AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठरलं, महाराष्ट्र बंद म्हणजे बंद, राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यावर ‘मविआ’चा एकमताने निर्णय…

राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आता महाविकास आघाडी आणि मित्रपक्षांनी एकत्र येत महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.

ठरलं, महाराष्ट्र बंद म्हणजे बंद, राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यावर 'मविआ'चा एकमताने निर्णय...
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Nov 25, 2022 | 10:06 PM
Share

मुंबईः राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील दिग्गज व्यक्तींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. आधी सावित्रीबाई फुले आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने विरोधकांसह शिंदे गटातील नेत्यांनीही त्यांच्यावर निशाणा साधला. त्यांच्यावर जोरदार टीका होत असताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शांततापूर्ण महाराष्ट्र बंदचा इशारा दिला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र बंदसाठी महाविकास आघाडीतील मित्र पक्षांकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत.

राज्यपालांना हटवण्याची मागणीासठी महाराष्ट्र बंदमध्ये ठाकरे गटासह मित्र पक्षांनीही सहभागी व्हावे यासाठी आता संजय राऊत यांनी जोरदार प्रयत्न केले आहेत. यासाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेऊन विचारविनिमय केला असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शांततापूर्ण महाराष्ट्र बंदचा इशारा दिला आहे. त्यानंतर महाराष्ट्र बंदमध्ये ताकद दाखवण्यासाठी महाविकास आघाडीची आता मदत घेतली जाणार आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादीला बरोबर घेऊन आता पुढची रणनिती आखली गेली आहे. या महाराष्ट्र बंदमध्ये आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश असणार असून हे आंदोलन होणार असल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र बंद होणार असा इशारा दिला आहे. तसेच त्यांनी शरद पवारांची भेट घेऊन आल्यानंतर त्यांनी महाराष्ट्राचं पाणी दाखवावं असा इशाराही त्यानी सत्ताधाऱ्यांना दिला आहे

तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यपालांच्या वक्तव्यावर बोलताना सांगितले की, राज्यपालांकडून वारंवार सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले जाते. त्यामुळे आता महाराष्ट्र बंदची हाक देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Follow Us
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान