AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

OBC Reservation: जिल्हा परिषद निवडणुकांसदर्भातील याचिकेवर 6 जुलै रोजी सुनावणी, सुप्रीम कोर्टाचा निर्णय

सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) ओबीसींचं राजकीय आरक्षण (OBC Political Reservation) रद्द केल्यानंतर राज्यातील नागपूर, अकोला, वाशिम, धुळे आणि नंदूरबार या जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांचा पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

OBC Reservation: जिल्हा परिषद निवडणुकांसदर्भातील याचिकेवर 6 जुलै रोजी सुनावणी, सुप्रीम कोर्टाचा निर्णय
सुप्रीम कोर्ट
| Edited By: | Updated on: Jul 02, 2021 | 12:53 PM
Share

मुबंई : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) ओबीसींचं राजकीय आरक्षण (OBC Political Reservation) रद्द केल्यानंतर राज्यातील नागपूर, अकोला, वाशिम, धुळे आणि नंदूरबार या जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांचा पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकारनं कोरोना विषाणू संसर्गाची तिसरी लाट आणि डेल्टा प्लस वेरिएंटचे रुग्ण या पार्श्वभूमीवर पोटनिवडणुका 6 महिने लाबंणीवर टाकण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. राज्य सरकारच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली.आता जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणूक प्रकरणातील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. 6 जुलै रोजी पुढील सुनावणी होणार आहे. 6 जुलैला आता या संदर्भातील सर्वच याचिकांवर सुनावणी पार पडेल, अशी माहिती मिळतेय.  सुनावणीमध्ये काय निर्णय होणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. (Maharashtra Government file plea to Supreme Court to postpone ZP and Panchayat Samiti election for six months due to covid hearing today live updates OBC Political Reservation Issue)

राज्य सरकारच्या याचिकेत नेमकं काय?

महाराष्ट्र सरककारनं सध्या राज्यात कोरोना महामारीचं संकट आहे. केंद्र सरकारनं डेल्टा प्लस वेरिएंट अधिक संक्रामक असल्याचा इशारा दिलेला आहे. राज्यात सध्या तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू आहेत सार्वजनिक ठिकाणी लोकांना जमा होण्यास मनाई करण्यात आलेली आहे. या कारणांमुळे 5 जिल्हा परिषद आणि त्यांअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका 6 महिने लांबणीवर टाकण्याची याचिका केली आहे.

सरकारचा राज्य निवडणूक आयोगाकडे पत्रव्यवहार

महाराष्ट्र सरकारनं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यापूर्वी पोटनिवडणुका लांबणीवर टाकण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडे पत्रव्यवहार केला होता. मात्र, सुप्रीम कोर्टाचे निर्देश असल्याशिवाय पोटनिवडणुका लांबणीवर टाकता येणार नाहीत, असं महाराष्ट्र सरकारला कळवलं होतं. त्यानंतर राज्यानं सुप्रीम कोर्टाकडे याचिका दाखल केली होती. राज्याच्या याचिकेवर आज सुनावणी होत आहे.

2 महिन्यांच्या स्थगितीनंतर निवडणूक प्रक्रिया

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रिक्त झालेल्या पदांच्या निवडणुका सर्वसाधारण प्रवर्गातून घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महिला आरक्षणाची सोडत काढण्यात आली. त्याचबरोबर या पोटनिवडणुकांसाठी 27 एप्रिल 2021 रोजी मतदान केंद्रनिहाय मतदार यादीदेखील प्रसिद्ध करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने 22 मार्च 2021 रोजीच्या निर्णयानुसार राज्य निवडणूक आयोगाने सुरु केलेली ही प्रक्रिया पुढे चालू ठेवण्याचे आदेश दिले होते; परंतु राज्य शासनाने 19 मार्च 2021 रोजीच्या पत्रान्वये राज्यातील कोविड- 19 ची परिस्थिती आयोगाच्या निदर्शनास आणून दिली होती. या परिस्थितीचा विचार करता निवडणूक प्रक्रिया दोन महिन्यांसाठी स्थगित करणे आवश्यक असल्याबाबत आयोगाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते. कोविड-19 च्या परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आयोगाने समयोचित निर्णय घ्यावा, असे न्यायालयाने त्यासंदर्भात 30 एप्रिल 2021 रोजी आदेश दिले होते, असेही ते म्हणाले.

कसा आहे संपूर्ण निवडणूक कार्यक्रम?

29 जून 2021 ते 5 जुलै 2021 या कालावधीत नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येतील. 4 जुलै 2021 रोजी रविवार असल्याने नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी 6 जुलै 2021 रोजी होईल. नामनिर्देशनपत्रासंदर्भातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या निर्णयाविरुध्द जिल्हा न्यायाधिशांकडे 9 जुलै 2021 पर्यंत अपील दाखल करता येईल. अपील नसलेल्या ठिकाणी 12 जुलै 2021; तर अपील असलेल्या ठिकाणी 14 जुलै 2021 पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. 19 जुलै 2021 रोजी सकाळी 07.30 ते सायंकाळी 05.30 या वेळेत मतदान होईल. 20 जुलै 2021 रोजी मतमोजणी होईल, असेही श्री. मदान यांनी सांगितले.

किती जिल्हा परिषद जागांसाठी मतदान होतंय?

धुळे – 15 नंदूरबार – 11 अकोला – 14 वाशिम -14 नागपूर -16

नेमक्या किती पंचायत समिती जागांसाठी मतदान?

धुळे -30 नंदूरबार -14 अकोला -28 वाशिम -27 नागपूर -31

संबंधित बातम्या:

वडेट्टीवार म्हणाले, OBC असल्याने महसूल खातं मिळालं नाही, थोरात म्हणतात, वय बघता थोडी वाट पाहा!

फडणवीस आणि फसवणूक हे समानार्थी शब्द, ओबीसी आरक्षणावरुन काँग्रेसचा हल्लाबोल

Maharashtra Government file plea to Supreme Court to postpone ZP and Panchayat Samiti election for six months due to covid hearing today live updates OBC Political Reservation Issue

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.