AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्य सरकारच्या मराठा आरक्षणासाठी हालचाली वाढल्या, महत्त्वाच्या घडामोडी घडणार

मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी आक्रमक झाले आहेत. त्यांनी गेल्या चार दिवसांपासून पुन्हा उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यामुळे सरकारवर दबाव वाढताना दिसतोय. असं असताना मराठा आरक्षणासाठी आगामी काळात महत्त्वाच्या घडामोडी घडण्याचे संकेत मिळत आहेत. कारण राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. येत्या सोमवारी मंत्रालयात महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत.

राज्य सरकारच्या मराठा आरक्षणासाठी हालचाली वाढल्या, महत्त्वाच्या घडामोडी घडणार
maratha reservation Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 28, 2023 | 9:08 PM
Share

विनायक डावरुंग, Tv9 मराठी, मुंबई | 28 ऑक्टोबर 2023 : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर आली आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळे सरकारपुढील दबाव वाढला आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी वेगवान हालचाली सुरु केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मराठा आरक्षण उपसमितीची सोमवारी सकाळी 10 वाजता मंत्रालयात बैठक बोलावण्यात आली आहे. विशेष म्हणजे मराठवाड्यातील मराठ्यांना आरक्षण देण्यासंदर्भात नेमलेल्या समितीकडून माहिती मागवण्यात आली आहे. समितीने आत्तापर्यंत काय काम केले? यासंदर्भातला अहवाल समिती उपसमितीला सादर करणार आहे. जरांगे पाटील यांचं उपोषण सोडविण्यासाठी सरकारकडून मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू आहेत. याबाबत उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

मराठा आरक्षण आणि सुविधांसाठी गठीत केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक सोमवारी 30 ऑक्टोबरला सकाळी 10 वाजता मंत्रालयात चंद्रकांत पाटील यांच्या दालनात आयोजित करण्यात आली आहे. स्वत: चंद्रकांत पाटील यांनीच याबाबतची माहिती दिली आहे. ते मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष आहेत.

चंद्रकात पाटील नेमकं काय म्हणाले?

या बैठकीत मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्‍याच्या प्रकियेमध्ये आवश्यक त्या अनिवार्य पुराव्यांची वैधानिक आणि प्रशासकीय तपासणी करण्याबाबत, तसेच तपासणीअंती मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती विहित करण्‍यासाठी न्‍यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्‍त) यांच्या अध्‍यक्षतेखाली गठीत केलेली समिती आतापर्यंत केलेल्या कामकाजाची माहिती मंत्रिमंडळ उपसमितीसमोर देणार आहे. यासाठी तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे, असंही मंत्री तथा मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे.

मराठा कार्यकर्ते आक्रमक

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी मराठा कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मराठा कार्यकर्त्यांकडून राज्यभरात आरक्षणासाठी आंदोलन केलं जात आहे. काही कार्यकर्ते आक्रमक होताना दिसत आहेत. काही कार्यकर्त्यांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भाषणावेळी घोषणाबाजी आणि काळे झेंडे दाखवल्याचा प्रकार समोर आलाय. तर कल्याणमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना काळे झेंडे दाखवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे मराठा कुणबी नोंदीबाबत अभ्यास करणाऱ्या निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या नेतृत्वातील समितीलाही धाराशिवमध्ये मराठा कार्यकर्त्यांकडून काळे झेंडे दाखवण्यात आले आहेत.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.