्या वाजवल्या

 • 26 Jan 2021 10:57 AM (IST)

  महाराष्ट्राच्या चित्ररथामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम

  महाराष्ट्रचा चित्ररथ राजपथावर, यामध्ये शिवाजी महाराज आणि संत तुकाराम यांची भेट दाखवण्यात आली, याला शक्ती आणि भक्तीची भेट म्हटलं जातं, त्यानंतर देवभूमी उत्तराखंडचा चित्ररथ आला, त्यामध्ये केदारनाथ मंदिर दाखवण्यात आलं, त्यानंतर छत्तीसगडचा चित्ररथ आला, त्यानंतर पंजाबचा चित्ररथ राजपथावर आला, यामध्ये शिख गुरु तेग बहादूर यांचं स्मरण करण्यात आलं, यामध्ये त्यांचं 400 वं प्रकाश वर्ष साजरं केलं जात आहे

 • 26 Jan 2021 10:50 AM (IST)

  आसाम आणि तामिळनाडुचा चित्ररथ

  आसाम आणि तामिळनाडुचा चित्ररथ

 • 26 Jan 2021 10:50 AM (IST)

  चित्ररथांना सुरुवात, पहिल्यांदा लडाखचा चित्ररथ राजपथावर

  28 राज्यांच्या चित्ररथाला सुरुवात झाली आहे, सर्वात आधी लडाखचा चिऊरथ राजपथावर पोहोचला, लडाख आता केंद्रशासित प्रदेश झाला आहे, त्यांचा चित्ररथ पहिल्यांना प्रजासत्ताक दिनी राजपथावर दिसला, दुसऱ्या क्रमांकावर गुजरातचा चित्ररथ आला

 • 26 Jan 2021 10:45 AM (IST)

  पाईप अँड ड्रम बँड राजपथावर

  पाईप अँड ड्रम बँड राजपथावर पोहोचला

 • 26 Jan 2021 10:43 AM (IST)

  ब्लॅक कॅट कमांडोजचा राजपथावर कमाल

  नॅशनल सिक्योरिटी गार्ड (NSG)चं मार्चिंग सैन्य दल राजपथावर येताच त्यांच्या एनर्जीने लोकांच्या मनात उत्साह वाढला, ब्लॅक कॅट कमांडोजचे जवान अत्यंत शक्तीशाली दिसत होते

 • 26 Jan 2021 10:40 AM (IST)

  CRPF, दिल्ली पोलीस दलाचा मार्च

  इंडियन कोस्ट गार्ड मार्चिंग सैन्य दलाचा मार्च,  त्यानंतर ITBP आणि दिल्ली पोलिसांचे जवान राजपथावर

 • 26 Jan 2021 10:39 AM (IST)

  DRDO चा चित्ररथ

  INS विक्रमादित्यवर लँडिंग आणि टेकऑफ करताना लाइट लढाऊ विमानाचा चित्ररथ,  अँटी टँक गाईड मिसाईलचा चित्ररथ

 • 26 Jan 2021 10:38 AM (IST)

  सीमा सुरक्षा दलाचे उंट पथक

 • 26 Jan 2021 10:32 AM (IST)

  नौसेनेनंतर वायुसेना राजपथावर

  नौसेनेनंतर वायुसेनेचा चित्ररथ राजपथावर आला, भारतीय वायुसेनेच्या चित्ररथाचा विषय - ‘भारतीय वायु सेना- शान से आकाश को छूते हुए', यामध्ये फ्लाइट लेफ्टिनेंट भावना कांत देखील सहभागी झाल्या, त्या देशातील पहिल्या तीन महिला फायटर पायलट पैकी एक आहेत

 • 26 Jan 2021 10:28 AM (IST)

  राजपथावर नौसेनेचा चित्ररथ

  राजपथावर नौसेनेचा चित्ररथ, पहिल्या भागात भारतीय नौसेनेना 04-05 डिसेंबर 1971 च्या रात्रू मिसाईल बोट्सद्वारे कराची बंदरावर केलेल्या हल्ल्याला दर्शवलं, चित्ररथाच्या दोन्ही बाजुला हल्ला करण्यासाठी निवडण्यात आलेला मार्ग दाखवण्यात आलं होतं

 • 26 Jan 2021 10:24 AM (IST)

  ‘हंसते गाते’वर बँड प्लेयिंग, क्विक मार्च

  गढवाल रायफल रेजिमेंट, महार रेजिमेंट, सिख रेजिमेंट, आसाम रेजिमेंट, जम्मू आणि कश्मिर रायफल रेजिमेंटने क्विक मार्च केला

 • 26 Jan 2021 10:22 AM (IST)

  सैन्य दलाचा मार्च

  जाट रेजिमेंट आणि पॅरा रेजिमेंटने मार्च केला

 • 26 Jan 2021 10:20 AM (IST)

  लष्कराकडून यांनी सहभाग घेतला

  - घोडेस्वार सेना ज्यामध्ये 43 घोडे होते, त्यांनी पहिले मार्च केला

  -टी-90 टँक – 03

  -बॉलवे मशीन पिकेट – 03

  -ब्रह्मोस मिसाईल सिस्टम – 01

  -पिनाका मल्टिपल लॉन्च रॉकेट सिस्टम – 02

  -ब्रिज लेयिंग टँक (टी-72) – 02

  -इंटर कम्यूनिकेशन इलेक्ट्रोनिक वारफेयर सिस्टम – 02

  -अप्रेडिड शिल्का वेपन सिस्टम – 01

  -शेवटी फ्लाय पास्ट जालं, 04 अॅडवान्स लाईट हेलिकॉप्टर्सने डायमंडचा आकार बनवला

 • 26 Jan 2021 10:11 AM (IST)

  परववीर चक्र मिळालेले जवान राजपथावर

  परववीर चक्र मिळालेले जवान राजपथावर

 • 26 Jan 2021 10:09 AM (IST)

  बांग्लादेशच्या जवानांसोबत परेडला सुरुवात

  बांग्लादेशच्या जवानांसोबत परेडला सुरुवात,

 • 26 Jan 2021 10:07 AM (IST)

  परेडची सुरुवात, चार MI-17 हेलिकॉप्टर्सचं उड्डाण

  परेडची सुरुवात, चार MI-17 हेलिकॉप्टर्सचं उड्डाण, हेलिकॉप्टरमधून फुलांचा वर्षाव, परेड कमांडर विजय कुमार मिश्रा यांचं पथसंचलन

 • 26 Jan 2021 10:06 AM (IST)

  राष्ट्रपतींनी अंगरक्षकांच्या अभिवादनानंतर तिरंग्याला मानवंदना देत ध्वजारोहण केलं, तोफांच्या सलामीसह राष्ट्रगीत

  राष्ट्रपतींनी अंगरक्षकांच्या अभिवादनानंतर तिरंग्याला मानवंदना देत ध्वजारोहण केलं, तोफांच्या सलामीसह राष्ट्रगीताला सुरुवात

 • 26 Jan 2021 09:53 AM (IST)

  थोड्याच वेळात राजपथावर पथसंचलन, पाहुण्यांचं आगमन सुरु

  थोड्याच वेळात राजपथावर पथसंचलन सुरु होणार, पाहुण्यांचं आगमन सुरु, देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद राजपथाकडे दाखल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं राजपथावर आगमन

 • 26 Jan 2021 09:49 AM (IST)

  कोरोनामुळे विस्कटलेली स्थिती पूर्ववत व्हावी - अजित पवार

  शाळा लवकर सुरु व्हाव्यात, विस्कटलेली स्थिती अतिशय चांगल्या पद्धतीने बसावी, इवढीच अपेक्षा मी या दिवशी करतो,

 • 26 Jan 2021 09:46 AM (IST)

  पंतप्रधान मोदींकडून शहिदांना श्रद्धांजली

  पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर दाखल, पंतप्रधान मोदींकडून शहिदांना श्रद्धांजली, यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि तिन्ही सेना प्रमुख त्यांच्यासोबत होते

 • 26 Jan 2021 09:44 AM (IST)

  अजित पवारांकडून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा, पद्म पुरस्कार मिळालेल्या सर्वांचे अभिनंदन, यावेळी कार्यक्रम साधेपणाने, नागरिकांचा हिरमोड झाला असेल

 • 26 Jan 2021 09:39 AM (IST)

  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांकडून झेंडा ध्वजारोहण

  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 72 व्या प्रजासत्ताक दिनाच्या प्रसंगी आपल्या निवासस्थानी ध्वाजारोहण केलं.

 • 26 Jan 2021 09:36 AM (IST)

  विनापरवाना ट्रॅक्टर रॅली, राजू शेट्टींसह स्वाभिमानीच्या 250 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

  कोल्हापूर : माजी खासदार राजू शेट्टी, सावकार यांच्यासह स्वाभिमानी च्या 250 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल, विनापरवाना ट्रॅक्टर रॅली काढल्याबद्दल आपत्ती व्यवस्थापन कायद्याचं उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल, कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात झाला गुन्हा दाखल, कृषी कायद्याला विरोधासाठी काल स्वाभिमानी न काढला होता सांगली ते कोल्हापूर ट्रॅक्टर मोर्चा

 • 26 Jan 2021 09:33 AM (IST)

  ओम बिडला यांच्याकडून ध्वजारोहण

  दिल्ली : लोकसभा अध्यक्ष ओम बिडला यांनी 72 व्या प्रजासत्ताक दिनाला आपल्या निवासस्थानी ध्वजारोहण केलं

 • 26 Jan 2021 09:30 AM (IST)

  राजपथावरील लेटेस्ट फोटो

  राजपथावर कोव्हिड नियंमांचं पूर्णपणे पालन केलं जात आहे, कोरोनाच्या काळातही मोठ्या संख्येने लोक या कार्यक्रमासाठी पोहोचले आहेत.

 • 26 Jan 2021 08:41 AM (IST)

  लडाखमधील प्रजासत्ताक दिन

  लद्दाख मध्ये ITBP जवानांनी अनोख्या प्रकारे प्रजासत्ताक दिन साजरा केला. ते लोक तिरंग्याला घेऊन गोठलेल्या तलावावर चालले.

