AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cow in Drainage Video | ड्रेनेजच्या टाकीत गाय पडली, मुंबईत दादर कबुतर खान्याजवळ प्रकार

ड्रेनेजच्या टाकीत गाय पडल्याची घटना मुंबईतील दादर भागात असलेल्या भवानी शंकर रोडवरील कबुतर खाना परिसरात उघडकीस आली आहे. सोमवारी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला.

Cow in Drainage Video | ड्रेनेजच्या टाकीत गाय पडली, मुंबईत दादर कबुतर खान्याजवळ प्रकार
ड्रेनेजच्या टाकीत गाय पडलीImage Credit source: टीव्ही9
| Edited By: | Updated on: Mar 28, 2022 | 9:52 AM
Share

मुंबई : ड्रेनेजच्या टाकीत गाय पडल्याचा (Cow) प्रकार समोर आला आहे. मुंबईतील दादर भागात (Dadar Mumbai) असलेल्या कबुतर खाना परिसरात ड्रेनेजच्या टाकीत (Drainage Tank) गाय पडली. आज (सोमवारी) सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. ड्रेनेज टाकीच्या झाकणावर गाय उभी असताना, झाकण सरकून गाय आत पडल्याची माहिती आहे. मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान तिला बाहेर काढण्याचे प्रयत्न करत आहेत. बीएमसीचे कर्मचारी सुद्धा घटनास्थळी उपस्थित आहेत. गायीला सुखरुप बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. गायीपर्यंत चारा आणि पाणीही पोहोचवण्यात आलं आहे.

नेमकं काय घडलं?

ड्रेनेजच्या टाकीत गाय पडल्याची घटना मुंबईतील दादर भागात असलेल्या भवानी शंकर रोडवरील कबुतर खाना परिसरात उघडकीस आली आहे. सोमवारी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. गाय ड्रेनेज टाकीच्या झाकणावर उभी होती. यावेळी अचानक झाकण सरकलं आणि गाय टाकीत पडली, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.

गायीला सुखरुप बाहेर काढण्याचे प्रयत्न

मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान आणि बीएमसीचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. गायीला सुखरुप बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. आजूबाजूचा भाग खोदून तिला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. गायीला इजा होऊ न देण्याचा प्रयत्न जवान करत आहेत.

अडकलेल्या गायीपर्यंत चारा आणि पाणीही पोहोचवण्यात आलं आहे. दरम्यान दादरमधील भाग सकाळच्या वेळेस गजबजलेला असतो. गाय टाकीत पडल्यानंतर बघ्यांची गर्दी झाली. त्याचवेळी जवानही बचावकार्य करत असल्यामुळे परिसरात काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

हौसेला नाही मोल, डोहाळं जेवण गायीचे अन् कौतुक अख्ख्या गावाला

 माढ्यात गाईने दिला एकाच वेळी दोन वासरांना जन्म, शेतकरी कुटुंबियांनी पेढे वाटून आनंद केला साजरा

अहो खरंच का… गायीच्या पोटी जुळ्या वासरांची जोडी, गाव म्हणतंय मारुतीरायाच्या सेवेचा प्रसाद!

मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.