AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जेलमधून हस्तकांशी संपर्क करण्यासाठी लॉरेन्स बिश्नोई कोणती टेक्नालॉजी वापरतो?

Lawrence Bishnoi : जेलमध्ये असताना लॉरेन्स बिश्नोई हा त्याच्या हस्तकांशी कसा संपर्क करतो? लॉरेन्स बिश्नोई जेलमधून हस्तकांशी संपर्क करण्यासाठी कोणती टेक्नालॉजी वापरतो? त्याच्या टोळीचं काम कसं चालतं? या सगळ्याबद्दल जाणून घेऊयात, वाचा सविस्तर बातमी.....

जेलमधून हस्तकांशी संपर्क करण्यासाठी लॉरेन्स बिश्नोई कोणती टेक्नालॉजी वापरतो?
lawrence bishnoi
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Oct 17, 2024 | 12:49 PM
Share

लॉरेन्स बिश्नोई… गुन्हेगारी विश्वात दबादबा असणारं नाव. गायक सिद्धू मुसेवाला याचा मर्डर असो की राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांची हत्या… या मागे लॉरेन्स बिश्नोईचा हात होता. पण मागच्या 10 वर्षांपासून तुरुंगात असणारा लॉरेन्स बिश्नोई त्याचं नेटवर्क कसं चालवतो? त्याच्या हस्तकांशी कसा संपर्क करतो? याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न असेल. लॉरेन्स बिश्नोई याच्या नेटवर्कबद्दलची माहिती समोर आली आहे. लॉरेन्स बिश्नोई त्याच्या गँगमधील लोकांशी कसा संपर्क साधतो? त्याच्या हस्तकांशी संपर्कासाठी तो कोणतं माध्यम वापरतो? जाणून घेऊयात…

संपर्कासाठी कोणतं साधन वापरतो?

एखाद्याच्या हत्येचं प्लनिंग लॉरेन्स करतो. हत्या कशी होणार, हत्यारं कोण पोहोचवणार, पळून कुठे जाणार, याचं सगळं गणित लॉरेन्स बिश्नोई आखतो. संपर्कासाठी VOIP अर्थात व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल सिस्टिमचा लॉरेन्स बिश्नोई वापर करतो. या सिस्टिममधून तो इंटरनेट कॉलिंग करतो. याला ट्रेस करणं अवघड असतं. पण असे कॉल्स लॉरेन्स बिश्नोई स्वत: करत नाही. तर तो त्याच्या लोकांना बोलावून घेतो. त्यांच्या माध्यमातून तो हे कॉल्स करतो, असं एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे.

अशी वाढवतो टोळी

एका रिपोर्टनुसार लॉरेन्स बिश्नोई जेलमधून कम्युनिकेशन करत त्याची टोळी चालवतो. यासाठी तो त्याच्या इतर साथिदारांची मदत घेतो. जेलमध्ये असणाऱ्या इतर गुन्हेगारांशी तो संपर्कात असतो. त्यांना जामीनासाठी तसंच जेलच्या बाहेर गेल्यानंतर लपण्यासाठी लॉरेन्स बिश्नोई जागा देतो. त्यामुळे छोट्या गुन्ह्यांमध्ये अटकेत असणारे लोक त्याला मदत करत असतात.

एखाद्याची हत्या केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई त्याची जबाबदारी का स्विकारतो?

लॉरेन्स बिश्नोईच्या गँगने कुणाचीही हत्या केली. कुठेही गोळीबार केला तरी लॉरेन्स बिश्नोई पुढे त्याची जबाबदारी स्विकारतो. सोशल मीडियावर पोस्ट लिहित लॉरेन्स बिश्नोई आपणच ही हत्या केल्याचं कबुल करतो. पण अनेकांना प्रश्न पडला असेल की तो पुढे येत गुन्ह्याची कबुली का देतो? तर जेव्हा लॉरेन्स बिश्नोई अशा हत्येच्या घटनांची जबाबदारी स्विकारतो तर त्याचा दबदबा निर्माण होईल, असं लॉरेन्स बिश्नोईला वाटतं. त्याचा वचक असावा, असं लॉरेन्स बिश्नोईला वाटत असल्याने तो पुढे येत हत्येची जबाबदारी स्विकारतो.

Follow Us
दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात; १२५ नगरसेवकांकडून एक महिन्याचे मानधन
Video : दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात; १२५ नगरसेवकांकडून एक महिन्याचे मानधन, पाणी कपातीचे संकेत
संजय राऊतांवर निशाणा साधत ज्योती वाघमारे यांचा हल्लाबोल
Video: प्रदीप पूर्णेकर प्रकरण... संजय राऊतांवर निशाणा साधत ज्योती वाघमारे यांचा हल्लाबोल, 'जिथे राजकारण दिसतं तिथेच राऊत का जातात?'
उद्धव ठाकरे पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीला; मुलगा म्हणाला, जीवाची...
उद्धव ठाकरे पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीला; मुलगा म्हणाला, जीवाची भीती, धमक्यांचा दावा...
नवीन नियम लागू! ST बसमध्ये सवलत हवी असेल तर आता हे कार्ड अनिवार्य
नवीन नियम लागू! ST बसमध्ये सवलत हवी असेल तर आता हे कार्ड अनिवार्य
पप्या शिंदे खंडणी विरोधी पथकात, आईची पहिली प्रतिक्रिया समोर; पुरणेकर..
Pradeep Purnekar Case | अटकेत असलेला आरोपी पप्या शिंदेला खंडणी विरोधी पथकात आणलं, आता...
ठाकरे गट मोठ्या तयारीत! 4 ऑक्टोबरला आंदोलन नंतर 7 ऑक्टोंबरला थेट..
ठाकरे गट मोठ्या तयारीत! 4 ऑक्टोबरला आंदोलन आणि 7 ऑक्टोंबरला थेट...
ज्ञानेश कुमारांविरोधात CJP आक्रमक; मुंबईत उद्या जेलभरो आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमारांविरोधात CJP आक्रमक; मुंबईत उद्या जेलभरो आंदोलनाचा इशारा!
दुष्काळाची झळ! नागपूरचं संत्रा मार्केट ओस पडलं, 70 टक्के उत्पादन घटलं
दुष्काळाची झळ! नागपूरचं संत्रा मार्केट ओस पडलं, 70 टक्के उत्पादन घटलं
माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर...पुर्णेकर प्रकरणात
Pradip Purnekar | माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर... प्रदीप पुर्णेकर प्रकरणात पप्या शिंदेंच्या आईचा मोठा दावा
वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद - बजरंग सोनवणे
Bajrang Sonawane : वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद; बजरंग सोनवणेंचा गंभीर आरोप