महाविकास आघाडी हा राजकीय लव्ह जिहाद; सुधीर मुनगंटीवारांची टोलेबाजी

राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मिश्किल भाष्य केलं आहे. (maha vikas aghadi was a political love jihad)

  • सुनील काळे, टीव्ही 9 मराठी, मुंबई
  • Published On - 14:26 PM, 3 Mar 2021
महाविकास आघाडी हा राजकीय लव्ह जिहाद; सुधीर मुनगंटीवारांची टोलेबाजी
सुधीर मुनगंटीवार, भाजप नेते

मुंबई: राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मिश्किल भाष्य केलं आहे. महाविकास आघाडी हा राजकीय लव्ह जिहाद होता, असा टोलाच सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेला लगावला आहे. (maha vikas aghadi was a political love jihad)

सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत कोरोना परिस्थितीवर बोलताना ठाकरे सरकारला चिमटे काढले. उपमुख्यमंत्री अजित पवारांशी आमची 72 तासांची मैत्री होती. तरीही ती कायम आहे, असं सांगतानाच आघाडी सरकार हा तर राज्यातील राजकीय लव्ह जिहाद होता, असा टोला मुनगंटीवार यांनी लगावताच सभागृहात एकच खसखस पिकली.

हे करंटं सरकार

यावेळी कोरोना परिस्थितीवरूनही त्यांनी सरकारवर टीका केली. कोव्हिड योद्धे म्हणून कोव्हिड योद्ध्यांचं अभिनंदन करता आणि त्यांना सहा-सहा महिने पैसे देत नाहीत. हा कुठला न्याय आहे? असा सवाल त्यांनी केला. या सरकारकडे विधानसभा चमकवण्यासाठी 15 कोटी रुपये आहेत, पण गोरगरीबांसाठी पैसै नाहीत. हे सरकार करंट असून अधिकारी आहे… पण राज्य भकास आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

‘आशिष’ न घेता फक्त ‘सिंग’ घेतला

मुख्यमंत्री कार्यालयात आशिष सिंग आणि विकास खारगे असे अतिशय प्रामाणिक अधिकारी आहेत. मला वाटलं या दोन्ही अधिकाऱ्यांच्या नावाप्रनाणे काम कराल. पण तुम्ही नावातला ‘आशिष’ न घेता फक्त ‘सिंग’ घेतला, अशी टीकाही त्यांनी केली.

राष्ट्रपती राजवटीशिवाय पर्याय नाही

जळगाव येथील एका वसतिगृहात काही तरुणींना विवस्त्र होऊन नृत्य करण्याची सक्ती करण्यात येत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आज विधानसभेत त्यावरून पडसाद उमटले. भाजप नेते सुधीर मुनंगटीवार यांनी या प्रकरणावरून प्रचंड संताप व्यक्त करत थेट राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ आल्याचं सांगितल होतं. मी संविधानाला मानणारा आहे. संविधानाचं पालन करणारा आहे. पण राज्यात आमच्या आयाबहिणींची होत असलेली थट्टा पाहता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याशिवाय पर्याय नाही. आमच्या आयाबहिणीला नग्न केलं जातं हे महाराष्ट्राला शोभते काय? असा सवाल करतानाच सरकारवर राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ आली आहे. तशी मलाच मागणी करावी लागेल, असं ते म्हणाले.

मलिकांची हरकत

मुनगंटीवारांनी राष्ट्रपती राजवटीच्या मागणीचा इशारा देताच नवाब मलिक यांनी त्याला जोरदार हरकत घेतली. मुनगंटीवार हे राष्ट्रपती राजवट लागू करण्याची धमकी देत आहेत. हे लोकांनी निवडून दिलेलं सरकार आहे. सरकार हे संख्याबळावर चालतं. धमक्या देणं योग्य नाही, असं सांगतानाच हल्लीच्या काळात राजकीय उद्देश ठेवून काम सुरू आहे, त्यामुळे मुनंगटीवार यांचं वाक्य कामकाजातून काढून टाकावं, अशी मागणी मलिक यांनी केली. विधानसभा अध्यक्षांनी मलिक यांची मागणी मान्य करत संबंधित विधान तपासून मुनगंटीवारांचं विधान कामकाजातून काढून टाकण्यात येईल, असं सांगितलं. (maha vikas aghadi was a political love jihad)

 

संबंधित बातम्या:

Maharashtra budget session 2021 LIVE | सरकार काळजीवाहूचं आहे, शेतकरी मदतीवरुन देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक तात्काळ घ्या, काँग्रेस नेत्यांचा जोर

गुजरात दंगल ही गोध्रा हत्याकांडावरची रिअ‍ॅक्शन होती: चंद्रकांत पाटील

(maha vikas aghadi was a political love jihad)