AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी,17 ऑगस्टपासून ग्रामीण भागातील 5 वी ते 7 वी, शहरी भागातील 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु होणार

राज्यातील ग्रामीण भागात दि .17 ऑगस्ट 2021 पासून इयत्ता 5 वी ते 7 वी चे वर्ग आणि शहरी भागात इयत्ता 8 वी ते 12 वी चे वर्ग सुरु करण्यास शासनानं परवानगी दिली आहे.

मोठी बातमी,17 ऑगस्टपासून ग्रामीण भागातील 5 वी ते 7 वी, शहरी भागातील 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु होणार
वर्षा गायकवाड उद्धव ठाकरे
| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Aug 10, 2021 | 6:24 PM
Share

मुंबई: महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण विभागानं राज्यातील शाळा सुर करण्यासंदर्भात मोठा निर्णय काही दिवासांपूर्वी जाहीर केला होता.  17 ऑगस्टपासून शाळा सुरु करण्यासंदर्भातील शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाकडून जारी करण्यात आला आहे. राज्यातील कोरोना संसर्ग कमी झालेल्या भागातील निर्बंध शिथील केल्यानंतर सरकारचा हा निर्णय महत्वाचा मानला जात आहे.   राज्यातील ग्रामीण भागात दि .17 ऑगस्ट 2021 पासून इयत्ता 5 वी ते 7 वी चे वर्ग आणि शहरी भागात इयत्ता 8 वी ते 12 वी चे वर्ग सुरु करण्यास शासनानं परवानगी दिली आहे.

मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणेचा निर्णय  पालिका आयुक्त घेणार

मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे शहरातील कोविड परिस्थिती विचारात घेऊन शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यासाठी महापालिका आयुक्त यांना प्राधिकृत करण्यात आले आहेत.

कोरोना संसर्ग जादा असलेल्या जिल्ह्यांच्या निर्णयाची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर

कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, अहमदनगर, बीड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर या जिल्ह्यात कोविड परिस्थिती विचारात घेऊन शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.

शासन निर्णयात नेमकं काय म्हटलंय?

दिनांक 17 ऑगस्ट,2021 पासून राज्यातील ग्रामीण भागात इयत्ता 5 वी ते 7 वी चे वर्ग व शहरी भागातील इयत्ता 8 वी ते 12वी चे वर्ग सुरु करण्यास परवानगी देण्यात येत आहे. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे शहरातील कोविड परिस्थिती विचारात घेवून शाळा सुरू करणेबाबत निर्णय घेण्यासाठी संबंधित महानगरपालिका आयुक्त यांना प्राधिकृत करण्यात येत आहे. तसेच दिनांक 2 ऑगस्ट, 2021 रोजीच्या ब्रेक द चेन मधील सुधारीत मार्गदर्शक सूचनानुसार कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, अहमदनगर, बीड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर जिल्ह्यातील कोविड परिस्थिती विचारात घेवून व अन्य जिल्ह्यांबाबत देखील शाळा सुरू करणेबाबत निर्णय घेण्यासाठी संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत करण्यात येत आहे.

शाळा सुरु करण्यासाठी महापालिका, नगरपालिका,  ग्रामपंचायत स्तरावर समिती तयार करण्यात येतणार आहे. त्या समितीनं शाळा सुरु करताना दक्षता घ्यायची आहे.

शाळा सुरू करण्यापूर्वी घ्यायची दक्षता

(i) शाळा सुरु करण्यापूर्वी कमीत कमी १ महिना संबंधित शहरात / गावात कोविडचा प्रादुर्भाव कमी झालेला असावा.

(ii) शिक्षकांचे लसीकरण करणे आवश्यक आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी नियोजन करावे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद/ आयुक्त, महानगरपालिका/मुख्याधिकारी, नगरपरिषद व शिक्षणाधिकारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करावा.

(ii) विद्यार्थ्यांच्या पालकांना गर्दी टाळण्यासाठी शाळेच्या परिसरात प्रवेश देऊ नये.

(iv) कोविड संबंधी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. उदा. जास्त विद्यार्थी असलेल्या शाळांमध्ये दोन सत्रांमध्ये, एका बाकावर एकच विद्यार्थी, दोन बाकांमध्ये ६ फूट अंतर, एका वर्गात जास्तीत जास्त १५-२० विद्यार्थी, सतत हात साबणाने धुणे, मास्कचा वापर, कोणतेही लक्षण असल्यास विद्यार्थ्यांना घरी पाठविणे व लगेच कोरोना चाचणी करून घेणे, इ.

(v) विद्यार्थी कोविडग्रस्त झाल्याचे आढळल्यास तात्काळ शाळा बंद करुन शाळा निर्जंतुकीकरण करण्याची कार्यवाही मुख्याध्यापकांनी करुन घ्यावी व विद्यार्थ्यांचे विलगीकरण करावे व वैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्लाने वैद्यकीय उपचार सुरु करावेत.

शाळा सुरू करताना मुलांना टप्प्या-टप्प्यात शाळेत बोलविण्यात यावे. उदा. वर्गांना अदला-बदलीच्या दिवशी सकाळी-दुपारी, ठराविक महत्वाच्या (core) विषयांसाठी प्राधान्य इ. हयासाठी सोबत जोडलेल्या मार्गदर्शन सूचना (SOP) चे पालन करावे.

संबंधीत शाळेतील शिक्षकांनी राहण्याची व्यवस्था शक्यतो त्याच शहरात / गावात करावी, किंवा त्यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा शक्यतो वापर न करण्याबाबत दक्षता घ्यावी.

वरील सर्व बाबींचे शहरी भागात महानगरपालीका आयुक्त व इतर भागात जिल्हाधिकारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद / मुख्याधिकारी, नगरपरिषद यांनी शिक्षणाधिकारी, आरोग्य अधिकारी यांच्या समवेत सातत्याने आढावा घेऊन आवश्यक तेथे संबंधितांना सूचना कराव्यात. शाळा सुरु करण्यापूर्वी व शाळा सुरु झाल्यानंतर आरोग्य, स्वच्छता व इतर सुरक्षाविषयक उपाययोजनांबाबतच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करावं

इतर बातम्या:

मोठी बातमी ! राज्यातील शाळा 17 ऑगस्टपासून सुरु होणार, वर्षा गायकवाड यांची माहिती

मुंबई विद्यापीठात पदवीसाठी प्रवेश हवाय? नावनोंदणी सुरु, संपूर्ण प्रक्रिया एका क्लिकवर

Maharashtra Government issue GR regarding starting schools in rural and urban areas of state

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?