Video: करोडोची लॅम्बोर्गिनी एका क्षणात…कोस्टल रोडवर भीषण अपघाताचा थरार! आत बसलेल्या माणसाचं काय झालं?
मुंबईत रविवारी एका लॅम्बोर्गिनी कारचा अपघात झाला आहे. ओवर स्पिडमुळे हा अपघात झाल्याचे म्हटले आहे. गाडीचे मोठे प्रमाणावर नुकसान झाले आहे. मात्र आत बसलेल्या व्यक्तीचे नेमकं काय झालं वाचा...

मुंबईच्या वरळी परिसरात रविवारी एक लॅम्बोर्गिनी कारचा अपघात झाला. लॅम्बोर्गिनी कारचा चालक बेजबाबदारपणे गाडी चालवत होता, ज्यामुळे कारचे मोठे नुकसान झाले. कारचा पुढील आणि मागील भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. ही घटना कोस्टल रोडवरील नमन बिल्डिंगसमोर घडली. लॅम्बोर्गिनी कार अती वेगाने येत होती. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यामुळे गाडी थेट डिव्हायडरवर जाऊन आदळली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सर्वांना गाडीच्या आत बसलेल्या व्यक्तीचे काय झाले? असा प्रश्न पडला आहे.
समोर आलेल्या माहिती नुसार, लॅम्बोर्गिनी कार भरधाव वेगात चालली होती. तसेच पडत असलेल्या पावसामुळे रस्त्यावर थोडे पाणी साचले होते. या पाण्यामुळे गाडी घसरली आणि डिव्हायडरवर जाऊन आदळली. या घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसते की लॅम्बोर्गिनी चालक अतिशय वेगाने कार चालवत होता. चालकाचा वेग इतका जास्त होता की जणू तो रस्त्याला रेसिंग ट्रॅक समजून कार चालवत होता आणि हाच अती वेग अपघाताचे कारण ठरला.
#Mumbai: A speeding Lamborghini hit a divider on Coastal Road, but the driver remained unharmed, according to officials.
The driver, 52-year-old Atish Shah, a resident of Napier Sea Road, was reportedly heading towards Colaba in South Mumbai when he lost control of the car. pic.twitter.com/c6PDPSYYYc
— Siraj Noorani (@sirajnoorani) September 22, 2025
लॅम्बोर्गिनी थेट डिव्हायडरवर आदळली
अती वेगाने येणारी लॅम्बोर्गिनी थेट डिव्हायडरवर आदळली. अपघातानंतर लॅम्बोर्गिनीचे फोटो समोर आली आहेत. या फोटोंमध्ये कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसत आहे. सुदैवाने, या अपघातात लॅम्बोर्गिनी चालकाला काही झालेले नाही. परंतु इतक्या वेगाने आणि धोकादायक पद्धतीने वाहन चालवल्याने त्याने केवळ स्वतःचा जीवच धोक्यात घातला नाही, तर गाडीचेही मोठे नुकसान झाले.
चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 281, 125 आणि 324 (4) तसेच मोटर व्हेईकल्स ॲक्टच्या कलम 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा व्हिडीओ रेमंड कंपनीच्या मालकानेही एक्सवर शेअर केला आहे. त्यांनी व्हिडीओ शेअर करताना लिहिले आहे, “आणखी एक दिवस, आणखी एक लँबॉर्गिनीचा अपघात, यावेळी मुंबईच्या कोस्टल रोडवर. या कारमध्ये ट्रॅक्शन आहे की नाही?”
