AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

EVM हॅक करता येतं, इंजिनिअर… मला सगळ माहीत; माजी मंत्री महादेव जानकर यांनी बॉम्बच फोडला

Mahadev Jankar on EVM Hack : माजी मंत्री महादेव जानकर यांनी EVM बाबत मोठं विधान केलं आहे. हॅक करता येत, इंजिनिअर... मला सगळ माहीत आहे, असं जानकर म्हणाले आहेत. तसंच महायुतीत वाईट अनुभव आल्याचं जानकरांनी म्हटलं आहे. महादेव जानकरांची संपूर्ण प्रतिक्रिया, वाचा सविस्तर बातमी....

EVM हॅक करता येतं, इंजिनिअर... मला सगळ माहीत; माजी मंत्री महादेव जानकर यांनी बॉम्बच फोडला
महादेव जानकरImage Credit source: Facebook
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Nov 30, 2024 | 12:40 PM
Share

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल हा अनेकांसाठी धक्कादायक होता. यंदाच्या या निवडणुकीत अनेक दिग्गजांचा पराभव झाला. अशातच महाविकास आघाडीकडून वारंवार ईव्हीएमवर संशय व्यक्त केला जात आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि फडणवीस सरकारमध्ये पशुपालन मंत्री राहिलेले महादेव जानकर यांनीही ईव्हीएमवर संशय व्यक्त केला आहे. तसंच ईव्हीएम हॅक करता येऊ शकतं, असं मोठं विधान महादेव जानकर यांनी केलं. त्यांच्या या विधानाने एकच खळबळ उडाली आहे. तसंच स्वपक्षातील आमदार रत्नाकर गुट्टे यांनाही जानकरांनी इशारा दिला आहे.

महादेव जानकर यांनी ईव्हीएमबाबत काय म्हटलं?

अनेक ठिकाणी ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्यामुळं महायुतीच्या जागा निवडून आल्या आहेत. ईव्हीएमवर माझा आक्षेप आहे. देशभरात आम्ही याविरोधात आंदोलन करू. ईव्हीएममुळे देशाची लोकशाही धोक्यात आली आहे. ईव्हीएम हॅक करता येतं. मी स्वतः इंजिनिअर आहे. त्यामुळं मला सगळं माहीत आहे. सुप्रीम कोर्ट, निवडणूक आयोग सगळे त्यांचे आहेत. त्यामुळं याला लोकशाही म्हणता येणार नाही. लोकशाहीचा खून करण्याचं काम झालं आहे, असं महादेव जानकर म्हणालेत.

महादेव जानकर यांनी महायुतीतून बाहेर पडत एकला चलो रे ची भूमिका घेतली आहे. त्यावर बोलताना मला महायुतीचा अनुभव खूप वाईट आला आहे. त्यामुळं मी त्यांच्यापासून दूर आहे. काँग्रेसला अजून चाखल नाही. त्यामुळं त्यांच्याकडे न जाता स्वतंत्र पुढे जायची आमची भूमिका आहे, असं महादेव जानकर म्हणालेत.

जानकरांचा रत्नाकर गुट्टेंना इशारा

रत्नाकर गुट्टे हा माझ्या पक्षाचा सध्या एकच आमदार आहे. कोणासोबत जायचं याचा अजून निर्णय झालेला नाही. पण जर त्याने पक्षाला न विचारता काही निर्णय घेतला तर त्यावर नक्की आम्ही कारवाई करू.मी सगळ्या गोष्टी च्या ठेचा लागल्या आहेत. त्यामुळं मी सगळ्या गोष्टी माझ्या ताब्यात ठेवल्या आहेत. त्यामुळं माझा एक आमदार असला तरी तो पक्षावर दावा सांगू शकत नाही, असं म्हणत महादेव जानकर यांनी गंगाखेडच्या आपल्याच पक्षाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांना इशारा दिला आहे.

Follow Us
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
नवी मुंबईत थरार! शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
Mumbai -Nashik Highway | भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन् संभाजीनगरात... बोलता बोलता सुषमा अंधारे हे काय म्हणाल्या?
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
मोठी बातमी! बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज, AI शेती... मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना
Sunetra Pawar | नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना वेटिंगवर ठेवलं? भर मंचावर...
ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी....
Goregaon Drugs Case | ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी गजाआड
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापती
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड होताच सुनेत्रा पवार यांच्याकडून अभिनंदन!
मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
Heavy Rain | मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
मोठी बातमी! श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा Video
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा व्हिडीओ!