AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बीएमसी निवडणुकीपूर्वी नामकरणावरुन भाजप-शिवसेनेत जुंपली, टिपू सुल्तान आणि बागेच्या नावाचा वाद काय?

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही आता राजकारणाचा पारा चढतोय. यात यंदा मुंबईतील एका बागेला टिपू सुल्तानचं नाव देण्यावरुन भाजप आणि शिवसेनेत चांगलीच जुंपलीय.

बीएमसी निवडणुकीपूर्वी नामकरणावरुन भाजप-शिवसेनेत जुंपली, टिपू सुल्तान आणि बागेच्या नावाचा वाद काय?
शिवसेना-भाजप
| Edited By: | Updated on: Jul 20, 2021 | 5:19 PM
Share

मुंबई : राज्यात महाविकासआघाडीने सरकार स्थापन केल्यानंतर राजकारणातील अनेक पारंपारिक समीकरणं बदलली आहेत. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राजकारणाचा पारा चढतोय. यात यंदा मुंबईतील एका बागेला टिपू सुल्तानचं नाव देण्यावरुन भाजप आणि शिवसेनेत चांगलीच जुंपलीय. भाजपकडून 1000 वर्षांपूर्वी म्हैसूरवर राज्य करणाऱ्या टिपू सुल्तानचा मुद्दा या निवडणुकीत कळीचा मुद्दा करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. याच मुद्द्यावर भाजप शिवसेनेच्या हिंदुत्वाला आव्हान देत आहे. दुसरीकडे शिवसेना बदललेल्या राजकीय समीकरणांचा विचार करुन काहीशी सौम्य भूमिका घेताना दिसत आहे. हा विषय नेमका कुठून सुरू झाला आणि सध्या नेमक्या काय राजकीय घडामोडी घडत आहेत याचाच हा आढावा.

टिपू सुल्तानचं नाव बागेला देण्याचा वाद कसा सुरू झाला?

मुंबईतील गोवंडी भागात 2 एकर परिसरावर एक बाग तयार करण्यात आलीय. समाजवादी पक्षाच्या नगरसेवक रुखसाना सिद्दिकी यांनी जानेवारी 2021 मध्ये या बागेला टिपू सुल्तानचं नाव द्यावं अशी मागणी बाजार आणि उद्यान समितीकडे केली. ही मागणी करताना त्या म्हणाल्या, “‘टिपू सुल्तान एक स्वातंत्र्य योद्धा होते. त्यांनी ब्रिटिशांच्या इस्ट इंडिया कंपनीविरोधात युद्ध लढलंय.” यानंतर पालिका प्रशासनाने जूनमध्ये ही मागणी मान्य केली. त्यानंतर 15 जुलै रोजी पालिकेने हा प्रस्ताव मंजूरीसाठी बाजार आणि उद्यान समितीकडे पाठवला. इथंच वादाची ठिणगी पडली.

पालिकेकडून मागणी मान्य करत मंजूरीसाठी बाजार आणि उद्यान समितीकडे प्रस्ताव आल्यानंतर हिंदू जनजागृती समितीसारख्या उजव्या संघटनांनी यावर आक्रमक भूमिका घेतली. नंतर या वादात भाजपनेही उडी घेत या प्रस्तावाला विरोध केला. त्यांनी टिपू सुल्तान हिंदू विरोधी असल्याचा आरोप करत त्यांचं नाव दिल्यास हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावतील अशी भूमिका घेतली.

बागेच्या नामकरणाचा विषय बाजार आणि उद्यान समितीच्या ऑनलाईन बैठकीतही आला. इथं भाजपनं हा प्रस्ताव रद्द करण्याची मागणी केली. तसेच ही मागणी मान्य न केल्यास पालिका प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा दिला. या बैठकीत शिवसेनेने भाजप नेत्यांना बोलू न दिल्याचाही आरोप भाजपने केलाय.

वादानंतर शिवसेनेची भूमिका काय?

भाजपने टिपू सुल्तान नावाला विरोध केल्यानंतर शिवसेनेने सावध भूमिका घेतलीय. शिवसेनेच्या नगरसेविका आणि बाजार व उद्यान समितीच्या अध्यक्षा प्रतिमा खोपडे यांनी हा नामकरणाचा प्रस्ताव अपूर्ण असल्याचा शेरा देत प्रस्ताव पुन्हा पालिका प्रशासनाकडे पाठवला. तसेच याबाबत अधिक माहिती मागितली. मात्र भाजपने हा प्रस्ताव मागे पाठवण्यात काहीच अर्थ नसून प्रस्तावच रद्द करण्याची मागणी केलीय.

शिवसेनेने भाजपवर प्रतिहल्ला करत भाजप धार्मिक विभाजन करत असल्याचा आरोप केलाय. मुंबईत अनेक ठिकाणांना टिपू सुल्तानचं नाव देण्यात आलेलं असताना या बागेवरुन भाजप राजकारण करत आहे, अशी भूमिका शिवसेनेने घेतलीय.

हेही वाचा :

नारायण राणेंची केंद्रात वर्णी, आमदार नितेश राणे कोअर कमिटीत! भाजपकडून मुंबई महापालिका निवडणुकीचं रणशिंग?

कंगनाने मुंबईची तुलना पाकिस्तानशी केली तेव्हा गप्प बसले, मुंबईकर भाजपला ओळखून बसलेत : भाई जगताप

महापालिका निवडणुकीपूर्वीच काँग्रेसला कापरं भरलंय, अतुल भातखळकरांचं टीकास्त्र

व्हिडीओ पाहा :

Know everything about controversy over naming of garden in Mumbai after Tipu Sultan

29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.