AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी घट, नवे दर काय?

१ जुलै २०२५ रोजी एलपीजी गॅसच्या नवीन किमती जाहीर झाल्या आहेत. १९ किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत लक्षणीय घट झाली आहे, दिल्लीत ६० रुपयांपर्यंत. घरगुती सिलेंडरच्या किमतीत मात्र बदल नाही.

एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी घट, नवे दर काय?
| Updated on: Jul 01, 2025 | 12:14 PM
Share

सध्या देशात महागाईचा भडका उडाला आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. बेस्ट बस, रिक्षा, टॅक्सी आणि रेल्वेच्या तिकीट दरात वाढ झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष गॅस सिलेंडरच्या किमतींकडे लागले होते. आज १ जुलै २०२५ रोजी सकाळी तेल विपणन कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलेंडरचे नवे दर जाहीर केले आहेत. यात व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत लक्षणीय कपात करण्यात आली आहे. यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

तेल विपणन कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलेंडरचे नवे दर जाहीर केले आहेत. १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत लक्षणीय घट झाली आहे. दिल्लीपासून वाराणसीपर्यंत हा सिलेंडर ६० रुपयांपर्यंत स्वस्त झाला आहे. ज्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट आणि इतर व्यावसायिक आस्थापनांना फायदा होईल. मात्र, घरगुती सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.

एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत कपात

देशातील विविध शहरांमध्ये १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत ५७ ते ६० रुपयांपर्यंत कपात झाली आहे. दिल्लीमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलेंडर १७२३.५० रुपयांना होता, पण आता हा सिलेंडर १६६५ रुपयांना मिळणार आहे. तर कोलकातामध्ये १८२६ रुपयांना विक्री होणारा सिलेंडर १७६९ रुपयांना मिळणार आहे. तसेच मुंबईत हा सिलेंडर आता १६१६ रुपयांना मिळेल. तर चेन्नईमध्ये त्याची किंमत १८२३.५० रुपये इतकी झाली आहे.

दरम्यान सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बाब म्हणजे १४ किलोच्या घरगुती सिलेंडरच्या किमतीत मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दिल्लीसह मुंबई, कोलकाता या शहरात घरगुती सिलेंडरची किंमत साधारण ८०० ते ९०० रुपये आहे. हा सिलेंडर सरकारी अनुदानाच्या (सबसिडी) कक्षेत येतो, ज्यामुळे लोकांना आधीच काही प्रमाणात दिलासा मिळत आहे.

शहर घरगुती सिलेंडरची किंमत (₹)
दिल्ली 853.00
पाटणा 942.50
लखनऊ 890.50
मुंबई 852.50
हैदराबाद 905.00
गाजियाबाद 850.50
वाराणसी 916.50

उज्ज्वला योजनेअंतर्गत लोकांना मोठा आधार 

सरकार उज्ज्वला योजनेअंतर्गत १० कोटी लाभार्थ्यांना सिलेंडरवर ३०० रुपयांची थेट सबसिडी दिली जाते. यासाठी २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात १११०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेमुळे दुर्बळ घटकातील लोकांना मोठा आधार मिळतो. थोडक्यात, व्यावसायिक गॅस वापरणाऱ्यांसाठी ही एक चांगली बातमी आहे, तर घरगुती ग्राहकांना मात्र वाढत्या महागाईतून फारसा दिलासा मिळालेला नाही.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...