AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रात वारं फिरलं; शरद पवार, ठाकरेंचा मोठा सेटबॅक, सी वोटर्सचा धक्कादायक एक्झिट पोल

महाराष्ट्रातील वातावरण फिरल्यासारखं एक्झिट पोलनुसार दिसत आहे. सी-वोटर्समध्ये महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाल्याचं दिसत आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना महायुतीला धक्का दिला आहे.

महाराष्ट्रात वारं फिरलं; शरद पवार, ठाकरेंचा मोठा सेटबॅक, सी वोटर्सचा धक्कादायक एक्झिट पोल
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Jun 01, 2024 | 7:29 PM
Share

लोकशाहीचा उत्सव असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा सातवा टप्पा पार पडला आहे. या निवडणुकांचा एक्झिट पोल समोर आला आहे. देशभरातील जनतेचे डोळे या निकालाकडे लागले आहेत. अशातच सी व्होटरने एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रातील आकडेवारी जाहीर केली आहे. या एक्झिट पोलमध्ये भाजपसाठी मोठ धक्का बसलेला दिसत आहे. महाराष्ट्रात मोठा सेटबॅक पाहायला मिळालाय, मविआ यशस्वी होत असल्याचा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे.

महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये अटीतटीची लढत झाल्याचं दिसत आहे. सी-व्होटरने दिलेल्या आकडेवारीमध्ये मविआला 24 आणि महयुतीला 23 जागा मिळणार असल्याचं पोलमध्ये म्हटलं आहे. यामध्ये भाजप १७ , एकनाथ शिंदे गट ६, अजित पवार गट १ जागा तर मविआमध्ये ठाकरे गट ९, काँग्रेस ८ आणि शरद पवार गट ६ जागा असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

एकंदरित सी वोटर्सच्या एक्झिट पोलनुसार अवघ्या एका जागेचा फरक दिसत आहे. जर असाच हा निकाल असेल तर भाजपसाठी धक्का मानला जात आहे. मागील निवडणुकीमध्ये शिवसेना-भाजप यांच्या  41 जागा आल्या होत्या. मात्र महायुती असूनही भाजपसाठी 24 जागा म्हणजे मविआने मोठं यश मिळवलं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अजित पवार आणि एकनाथ शिंदे भाजपसोबत असूनही त्यांना या एक्झिट पोलनुसार अधिक जागा येणार असल्याचा दावा महायुतीकडून करण्यात येत होता. त्यामुळे महायुतीचं यंदा महाराष्ट्रामधील 45 पार करण्याचा दावा फोल ठरताना दिसत आहे. सी वोटर्सच्या पोलनुसार अवघ्या एका जागेने महायुतीकडे आघाडी असल्याचं दिसत आहेत.

दरम्यान, मविआच्या 23 जागांमधील सर्वाधिक जागा उद्धव ठाकरेंच्या पक्षाला सर्वाधिक ९ जागा मिळताना दिसत आहे. तर काँग्रेसला 9 आणि  शरद पवार यांना 6 जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला. मात्र यावरून एक स्पष्ट होत आहे की अजित पवारांचं बंड जनतेला काही रूचलेलं दिसलं नाही.

Follow Us
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
मोठी बातमी! तृणमूल चिन्ह सुनावणीबाबत मोठी अपडेट, न्यायालयाकडून तातडी..
मोठी बातमी! तृणमूल चिन्ह सुनावणीबाबत मोठी अपडेट, न्यायालयाकडून तातडीचे निर्देश
महाराष्ट्राला या संकटातून बाहेर काढा; मंगलप्रभात लोढांची बाप्पाच्या...
महाराष्ट्राला या संकटातून बाहेर काढा; मंगलप्रभात लोढांची बाप्पाच्या चरणी विशेष प्रार्थना
चार एकर सोयाबीन, लाखोंचा खर्च अन् पदरी नुकसान; फडणवीसांसमोर शेतकरी...
चार एकर सोयाबीन, लाखोंचा खर्च अन् पदरी नुकसान; फडणवीसांसमोर शेतकऱ्यांचा आक्रोश
कणाहीन निवडणूक आयोगाची चौकशी करा; राज ठाकरेंनी थेट ज्ञानेश कुमार...
निवडणूक आयोगाचीच चौकशी करा; राज ठाकरेंनी थेट ज्ञानेश कुमारांना घेरलं
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार तत्पर; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे...
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार तत्पर; मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली महत्त्वाची माहिती
राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला इशारा; ‘वेळ आल्यावर...
Rahul Gandhi : राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला इशारा; ‘वेळ आल्यावर... नेमकं प्रकरण काय?
मुख्यमंत्री फडणवीस अमरावती वाशिम दौऱ्यावर दुष्काळी परिस्थितीचा घेणार..
मुख्यमंत्री फडणवीस अमरावती वाशिम दौऱ्यावर दुष्काळी परिस्थितीचा घेणार आढावा
ज्ञानेश कुमार यांच्यामागचा बॉस कोण? संजय राऊतांनी सरळ नावचं सांगून...
ज्ञानेश कुमार यांच्यामागचा बॉस कोण? संजय राऊतांनी सरळ नावचं सांगून टाकलं
अशोक उईकेंचं अभिजीत दीपकेंना थेट आव्हान; आश्रमशाळ मुद्द्यावरून...
अशोक उईकेंचं अभिजीत दीपकेंना थेट आव्हान; आश्रमशाळांच्या मुद्द्यावरून मोठा वाद