 • 26 Jan 2021 08:33 AM (IST)

  दिल्लीत प्रजासत्ताक दिनाची तयारी पूर्ण

 • 26 Jan 2021 08:22 AM (IST)

  बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालयाचं आज उद्घाटन

  बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालयाचं आज उद्घाटन, बाळासाहेबांच्या नावाला विदर्भवाद्यांचा विरोध कायम, आज दुपारी विदर्भवादी करणार विरोध प्रदर्शन,  बाळासाहेबांच्या नावाला आदिवासी संघटनांचाही आहे विरोध

 • 26 Jan 2021 08:01 AM (IST)

  शिवजन्मोत्सव समितीची पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यासोबत बैठक

  नाशिक - शिवजन्मोत्सव समितीची पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यासोबत बैठक, सर्व नियमांचं पालन करत शिवजन्मोत्सव साजरा करण्याचं पालकमंत्री भुजबळ यांच्या सूचना, पोलीस आयुक्त , पोलीस महासंचालक , शिवजन्मोत्सव समिती सदस्य यांच्या उपस्थितीत झाली बैठक, कोरोनाचा धोका लक्षात घेता साधेपणाने शिवजयंती करण्यास जन्मोत्सव समितीची तयारी

 • 26 Jan 2021 07:56 AM (IST)

  धनंजय मुंडे बीड जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण करणार

  बीड - सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे आज पहिल्यांदाच बीड जिल्ह्यात, 8.15 ला जिल्हाधिकारी कार्यालयात करणार ध्वजारोहण, 9.15 ला पोलीस मुख्यालयात करणार ध्वजारोहण

 • 26 Jan 2021 07:55 AM (IST)

  नाशकात पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते थोड्याच वेळात ध्वजारोहण

  नाशिक - पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते थोड्याच वेळात ध्वजारोहण, सकाळी 9.15 मिनिटांनी होणार ध्वजारोहण, नाशिकच्या पोलीस परेड मैदानावर होणार पोलीस दलाचे संचालन, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱयांचा होणार सन्मान

 • 26 Jan 2021 06:58 AM (IST)

  प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम काय?

  सकाळी 9.50 वाजता विजय चौक येथून परेड सुरु होईल आणि नॅशनल स्टेडियमकडे जाईल, चित्ररथ विजय चौकातून सुरु होऊन लाल किल्ल्यापर्यंत जाईल

 • 26 Jan 2021 06:54 AM (IST)

  72 वा प्रजासत्ताक दिन आज

  देश आज 72 व्या प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे, यानिमित्ताने, लाल किल्ल्यात प्रत्येक वर्षाप्रमाणे भारताच्या विविधता आणि सामर्थ्याची झलक देखील समोर येईल, कोरोनामुळे कार्यक्रम नेहमीप्रमाणे भव्य असणार नाही

 • 26 Jan 2021 06:45 AM (IST)

  पत्री पुलावर फोटो आणि सेल्फी काढण्यासाठी नागरिक उत्साही

  कल्याण-डोंबिवलीला जोडणारा नवीन पत्रीपूल नागरिकांसाठी खुला करण्यात आला, या पुलावर तिरंगी रोषणाई केल्याने ती पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली, तसेच नागरिक या ठिकाणी सेल्फी आणि फोटो काढण्यासाठी उत्साही आहेत.

 • 26 Jan 2021 06:40 AM (IST)

  साईबाबा मंदिर परिसरातील सर्व गेट सुरु करावेत, अन्यथा शिर्डी ग्रामस्थांचा गाव बंदचा इशारा

  शिर्डी ग्रामस्थांचा आंदोलनाचा गाव बंद व मोर्चा काढण्याचा इशारा, साई संस्थान मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या विरोधात ग्रामस्थ आक्रमक, कोरोनाच्या नावाखाली मनमानी कारभार करत असल्याचा आरोप, साईबाबा मंदिर परिसरातील सर्व गेट सुरू करावेत व ग्रामस्थांना सुलभ दर्शन द्यावी मागणी, अनेक वेळा मागणी करूनही दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांची बैठक, शनिवारपर्यंत निर्णय न घेतल्यास गाव बंद ठेऊन आंदोलनाचा इशारा, बैठकीत सर्वपक्षीय ग्रामस्थ एकवटले

 • 26 Jan 2021 06:34 AM (IST)

  मी केलेल्या कार्याचं आज चीज झालं : सिंधुताई सपकाळ 

  मी केलेल्या कार्याचं आज चीज झालं, माझ्यासाठी खूप मोठा धक्का होता, अजून खूप काम करायचं आहे, ज्यांच्यापर्यंत मी पोहचले नाही, त्यांच्यापर्यंत मला पोहचायचं आहे, थकल्या भागल्याना दोन घास भरवायचे आहेत, मानवता शिल्लक राहिली नाहीय, दुःख कुरवाळत बसू नका पुढे जा, अशी प्रतिक्रीया जेष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ  यांनी टीव्ही 9 मराठीला दिली, त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे

Published On - Jan 26,2021 11:57 AM

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें